साहित्य

एक थेंबुटा...

Submitted by पुरंदरे शशांक on 7 May, 2013 - 23:57

एक थेंबुटा...

एक थेंबुटा उनाड
आभाळात हरवला
पहाटेला पानांवर
दंवरुप झळकला

एक थेंबुटा निवांत
झर्‍याकाठी पहुडला
चोच रान-पाखराची
वेडा करीतसे ओला

एक थेंबुटा गगनी
ढगामधेच दडला
दंगा करुनिया फार
धरेवर विसावला

एक थेंबुटा बिचारा
पापण्यात उमटला
हाक घालूनी मेघांना
उगामुगाच आटला

एक थेंबुटा थेंबुटा
धरतीला लेई लेणं
जाई स्वतः हरपून
देई दुसर्‍याला जिणं

शब्दखुणा: 

मायबोलीवरचे लेखन सुरक्षित करता येईल का?

Submitted by बेफ़िकीर on 7 May, 2013 - 23:22

नमस्कार.

मायबोलीवर आपण जे लेखन करतो ते प्रताधिकार कायद्याखाली येऊ शकत नसावे असा माझा अंदाज आहे. त्यामुळे, ते लेखन कोणी जसेच्या तसे पूर्वपरवानगीशिवाय इतरत्र प्रकाशित केले (मूळ लेखकाचा नामोल्लेख करून अथवा न करून ) तर त्यावर मूळ लेखक किंवा मायबोलीकडून विरोध व्हावा / होईल अशी शक्यता ते लेखन इतरत्र प्रकाशित करणार्‍याच्या मनात येईल असे वाटत नाही.

मी पहिल्या वाक्यात वर्तवलेला अंदाजच चुकीचा असला, म्हणजे प्रताधिकार कायदा लागू होत असला तर प्रश्नच निराळा!

विषय: 

दृष्टी

Submitted by पुरंदरे शशांक on 6 May, 2013 - 01:46

दृष्टी

त्यांची होते कशी वारी
माझी नित्य फिराफिरी

त्यांना होतो तो सोहळा
इथे गोंधळ सावळा

निसर्गचि त्यांना सखा
झालो मी का त्या पारखा

सूरताल त्यांना साथी
मला गोंगाट का होती

काय करावे कर्मासी
जशी दृष्टी तशी सृष्टी ...

शब्दखुणा: 

मेघना पेठेंच्या कविता

Submitted by भारती.. on 1 May, 2013 - 03:53

मेघना पेठेंच्या कविता

''सिग्रेट अशी धुमारत ,जळत जात होती आत..

फुफ्फुस जाळून , करडा धूर होऊन बाहेर पडत होती.

तो छोटासा लालचुटुक निखारा पुढे सरकता सरकताच

मागे जमत जाणारी राख

आणि राख सांडत,सांडत छोटी छोटी होत जाणारी सिग्रेट

तू, मी ही जगलो आहोत तिचा तीळ तीळ प्रवास

आपल्यातून झालेला.

धूर,राख ही काही अटळ अंशरुपं आहेत तिची

आणि तिचा अर्थ मात्र अंशरुपानंच का होईना

पण आपल्यात चिरंजीव झालेला आहे.''

विषय: 

संधी होती पण..

Submitted by vaiju.jd on 30 April, 2013 - 14:10

॥ श्री ॥

(विवेकानंद केन्द्र, डोंबिवली यांनी घेतलेल्या समस्यापूर्ती स्पर्धेतली माझी प्रथम क्रमांकाची कविता )

समस्या – तेव्हाच संधी होती पण !
नोकरीच्या मुलाखतीत नापास झालेला
एक तरुण चौपाटीच्या कठड्यावर बसला,
त्याला तसा बसलेला पाहून
समोरच असलेला गर्दभ हसला
तरुण म्हणाला,
बाबा रे , असा हसू नकोस
जखमेवर मीठ चोळू नकोस
तुमचं आपलं बरं आहे
ज्याला बुद्धी कमीत कमी
त्याला काम मिळते आहे
नाही तर आम्ही?
घेऊन एवढाल्या डिगऱ्या
हिंडतो आहोत,
पण मिळत नाहीत नोकऱ्या
कसलंही काम करायला तयार
पण, विचारातच नाही कोणी यार!

