प्रवास

दोन माणसं, चार चाकं आणि पंचवीस राज्यं :भाग सातवा (अंतिम) - टेक्सास ते व्हर्जिनिया

Submitted by अनया on 15 May, 2021 - 06:19

ह्या मालिकेतील आधीचा भाग वाचण्यासाठी कृपया खालील लिंक बघा
भाग सहावा : नेवाडा ते टेक्सास

१० ऑक्टोबर २०१९ : व्हिडोर टेक्सास ते सलीडेल लुईझियाना
collage-01.jpg

दोन माणसं, चार चाकं आणि पंचवीस राज्यं :भाग सहावा - नेवाडा ते टेक्सास

Submitted by अनया on 4 May, 2021 - 12:46

ह्या मालिकेतील आधीचा भाग वाचण्यासाठी कृपया खालील लिंक बघा
भाग पाचवा : वॉशिंग्टन स्टेट ते नेवाडा

०५ ऑक्टॉबर २०१९ लास व्हेगस, नेवाडा ते फिनिक्स, ऍरिझोना
Nevada ariCOLLAGE.jpg

आहा! आजचा दिवस एकदम स्पेशल होता.

विषय: 

"लोक"down

Submitted by गणक on 15 April, 2021 - 12:27

"लोक"down

मंत्री संत्री बिजनेसवाले कुणाला फरक नाय
पण जे "लोक"झाले त्यांनी करायचं काय...
कुणी कुणी चमचमीत अन्न रोज पोटभर खाय
पण जे "लोक"down झाले त्यांनी करायचं काय...

पडली बंद रोजनदारी नाही हाताला काम
मरण यातना उपवासाने कधी मिळेल हो दाम
पोट आहे हातावर ज्यांचे त्यांचा सवाल हाय...
पण जे "लोक"down झाले त्यांनी करायचं काय...

हायवेवरती गर्दी कसली मजुरांची ही लाट
शहर आता ते पडले मागे धरली गावाची वाट
कधी आपल्या घरी पोहचू चालून थकले पाय...
पण जे "लोक"down झाले त्यांनी करायचं काय...

अमेरिकन गाठुडं!--१०

Submitted by सुरेशकुलकर्णी on 14 March, 2021 - 03:14

सगळी बांधाबांध झाली. मुलाने मला पैंटिंगचे किट, कॅमेरा, सकाळी वॉकसाठी ट्रॅक सूट, बायकोला सुनेने कपडे, अजून कायकाय घेऊन दिले होते. (बायको काय-काय घेतलं नाही सांगत!) सामना पेक्षा आमचे पाय ज्यास्त जड झाले होते. तो सकाळचा गारवा, सुंदर सुरेख वातावरण, फुलांपेक्षाही सुंदर पिवळी पडून गळालेल्या पाईन ऍपलच्या पानांचा सडा, आपली माणसं, सगळंच येथे सोडावं लागणार होत.

डिकीत सामान अन डोळ्यात पाणी घेऊन आम्ही घर सोडलं. नातींनी सोबत येण्यासाठी ठेवणीतले सूर काढले. चार दिवसात माया लागली होती. आज आजून त्यांचं रडणं कानात घुमतय!

विषय: 

डेस्टिनेशन ∞

Submitted by अनन्त्_यात्री on 6 March, 2021 - 11:19

अनंताच्या यात्रेसाठी
जय्यत तयारी केली आहे

चांदणचुर्‍याचे भूकलाडू
हिमनगांचे तहानलाडू
(तहानभूक हरपू दे पण)
रसद टकाटक तयार आहे

प्रकाशवर्षी मोजपट्टी
डार्कमॅटरचा भव्य फळा
धूमकेतूचा खडूतुकडा
होल्डाॅलमध्ये भरला आहे

दिशा कोन ढळून जातील
घड्याळ काटे उलटे फिरतील
उद्याच्या बातम्या काल कळतील
याची तयारी ठेवली आहे

मुक्कामाला पोचलो तर
दृृृष्ट तिथे काढतील माझी
त्यासाठी मी कृृृष्णविवरछाप
काजळडब्बी घेतली आहे

