साहित्य

यमक मिळे की सुरू पहा... (हझल)

Submitted by अ. अ. जोशी on 8 November, 2012 - 00:44

रसिकांनाही पुरू पहा
यमक मिळे की सुरू पहा

भोजन झाले चकल्यांचे
आता मग? टुरटुरू पहा

कुणी नवेसे दिसल्यावर
झाले सगळे गुरू पहा

रावण नावाचा मच्छर
चिमटीमध्ये चुरू पहा

शंभर नावे बदलू; पण...
इकडे तिकडे उरू पहा

Making of 'फ' फोटोचा - फोटोग्राफीला वाहिलेला पहिला मराठी दिवाळीअंक

Submitted by सावली on 7 November, 2012 - 12:46

भारतात आल्यावर प्रकाशचित्रण क्षेत्रामध्ये काहीतरी करायचं आहे असं मनात होतं. काय ते नक्की ठरवलं नव्हतं आणि कळतही नव्हतं. इतर अनेक गोष्टी करतानाच ठाण्यातल्या 'फोटो सर्कल सोसायटी' या संस्थेची मेंबर होण्याच्या उद्देशानेच 'फोटो सर्कल सोसायटी'ने आयोजित केलेल्या एका व्याख्यानाला गेले. 'फोटो सर्कल सोसायटी' दरवर्षी 'आविष्कार फोटोग्राफी स्पर्धा' आयोजित करते. तिथे दरवर्षी मी स्पर्धक म्हणून प्रवेशिका पाठवत असे. पण तरीही तिथले कुणी मला पाहिलेलं नव्हतं. त्यामुळे ओळखण्याचा प्रश्नच नव्हता.

म्हटलं करावी कविता

Submitted by अ. अ. जोशी on 7 November, 2012 - 07:25

द्यावी म्हटलं ताणून...
मग साहित्याचं काय होणार ?
म्हटलं करावी कविता
बसल्या बसल्या काय करणार..?

रहावं म्हटलं निवडणुकीला उभे
पण, आमच्यासारखे खपत नाहीत
हजारों जरी असले तरी,
माबोवरचे चालत नाहीत

काहींना हवी असते मजा
त्यासाठी आम्ही का झटावे?
जे झटून झटून झिजतात
त्यांचे आम्ही का लिहावे?

उत्तर शोधून सापडत नाहीच
की विचार करून तरी किती करावा...
आणि उरतो एकच प्रश्न
कि मुळातच तो कशाला करावा ?

दिवाळी अंक २०१२ - माहेर/मेनका/जत्रा अनुक्रमणिका- मेनका प्रकाशन

Submitted by admin on 6 November, 2012 - 13:44

मायबोली खरेदीमध्ये २५०हून अधीक दर्जेदार दिवाळी अंक खरेदीसाठी उपलब्ध आहेत. त्यात मेनका प्रकाशनाचे ३ अंक आहेत.
१. माहेर
२. मेनका
३. जत्रा

या अंकांच्या अनुक्रमणिका इथे पहा.
१. माहेर २०१२

विषय: 

उंदीरमामांची फजिती.......

Submitted by पुरंदरे शशांक on 5 November, 2012 - 05:35

उंदीरमामांची फजिती.......

उंदीरमामा चालले होते इकडेतिकडे पहात
धपकन पडले एकदम, नि चरफडले मनात

बघतात खाली चमकून ते आले काय पायात
टिकलीची डबी लाल निरखत घेऊन हातात

टिकल्या पाहून तोंडाला पाणी सुटले जोरात
खाऊ लाल वाटला त्यांना, घेऊन आले बिळात

दाताने उकरताना गेल्या एक्-दोन तोंडात
चावून चावून तुटत नाहीत काय करावे अशात

आतला खाऊ मिळेल कसा विचार केला मनात
घेतला एक दगड आणि फोडली पुढली जोशात

धाडधूम आवाज झाला छोट्याशा बिळात
मामा बिचारे घाबरुन आईकडे बघतात

बबन मन बदल

Submitted by बेफ़िकीर on 5 November, 2012 - 01:47

"बोला?"

काऊंटरवरच्या माणसाने भुवया उंचावून पाहात विचारले. बबनने हातातील वस्तू पुढे केली. त्या माणसाने ती त्याच्या हातात घेतली. काही क्षण निरखून नकारार्थी व निराशावादी मान हालवत त्याने वर न बघताच बबनला विचारले.

