इतस्ततः

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 4 June, 2013 - 03:59

पाणी
सध्या उन फार कडक आहे. त्यातच नळाला पाणी आठ दिवसातून एकदाच येते. तरी भरपूर येते. घरचे सर्व पाणी मीच भरतो. मग पुजापाठ झाला की सरळ झाडाला पाणी देतो पक्षांसाठी असलेले प्लास्टीकची डबे भरतो. सकाळी ५ ला नळ आल्यानंतर तो साधारण ९ वाजेपर्यंत चालतो. पहाटेचा गारवा असतो. मी जेव्हा एका झाडा कडून दुसर्‍या झाडाला पाणी द्यायला जातो. तेव्हा नकळत बाजुचे झाड डोलत असते ते जरी हवे मुळे डोलत असले तरी मला मात्र ते मला स्वतःलाच पाणी देण्यासाठी बोलावित असल्याचा भास होतो. अंगणात तर बरी नकोशी रोपे आहेत. अगदी छोटी रोप सुध्दा डोलत असतात. आज- ना उद्या त्यांना उप्टून फेकायचेच असले तरी माझ मन नकळत त्यांनाही पाणी घाल म्हणते. आणि मी सुध्दा त्या नकोशा झाडांवर नकळत पाईपने पाणी उडवितो. तेव्हा मनाला थोडं समाधान मिळते. कधीतर पक्षी सुध्दा आनंदानी या झाडावरुन त्या झाडावर ये-जा करतात, मी सुध्द्दा त्यांच्या अंगावर पाणी उडवितो तेव्हा ते ही आळीपाळीने उड्या मारतात.
पुन्हा पाणी
सध्याचा दुष्काळ पहात हे चित्र पाहुन वाईट वाटते. तर नळाच्या वेळेचा उल्लेख वर केलेलाच आहे. सकाळी नळ येतात पण आजुबाजूचे लोक फार कमी उठतात. पाण्याचा प्रवाह जोराचा असतो. शेजारी टाक्यात पाईप सोडून खुशाल झोपलेले असतात.टाकी क्षणात भरते आणि पाण्याचे पाट वहायला लागतात. त्यांना कित्येक वेळा सांगीतले कॉक बंद करुन झोपा, जाग आल्यावर पाणी भरले तरी होते पण ऐकत नाहीत. कित्येक वेळा मीच त्यांचा कॉक बंद केला. शिवाय रोज उठल्यावर सगळ्या अंगणात पाणी सोडतात, हेही कमी की काय मग रस्ताही धुतात. आम्ही नाईलाजाने पहात राहतो.अशी बरीच उदाहरणे मिळतील.
भिकारी १)
मधात सकाळी सकाळी १ बाई (सुशिक्षीत ) घरी यायची रुमालाची गुंडाळी हातात धरुन भिक मागायची मीही सुरुवातीला ५ रु हातावर ठेवायचो. पण निरीक्षणा अंती लक्षात आले की ती बाई फक्त आपल्याचकडे भीक मागते व सांभार मिर्ची विकत घेऊन जाते. पुढे मी ती १ रु देऊ लागलो. मग तिचे येणे बंद झाले आता तिची मुलगी येते आणि ती बाई दुर उभी राहते. मी त्या मुलीला विचारले तर ती म्हणते शुक्रवारचे व्रत आहे. मी म्हटले आज तर बुधवार आहे. ती पुन्हा आलीच नाही.

भिकारी २)
एक म्हातारा आहे चागल्या घरातला आहे. देव दर्शन करुन मिळेल त्या मंदीरातले नारळ उचलतो. देवापुढचे फोडले खोबरे खातो. (बाबा कडून कळले) मी ऑफिसच्या गडबडीत होतो. शनिवारही होता. तो सरळ गेटमधुन आत आला व नारळ विकत घेण्याची विनवणी करु लागला. म्हणाला डोक्टरला दाखवण्यासाठी १० रु. पाहीजेत भीक नका देवू नारळ घ्या १० रु. चे. मी त्याला म्हटले नारळ राहु द्या हे १० रु. घ्या. १० रु. घेऊन तो चक्क दुरर्‍या घरी गेला. म्हटले जाऊ द्या. काही दिवसानी तो परत आला पुन्हा तेच कारण फक्त नारळ नव्हते. १० रु. द्या म्हणे डॉ. ला दाखवायचे आहे. मी म्हटल काय झाले दाखवा तो तर कॉलर बाहेर काडुन जुना व्रण दाखवू लागला. शेवटी २ रु. देवून त्याचीही बोळवण केली.
गोंधळी
हेही ९ ते १२ च्या दरम्यान हमखास येणारे आपण दरवाज्यात गेल्यावरोबर कुंकवाचा टिळा लावून वही पुढे करतात. आपण ५ /१० रु दिले की ते सरळ परत करुन देव घरात ठेवायला सांगणार ५१ शिवाय नाहीच म्हणणार. शेवटी ११ वर निभावते. वरुन वहीत ५१ लिहायला सांगतात ते निराळे.

तटी- असो. लिखान पचवुन घ्या. (काहीतरी खरडायचे होते. खरडले)

Group content visibility: 
Public - accessible to all site users