अमेरिकन गाठुडं !--७

Submitted by सुरेशकुलकर्णी on 21 February, 2021 - 07:24

माझा मित्र, सुधीर, परक्या ठिकाणी गेला कि सवड असेल तर आवर्जून तेथल्या लोकल मार्केटमध्ये एक चक्कर मारतो, मग ते भारतातले एखादे खेडे असो, कि परदेशातला शहर! मी एकदा त्याला कारण विचारले.
"अरे, नगरला आल्यावर लोक किल्ला, नाहीतर चांदबिबीचा महाल पहायला जातात अन तू आधी बाजारात जाऊ म्हणतोय?"
"तेच काय, कि बाजारात चक्कर मारली कि, स्थानिक लोकांची, त्यांच्या आवडीनिवडींची, राहणीमानाची, अशी खूप माहिती मिळते! "
मला त्याचा हा फंडा आवडला. मी बाजार पालथे घालायचो पण हा दृष्टिकोन माझ्या आकलनात आला नव्हता. याचा फायदा मला अमेरिकेत झाला. ऑस्टिनच्या वास्तव्यात मी मॉल आणि दुकान पहिली.

विषय: 

माझी कैलास मानसरोवर यात्रा (मे २०१२)

Submitted by अजित केतकर on 17 February, 2021 - 00:27
कैलास पर्वत

कैलास मानसरोवर यात्रा (मे २०१२)

विषय: 

दोन माणसं, चार चाकं आणि पंचवीस राज्यं : भाग चौथा - मॉन्टाना ते वॉशिंग्टन स्टेट

Submitted by अनया on 12 February, 2021 - 22:35

ह्या मालिकेतील आधीचा भाग वाचण्यासाठी कृपया खालील दुव्यावर टिचकी मारा
भाग तिसरा : नेब्रास्का ते मॉन्टाना https://aparnachipane.blogspot.com/2021/02/blog-post.html

विशाखापट्टणम बद्दल माहिती ( शिफ्ट होणेबाबत )

Submitted by रतिका on 31 January, 2021 - 13:28

नमस्कार
थोडी मदत हवी आहे.
मार्च मध्ये मी व माझे कुटुंब vizag ( विशाखापट्टणम ) ला शिफ्ट होत आहोत
माझी ३वर्षाची मुलगी आहे. तिची शाळा हि चालू करायची आहे.
दुर्देवाने तिथे कोणीही ओळखीचे नाही.
ऑनलाईन rent चे सर्व साईट्स शोधून झाले पण काही मदत होत नाही.
कोणाची काही मदत होऊ शकेल का ??
( १bhk किंवा २bhk ) काहीही उपलब्ध असेल ते चालेल पण कुटुंबासाठी सुरक्षेच्या दृष्टीने योग्य असावी.
एजन्ट चे कॉन्टॅक्ट असतील तरीही चालेल.

शाळेची काही माहित असेल तर सांगावी

अमेरिकन गाठुडं!--४

Submitted by सुरेशकुलकर्णी on 30 January, 2021 - 23:39

येथे गरीब असो श्रीमंत असो कार आवश्यक आहे. 'कार' हि येथे, रोटी-कपडा-और मकान इतकीच गरजेची आहे. त्याला करणेही आहेत. विरळ आणि विखुरलेली रहिवाशी वस्त्या. दूर अंतरावरील गरजेच्या वस्तूंचे आउटलेटस, सार्वजनिक वाहतूक खूप अविकसित, त्यामुळे तिच्यावर अवलुबुन रहाणे अशक्य, स्वस्त कार्स, आणि त्या साठी सहज, कमी दरावरील कर्ज, उत्तम रस्ते, त्यामुळे चारचाकी वाहन गरजेचे झाले असावे. तसेच येथील कार चालवायला तश्या सुलभ आहेत. ऑटो गेअरचा गाड्या असतात. हाताने टाकण्याचा फक्त एकच गियर, रिव्हर्स गियर. हातात स्टियरिंग, पायात ब्रेक आणि एक्सलेटर! त्यामानाने टुव्हीलर्स, बाईक नगण्य होत्या. 'बाईक' हि येथे लक्सवरी समजली जाते!

Pages

Subscribe to RSS - प्रवास