जरा हटके...
नमस्कार मंडळी ____/|\____
बर्याच दिवसांनी भेटिचा योग जुळून आलाय. विसरला नसाल अशी आशा करतो
ऑफिस मधे व्यस्त असल्याने बर्याच दिवसात कुठे भटकंती करता आली नाही
नमस्कार मंडळी ____/|\____
बर्याच दिवसांनी भेटिचा योग जुळून आलाय. विसरला नसाल अशी आशा करतो
ऑफिस मधे व्यस्त असल्याने बर्याच दिवसात कुठे भटकंती करता आली नाही
आपल्या आवडीची एखादी गोष्ट करायची असं बरेच दिवस मनात असावं, पण काही कारणांमुळे त्यात व्यत्यय यावा, आणि मग अचानक एके दिवशी ती संधी स्वत:हून चालत आपल्या दारी यावी, याहून दुसरा आनंद तो कशात असणार? माझ्या बाबतीत असंच काहीसं घडलं. कित्येक दिवसांपासून बाईकवरुन कुठेतरी लांब भटकायला जायचं मनात होतं, आणि यंदाच्या दिवाळीत अखेरीस ती संधी आली.
मी आणि सोबत अजून ३ riders नी सुट्ट्यांचा फ़ायदा घेऊन एक आठवड्याचा बेत ठरवला, आणि जागा ठरली ती दक्षिण भारतातील कर्नाटकाची किनारपट्टी आणि पश्चिम घाटांमधील काही भाग. Google maps वापरून पक्का plan बनवला, आणि अखेरीस ९ नोव्हेंबरला आम्ही निघालो.
क्रुगर नॅशनलपार्कची ट्रिप संपवुन परत येतांना जरा वाट वाकडी करुन साबी शहरातुन आलो. शक्य झाल्यास सविस्तर वर्णन लिहिन. आता फक्त हे प्रचि टाकतो.
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
दक्षिण अफ्रिकेतील एक नामवंत बँक आमच्या कंपनीची क्लायंट आहे. गेल्या चार वर्षां पासुन आमच्या कंपनीचे ९०-९५ कर्मचारी दक्षिण अफ्रिकेत राहुन या बँकेला माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सेवा पुरवतात. जुले॑ २०११ मधे माझी या प्रकल्पावर नियुक्ती झाली आणि मी कुटुंबासह दक्षिण अफ्रिकेत आलो.
आल्या दिवसा पासुन भेटलेला प्रत्येक सहकारी मला एकचं प्रश्न विचारायचा...
काय मग क्रुगरची ट्रिप झाली की नाहि?
नाहि आजुन. इती अस्मादिक
अरे काय हे? साऊथ अफ्रिका आ के क्रुगर नहि देखा तो क्या देखा? हे म्हणजे आग्र्याला जाऊन ताजमहाल न पहाण्या सारखे आहे. करा करा लवकर करा क्रुगर ची ट्रिप. लाईफटाईम एक्सपिरीन्स आहे तो. मिस नका करु.