आभाळात आले किती .... काळे काळे ढग

Submitted by पुरंदरे शशांक on 29 April, 2013 - 00:35

आभाळात आले किती .... काळे काळे ढग

आभाळात आले किती .... काळे काळे ढग
येना बाहेर लवकर आई ....बघ वर बघ

आरडाओरडा कित्ती यांचा .... गडाडगुडूम
वीज कशी मधूनच .....जाते सणाणून

वारे कसे घोंघावती .... आवाज करून
पाला पाचोळ्याने गेले .... आभाळ भरून

टपटप टपटप आले आई .... थेंब हे वरून
भिजू मस्त पावसात ..... गोल गोल फिरून

गाणे गाऊ पावसाचे ..... हात उंचावून
ये ना आई लगेच बाहेर .... काम दे सोडून

मी गझलांचा कर्दनकाळ

Submitted by वैवकु रीटर्न्स on 28 April, 2013 - 01:30

मी पर्यायी अंगुलिमाळ
मी गझलांचा कर्दनकाळ

प्रतिसादातुन मी वाचाळ
गझलांमधुनी खूप रटाळ

मी "मी"चे कीर्तन करतो
विठ्ठल मागे बडवी टाळ

गझल आवडो वा नाही
तू नुसते माझ्यावर भाळ

"पर्यायी- संग्रहा"स्तवे
शिजवत आहे माझी डाळ

गझला चाळिसच्या माझ्या
मी अकलेने नन्हा बाळ

'तिन्हिसांजा' मी वापरतो
तुम्ही वापरा 'संध्याकाळ'

पिंडबिंड पाहुन माझा
खच्चुन घाबरतात टवाळ

माबो मज तू किती पिटाळ
इथेच टाकिन गझलगुर्‍हाळ

इथेच टाकिन गझलगुर्‍हाळ.......मी गझलांचा कर्दनकाळ

पाऊस आला पाऊस आला

Submitted by पुरंदरे शशांक on 27 April, 2013 - 06:02

पाऊस आला पाऊस आला

गडगड गडगड कोण गरजले
लखलख लखलख कसे चमकले

टपटप टपटप थेंब टपोरे
रस्ते अंगण ओले सारे

सुगंध भारी कुठून आला
अरे हा तर वळिव पडला

तडतड तडतड गारा पडल्या
मजेत वेचू खाऊया चला

गाणे गाऊन नाचू या चला
पाऊस आला पाऊस आला

॥ खळीकंस ॥

Submitted by विनायक उजळंबे on 25 April, 2013 - 04:59

तुझ्या प्राक्तनाच्या व्यथा मम ललाटी, जखम लाल त्याची तुझ्या गौर भाळी
व्यथांचेच सारे महाभारताहे! कवी का फुकाचा कुणी व्यास होतो ?

जरी वेदनेच्या पखाली वहातो ..तुझ्या आठवांच्या महाली रहातो ,
कशाला कुणाचा मला लोभ व्हावा ,मनातून जेव्हा तुझा वास होतो .॥

तुझ्या स्पर्शमात्रे गुलाबास काटा , खुळी रातराणी तुझा गंध मागे ,
खळीकंस होण्या तुझे केस येता ,अचानक जणू चंद्र खग्रास होतो ॥

फुलोनी पहाटेस प्राजक्त येता ,मला जास्त होते धरेचेच देणे ,
पसरता सडा केशरी जाणिवांचा ,व्यथांना धरेचा सहवास होतो . .

सुगंधी कळ्यांना तुझे वेड लागे ,जुन्या काष्ठवृक्षा नवी पालवी ये ..

शब्दखुणा: 

वाचन आणि आपण

Submitted by भारती.. on 23 April, 2013 - 06:30

वाचन आणि आपण

आज,जागतिक पुस्तकदिनी मनात येतंय की खरंच किती रटाळ झालं असतं जगणं या पुस्तकांशिवाय.आपलं स्वतःचंच जगणं जगण्याची सक्ती. तेही तसं रोमहर्षक असतं म्हणा, उनसावल्यांचं,सुखदु:खांचं,स्थित्यंतरांचं,संकटांचं,संधींचं वगैरे वगैरे,पण आपल्यापुरतंच फक्त.

एखाद्याला (खरं तर प्रत्येकालाच) खूप भूक असते, एका जन्मात अनेक जगणी जगायची असतात, अनेक कथानकं भोगायची असतात त्यातल्या थरारांसकट.

म्हणून तर पुस्तकं भेटतात आपल्याला. प्रतिभेचे अनंत रंग घेऊन पुढे सरकत रहातं जगण्याचं महाकथानक, कधी महाकाव्य..

त्या वाचनप्रवासाचा हा एक धावता आढावा..

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - साहित्य