मी कपाटा मागे लपलो,ते कपाट किती जुनं होतं माहित नाही. पण वर्षानुवर्षाचा कुबट वास त्याला येत होता. अजून मला त्या स्त्रीचं नाव माहीत नव्हतं. तिला विचारायची संधीच मिळाली नाही. दरवाज्या उघडल्याचा आवाज झाला. नंतर लाथेने दरवाज्या ढकलून दोघेजण आत शिरले. त्याबरोबर ती स्त्री जमिनीवर भेलकांडली आणि पुढील शब्द ऐकू आले. " काय ग ए भवाने,कोनाला आनलंस घरात? कुटं हाय त्यो ?
या वर्षीच्या 'पासबुक आनंदाचे' या बँकिंग विषयक दिवाळी अंकात माझे 'बँकिंग शब्दकोडे' समाविष्ट झाले आहे.
रस असणाऱ्यांनी जरूर वाचा.
अंकासाठी संपर्क - vyascreations@gmail.com / ०२२-2544 7038


आजकाल मी गुरुजींना मॉर्निंग वॉकला घेऊन जायला सुरुवात केली. ते बरोबर आले तरी फारसे बोलत नसंत. किंबहुना बोलतच नसंत, असं म्हंटलं तरी हरकत नाही. पण एकतर्फी संवाद झाला,तरी मी तो चालू ठेवीत असे. कधी कधी ते रडवेला चेहरा करीत.कधी किंचित हसत.पण खळाळून हसत नसंत. अजूनही त्यांना आणल्याचा पश्चात्ताप होत नव्हता. कदाचित तो दिशाला होत असावा. पण ती माझ्या भीतीने बोलत नसावी. आता गुरुजींना येऊन महिना होत आला. माझी मुलं सुद्धा त्यांना आजोबा म्हणून हाक मारीत असंत. ते माझ्याकडे अनोळखी माणसाकडे पाहावं तसं पाहात.
माझे विचार थांबेनात.ज्याअर्थी गुरुजींना इथे नसलेला सदाशिव दिसला आणि ते त्याच्याशी बोलत होते. याचा अर्थ त्यांना भास होत होते. खरंच दिशाचं म्हणणं ठीकच आहे.पण मानसोपचार तज्ज्ञ माहिती असणं आणि डॉक्टर माहिती असणं यात फरक आहे.तरीही मी चवकशी करायचं ठरवलं.ऑफिसला गेलो.जाताना गुरुजींना प्रेमाने झापून गेलो आणि वेळेवर जेवण्याचं वचन घेऊन गेलो.कामात दिवस कसा गेला कळलं नाही.संध्याकाळ झाली.काम चालूच होतं.आज तरी मी नऊच्या आत घरी जाणार नसल्याचं जाणवलं.एका मिटिंगसाठी बसलो होतो.चर्चा रंगात आली होती.अचानक दिशाचा फोन आला.मी बाजूला जाऊन वैतागून घेतला." काय आहे ? मला उशीर होणार आहे.तुम्ही जेऊन घ्या.
बाहेर पडताच त्यांना जाणवलं की, घरी सगळे काळजी करत असतील. एक-दोन मेसेजेसही येऊन गेले होते. मित्रांबरोबर आहे, उशीर होईल, झोपून जा, असे मेसेजेस करून टाकले. तेव्हा कुठे थोडं हायसं वाटलं. एव्हाना छान गार वारा सुटला होता. आकाशात टिपूर चांदणं पडलं होतं. एकमेकांशी काहीही न बोलता ते पुन्हा पाषाणच्या दिशेने चालू लागले. एव्हाना तिकडची गर्दी अगदीच तुरळक झाली होती. वाऱ्याने तिची ओढणी पुन्हा-पुन्हा त्याच्या दिशेनी झेपावत होती. तरीही ना ती ओढणी सावरत होती, ना तो... त्याच्या बाईकच्या जवळ पोचताच इशारा मिळाल्यासारखा अचानक पाऊस सुरु झाला. पाऊस येताच तो आडोशाला झाडाखाली धावत गेला.
उडप्याच्या हॉटेलात शिरताना येणारा तो मंद उदबत्ती आणि सांबार ह्यांचा संमिश्र सुगंध नकळत मनाला शांत करत गेला. टेबल मिळाल्यावर ते दोघंही काहीही न बोलता शांत बसून राहिले. वेटरनं दिलेल्या मेन्यूकार्डला चाळण्याचा बहाणा करत ती त्याची नजर चुकवत होती, तर त्याच मेन्यूकार्डच्या आडून तो तिचं निरीक्षण करत होता. लांबून बघणार्याला हे दोन त्रयस्थ वेगळी टेबलं न मिळाल्याने बळजबरी एका टेबलावर बसली आहेत असं वाटलं असतं. तिच्याकडे बघताना त्याचं मन भूतकाळात जाऊन पोहोचलं.
