साहित्य

पावसाची मिठी

Submitted by पुरंदरे शशांक on 4 June, 2013 - 02:57

पावसाची मिठी

भरदिसा पडे
पावसाची मिठी
नाही रीती भाती
कशी म्हणू प्रिती

तुडवीतो राने
करी चोळामोळा
धावे सैरावैरा
कसा याचा चाळा

थेंब किती भारी
सरीवर सरी
करी शिरजोरी
लगटतो उरी

पावसाची मिठी
ओलावली दिठी
किती दिसा झाली
सजणाची भेटी

उणावे आवेग
पुरेपूर संग
उन्हात हसुनी
निहाळी नि:संग

लाजली धरणी
मुख घे झाकोनी
हासू झळकले
पदरा आडोनी ....

जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण (?)

Submitted by आशयगुणे on 2 June, 2013 - 14:51

"जामिनाचे पैसे कोण भरतय?" पोलिसांनी मला विचारले.
"मी", मी उत्तर दिले.
पोलिसांनी माझ्याकडे निरखून बघितले. " कोण लागतो हा तुमचा?" मला प्रश्न विचारला गेला.
"मित्र ", मी उत्तरलो.
" जरा समजावा तुमच्या मित्राला", पोलिस ऑफिसर म्हणाले.
मी पैसे भरले, सही केली आणि जग्या बाहेर यायची वाट बघू लागलो.

अपघात

Submitted by shilpa mahajan on 29 May, 2013 - 16:02

अपघात
डोळ्यावर उन्हाचा कवडसा आला तशी वीणाने डोळे किलकिले करून भिंतीवरचे घड्याळ बघितले साडेसहा . . वाजून गेलेले पहाताच तिची झोप कुठल्या कुठे पळाली . झटक्याने उठून बसून तिने कडकडून आळस दिला.. चादरीची घडी घालत ती स्वतःशी पुटपुटली ,"छे बाई , भलताच उशीर झाला आज उठायला ! “
भराभर ब्रश करता करता एकीकडे तिने चहाचे आधण चढवले. . बाल्कनी मध्ये येउन पडलेला पेपर चाळावा कि नाही याचा विचार करता करता तिने चहा गाळला. . चहाचा घोट घेता घेता हेड लाइन्स पाहिल्या आणि कपडे बदलून ती पार्कमध्ये फिरायला घाइनेच निघालि.

विषय: 
शब्दखुणा: 

उमलला मोगरा मंद

Submitted by पुरंदरे शशांक on 26 May, 2013 - 23:10

उमलला मोगरा मंद

उमलला मोगरा मंद, कसा बेधुंद
वेली पाचूच्या ....
वैशाखी काहिली दूर, करी कापूर,
शुभ्र ज्योतींचा ....

उष्म्याचा होत आघात, रोज आकांत
उसळला पुरता ....
हा भलताचि स्वच्छंद, परि नि:संग
रात्रीतून फुलता.......

माळिती कुणी या शिरी, धरिती का उरी
तनू शांतवायाला ....
ज्योत्स्नेचा सहचर खुळा, परि कोवळा
भुलवी जगताला ....

ऋतुराजाचा सांगाती, गुंगली मती
कितीदा या वानावे ....
घ्या भरुनि ओंजळीतुनी, गंध भरभरुनि
सुगंधी न्हाऊनी जावे.....

अकबर इलाहाबादी

Submitted by समीर चव्हाण on 15 May, 2013 - 02:28

काही वर्षांपूर्वी अकबर इलाहाबादीचा एक कविता-संग्रह माझ्या वाचनात आला. थोडा चाळल्यानंतर त्याची काही मते मला टोकाची, अपरिपक्व वाटली म्हणून तो तसाच ठेवून दिला. काही महिन्यांपूर्वी अनंतकडून अकबरचा एक शेर ऐकल्यावर खूप वाईट वाटले. बरेच दिवस ती अस्वस्थता राहिली. तो शेर (जो अकबरच्या संग्रहात फुटकर अशआर मधे सामील) आहे:

हुए इस कदर मुहज़्ज़ब, कभी घर का मुंह न देखा
कटी उम्र होटलों में, मरे अस्पताल जाकर

(मुहज़्ज़ब: सभ्य)

काही दिवसांपासून अकबर गंभीरपणे वाचताना त्याचे बरेच सुंदर शेर मला सापडले. ते सगळ्यांसोबत शेअर करावे ह्या लिखाणाचा हा एक उद्देश्य.

विषय: 
शब्दखुणा: 

आस नवचैतन्याची ...

Submitted by पुरंदरे शशांक on 15 May, 2013 - 00:54

आस नवचैतन्याची ...

घुसमट तगमग शब्दही झाले नको नकोसे
आकाश मोकळे अता निरखू दे जराजरासे

येऊ दे जरा तो झुळझुळणारा रेशीमवारा
श्वासात भरु दे रानसुंगध हा घमघमणारा

शीळ कुणा पक्ष्याची येवो अर्ध जरिही
तुटलेली ही तार जुळावी सहज मनींची

मनपक्षी वेडा विहरत जावो दिगंतरासी
कंठात घेऊनी गाणी नवनवचैतन्याची .....

खेळणे

Submitted by वैवकु on 14 May, 2013 - 04:53

नियतीने सगळे डाव मांडले होते........

पाहिला करुन व्यापार नवा नात्यांचा
कर्मांची खेळुन सापशिडीही झाली
ते बुद्धिबळाने किती काटले शहही
नशिबाचे पत्तेही कुटले कितिदा मी

पण मन माझे त्या कशातही लागेना .....

मग मी म्हटले की नवे खेळणे शोधू
जे कुणाकडेही नसेल जगतामध्ये
की मला हवे ते तसे खेळता यावे
झेलावा त्याने शब्द शब्द तो माझा

जे मला पाहिजे तेच मिळाले आहे .....

जे मला पाहिजे तेच मिळाले आहे !!
मी त्याला घेवुन खूप खेळतो आता
मी कसे कथू केवढी मजा येते ती
की भूक-प्यासही विसरायाला होते

हा विठ्ठल घे अन् पहा खेळुनी तूही......

हे असे खेळणे कुठेच नाही मित्रा !!

आखाजी अर्थात खान्देशातील अक्षय्यतृतीया- सासुरवाशीणींचा सण!

Submitted by मी_आर्या on 13 May, 2013 - 06:44

आखाजी- सासुरवाशीणींचा सण!

मीर तकी़ मीर - भाग १

Submitted by समीर चव्हाण on 11 May, 2013 - 15:34

मीर तकी़ मीर आपल्याला थोडाफार तरी समजला आहे का ह्या दुर्दैवी मनःस्थितीत सुचेलतसे लिहीत आहे. वा म्हणा ह्या अठराव्या शतकातल्या कवीला जे काही समजले त्यातले थोडेसे तरी समजून घेता येईल का ह्या संभ्रमात लिहीत आहे. सुरुवात मला कालच सापडलेल्या एका शेराने करतोय. जगाविषयी बरेच काही समजूनही काही न समजलेल्या मनःस्थितीत मीर म्हणतो:

ये तवह्ह्युम का कारखाना है
यां वही है जो ऐतबार किया

हे जग म्हणजे मोहिनी आहे, भ्रमाचा मोठा कारखाना की ज्यावर विश्वास ठेवाल ते ते (तेच) आहे.
दुस-या एका अंगाने शेर फार आशावादी वाटला.
इथे काहीही साध्य आहे, विश्वास ठेवला तर.

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - साहित्य