"काय करायचंय?"

"सर्व्हिसिंग"

"रिनोव्हेशनला आलंय खरं तर"

"हो पण आत्ता नवीन करायचं म्हणजे आयुष्यात तसं काहीतरी व्हायला तर पाहिजे ना? तेच तेच सगळे, त्याच त्याच प्रायॉरिटीज, छत्र्या, टोप्या, वाहनं, स्वेटर्स, बंड्या, मफलर, शॉर्ट्स, सगळं तेच"

"विमान प्रवास वगैरे केलात का?"

"सगळं झालं"

"मग बोटीतून जाऊन या गोव्याला, रस्त्याने नाही जायचं"

विषय: 
शब्दखुणा: 

हत्तीदादा....

Submitted by पुरंदरे शशांक on 2 November, 2012 - 01:40

हत्तीदादा....

हत्तीदादा हत्तीदादा झुलता कित्ती छान
हालतात कसे मोठ्ठे मोठ्ठे सुपाएवढे कान

सोंड वळवळ करते ती कित्ती ती सापासारखी
कुठं बरं ठेऊ हिला शोध्ता का जागा सारखी ?

दात तर तोंडाबाहेर असले बिनकामाचे ?
ब्रशिंग-बिशिंग काही नको मग काय मिरवायचे ?

पाय ते केवढे मोठ्ठे आहेत नुस्ते खांबासारखे
दिस्ता कसे तुम्ही अगदी काळ्याशार डोंगरासारखे

शेपूट मात्र तुमची ही कित्ती बारीक एवढुशी
भल्या मोठ्ठ्या गादीवर लोंब्तीये दोरी छोटीशी.....

शब्दखुणा: 

बडबडगीत...

Submitted by पुरंदरे शशांक on 1 November, 2012 - 02:12

बडबडगीत...

एक छान चिऊताई
उड्या मारत दाणे खाई
चिवचिवाट उगा करत
अंगणभर नाचत जाई

एक कावळा काळा काळा
हाक मारी माझ्या बाळा
काव काव उठा उठा
खाऊ लौकर आणा मला

एक पिल्लू गोजिरवाणं
भू भूचं वेडं सोनं
शेपूट हल्वून करी ऊं ऊं
किती थांबू आणा खाऊ

म्याँव म्याँव मनीमाऊ
जर्रा झोप मोडा पाहू
वास येता खासम् खास
उड्या मारी मासेखाऊ

शब्दखुणा: 

रान...

Submitted by पुरंदरे शशांक on 1 November, 2012 - 00:16

रान...

रान मनात वसलं
पान पान तरारलं
रंग हिरवा लेऊन
सारं काळीज दाटलं

काळी भुई होती साधी
जरा बरड बरड
थेंब येता अवकाळी
कोंब उगवलं ग्वाड

निरखितो मीच मला
जरा दुरुन दुरुन
तण माजता माजता
घेतो जरा खुरपून

उन्हा वार्‍याचा तो जोर
देतो जोम जगण्यास
हिरवाई जपताना
उगा मानावा का त्रास....

शब्दखुणा: 

'' जगन्नाथाचा रथोत्सव''-- स्वा. सावरकर- एक अर्थान्वयन-रसग्रहण

Submitted by भारती.. on 30 October, 2012 - 01:51

जगन्नाथाचा रथोत्सव-- एक अर्थान्वयन-रसग्रहण
(स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानात जन्मठेप भोगत असतांना केलेले हे काव्य)

ऐश्वर्ये भारी |या अशा ऐश्वर्ये भारी |
महाराज आपुली कथा ना कुठे निघे स्वारी |धृ||
दिक क्षितिजांचा दैदिप्य रथ तुझा सुटता
ह्या कालपथाच्या अतुट उतरणीवरता
नक्षत्रकणांचा उठे धुराळा वरता
युगक्रोश दूरी| मागुती युगक्रोश दूरी |
महाराज आपुली कथा ना कुठे निघे स्वारी?||

(२)
पुसूं नयेचि परी| पुसतसे पुसूं नयेचि परी|
मिरवणूक ही किमर्थ अथवा कुठे निघे सारी
दुज्या कुण्या द्वारी| जावया दुजा कुण्या द्वारी
किंवा केवळ मिरवत येई परत निजागारी

Pages

Subscribe to RSS - साहित्य