"त्यानंतरची वर्षं सगळी घाई-गडबडीची गेली. सासरच्या तर्हा समजून घेणं, त्या घराला-माणसांना आपलं करून घेण्यात, स्वतःच्या करियरला पुढे नेण्यात कशी गेली कळलंच नाही. बरीच नवीन नाती जोडली गेली, नवीन सर्कल तयार झालं. इतक्या वर्षात पुण्यातल्या पुण्यातही कधी आपली भेट झाली नाही. शाळेनंतर सगळेच आपापल्या फिल्डमध्ये प्रगती करण्यात व्यस्त होते. कॉलेज, क्लासेस, इंटर्नशिप सगळीकडचे मित्र-मैत्रिणी, नातेवाईक ह्या सगळ्यांच्या गदारोळात मी नवर्याच्या साथीने व्यस्त होत गेले. त्यातच मध्यन्तरी ऑर्कुट आलं. आवर्जून तुला शोधलं. तिकडे तुझ्या पोस्ट्स, तुझे बायकोबरचे फोटोज बघून छान वाटलं.
"मला अजूनही आठवतंय आपण सहावीत होतो. मी आणि नेहा एका बेंचवर बसायचो. आमच्या बेंचमागेच तुमचा बेंच होता. तू आणि ओमकार! त्यावेळी चक्क उंच मुलींमध्ये गणना व्हायची माझी! त्यामुळे शेवटून दुसरा बेंच. त्यात नेहा म्हणजे उंच, स्पोर्ट्समध्ये/ नाचात /अभ्यासात सगळीकडेच पुढे. आम्ही दोघी मधल्या सुट्टीत नाव-गाव-फळ-फुल खेळायचो. तर नेहमीसारखीच ती जिंकत होती. तिच्या बाजूनी बरीच जणं होती. आणि मी एकटीच माझी वही लपवून लिहीत होते. तेवढ्यात तू आलास मागून. मी चिडून वही आणखीनच लपवली. मला वाटलं माझी उत्तरं तू फोडशील आणि तिलाच जिंकवशील! ते तुला न सांगताही कळलं. तू म्हणालास-मी तुझ्या बाजूनी आहे! इतकं भारी वाटलं सांगू!
"उतरतेस का? पोचलो आपण.."
"अरे हो, कळलंच नाही."
पुन्हा त्याच्या खांद्याचा आधार घेत ती पटकन उतरली. बाईक पार्क करून, हेल्मेट नीट ठेवून तो सवयीने कपाळावरून हात फिरवत आला. केस होते तेव्हा अशीच झुल्फ मागे करायचा हेल्मेट काढलं की, ते आठवून तिला हसायला आलं. आता डोक्यावर पूर्ण चमन-गोटा होता!
"हसा मॅडम, वय झालं माझं आता. तू अजूनही तशीच दिसतेयेस पण! थोडीशी लठ्ठ झालीयेस, पण बाकी काहीच फरक नाही."
"बस काय, पन्नाशी आली आता. किती खेचशील? बरं चल तिकडे एक बेंच मोकळा दिसतोय, कोणी यायच्या आधी जाऊन बसुया."
भेटायचं ठरलं तर खरं, पण संध्याकाळ होऊच नये असं वाटत होतं. आईकडे आल्यावर शांतता मिळते, मुलंही मागे-पुढे करत नाहीत. तिकडे औरंगाबादला नवरा,मुलं, सासू-सासरे, नोकरी ह्या सगळ्यात स्वतःशी बोलायला वेळच नसतो. पण पुण्याला आलं की जरा निवांतपणा मिळतो. आणि मग जुन्या खपल्या निघत राहतात. इतकी वर्ष साठवून ठेवलेल्या, सगळ्यानपासून- कशाला स्वतःशीही नाकारलेल्या काही आठवणी पिंगा घालत राहतात. पन्नाशीकडे झुकताना हल्ली जाणवायला लागलंय की, आता वेळ फार उरला नाहीये. अधून मधून कोणाच्या तरी हार्ट अटॅकची, कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजची, ऍक्सिडेंटची बातमी येत राहते.