लॅपटॉप

लॅपटॉप साध्या कामासाठी - Laptop for Basic Work

Submitted by हेमंतसुरेशवाघे on 6 March, 2021 - 00:58

लॅपटॉप घेताना अनेक जण गोधळतातयात अनेकांना फार साधी कामे करायची असतात.
आणि तरीही गरज नसतील तर उद्या लागेल म्हणून प्रचंड ताकदीचा लॅपटॉप घेतला जातो - वस्तूत: हि ताकद कधीही वापरली जात नाही - किंवा फार क्वचित वापरली जाते .
अनेकदा दुकानदार तुम्हाला अति ताकदवान लॅपटॉप उद्या लागेल म्हणून विकतो , वस्तूत: तितकी ताकद कधीही लागत नाही, ताकदवान प्रोसेसर हे महाग असतात आणि त्याचे दुकानदाराला अधिक फायदा मिळतो .

आय पॅड वरचे व्हिडिओ लॅपटॉपवर कसे घ्यावेत?

Submitted by मानुषी on 29 August, 2016 - 00:49

आयपॅडवरच घेतलेले(शूट केलेले) व्हिडिओज यूट्यूब वर अपलोड केले आहेतच. मग आता आयपॅड वरची मेमरी स्पेस भरपूर मिळावी यासाठी हे सगळे व्हिडिओज मी डिलिट करत होते आत्तापर्यन्त. पण ऑफलाइन या व्हि.क्लिप्स पहायच्या असतीलतर त्या क्लिप्स डिलिट करण्याऐवजी दुसरीकडे कुठे स्टोअर करू शकतो? एस्पेश्यली लॅपटॉपवर? कारण आधीच्या डिजिकॅमवर शूट केलेले सगळे व्हिडिओ ज लॅपटॉपवर इ ड्राइव्हवर सेव्ह केले आहेत. त्या मुळे ते ऑफलाइन पहाता येतात.
धन्यवाद.

लॅपटॉप दुरुस्ती - ठाणे

Submitted by स्वाती२ on 20 November, 2015 - 08:18

माझ्या आईचा लॅपटॉप आजकाल अधून मधून अचानक कर्र असा काहीतरी आवाज करुन बंद होतो. थोड्या वेळाने पुन्हा सुरु केला तर व्यवस्थित चालतो. पण असे वारंवार होत आहे. लॅपटॉपचा वापर स्काइपसाठी होतो. माझ्याशी स्काईप करताना गेल्या आठवड्यात दोनदा असे झाले. तर या वारंवार आजारी पडणार्‍या लॅपटॉपला काय झाले आहे त्याचे निदान/दुरुस्तीसाठी खात्रीशीर दुकान /सेवा देणारे सुचवाल का? आई वसंतविहार परीसरात रहाते. त्यामुळे त्या भागातील असल्यास जास्त सोईचे होईल मात्र तसा आग्रह नाही.

Subscribe to RSS - लॅपटॉप