हे मृत्यो...
==========
१.
वीजेने थोडंस क्षितिज किलकिलं करावं
तेव्हां अथांग निळाई अंगावर येईल
कदाचित
तेव्हां क्षितिजाची रेषा
निळसर जांभळी होत जाईल
तिथे कदाचित तू असशील..
आज म्हटलं बसावं
तुझ्याशी निवांत बोलावं
गप्पा टाकाव्यात
आणि थेट तुझ्याशीच
मैत्री करावी
--------------------------------------------------
२
लाल पिवळा नारंगी भगवा
सगळ्या रंगात रंगायचंय अजून
हिरव्या कांचनमृगाने हाक दिलीये
तू कुठेतरी वाहत असशील नदीतून
आताच नकोय तुझाशी
निळी जांभळी नजरानजर
--------------------------------------------------
३
एक पान पिकलेलं
उन्हामधे सुकलेलं
सुरकुतलेलं.. थकलेलं
टक्क उघड्या डोळ्यांमधे
चक्क तुझा धावा
आणि तुझा नेमकाच कंटाळा
तू असा अगम्य कसा
--------------------------------------------------
४
तू इथं ?
मी साशंक..
इवल्या इवल्यापावलांचे
न उमटलेले ठसे
आणि तुझ्या डोळ्यांतली
वेडसर झलक
सगळं मिटवण्याची
आणि माझ्या अंगावर आलेला
थंडगार शहारा ..
काय केलंस हे ?
प्रवासाच्या आरंभालाच झडप घातलीस ?
--------------------------------------------------
५.
हे बघ
एक बंद पडलेलं घड्याळ
ना कसलीच टिकटिक
ना कसल्याही जाणिवा
आणि कसल्याही नेणिवा..
बस्स एक भयाण शून्य.
तुझं शिक्कामोर्तब व्हायचंय
तू मात्र
बोलावलं कि नेम़कं येत नाहीस
आणि जा म्हटलं कि
येतोस हटकून.....
Maitreyee Bhagwat
व्वा!व्वा! सुंदर! ४ आणि ५
व्वा!व्वा! सुंदर!
४ आणि ५ खासच.
आवडल्या.
मृत्युवर कविता करायचा मोह
मृत्युवर कविता करायचा मोह कधीकधी आवरत नाही हे खरं पण मरणमोह असू नये कारण जीवन हीच आपली ओळख असे काहीसे ही सुंदर कविता वाचताना वाटले. ले.शु.
मैत्रेयी, कोणत्या क्रमांकाचं
मैत्रेयी, कोणत्या क्रमांकाचं कौतुक जास्त करु हे बघण्यासाठी परत वर गेले. मग परत परत वाचतच राहिले. अशक्य सुंदर ! क्रम ठरवणं अगदीच अवघड.
मी पण .. मी पण माझ्याइतका
मी पण .. मी पण
माझ्याइतका तुला कुणी
ओळ्खत नसेल
एकदा नाही सहादा कुणी
भेटलाही नसेल
थँक्स अरे दोस्ता पण
शिकवून गेलास
शेकहँड करून जिणं
दान देऊन गेलास..
- Kiran..
तुझा तो बर्फाळ
तुझा तो बर्फाळ स्पर्श
अनुभवलाय मी ही
क्षितिजाच्या अल्याडपल्याड
झुललोय मी ही
हिरवाईच्या रानामधे
भुलला मानसपक्षी
तुझ्या अंगाईने दिसली
निळसर नक्षी
तरी अजून चुकतो
म्हणून
सर्वत्र तू दिसतो
फुटाफुटावर ब्रेक्स लावत
शहाण्यासारखा चालतो..
_ Kiran..
मस्तच.... "जिंदगी तो बेवफा है
मस्तच....
"जिंदगी तो बेवफा है एक दिन ठुकरायेगी, मौत अपनी मेहबुबा है साथ लेकर जायेगी" - मुकद्दर का सिकंदर मधले हे गाणे आठवले...
किरण (इंग्रजी) - सुरेख कविता आहेत, पण वेगळ्या द्यायला पाहिजे होत्या असे उगाचच वाटून गेले..
सगळ्याच आवडल्या गेल्या वर्षी
सगळ्याच आवडल्या
गेल्या वर्षी झालेली आपली भेट
अगदी परवा झाल्यासारखी वाटते
तुला घाबरणार्यांना चिडवणारी मी
प्रत्यक्ष भेटीत घामाघुम झाले होते
तुही बहुदा मला धडा शिकवायलाच
आला होतास
व्यवस्थीत टर्ण मारुन निघुन गेलास
मला दिसली होती तुझ्या चेहर्यावरची
मिश्कील छटा
त्यानंतर मी तुला
समजुन घेण्याचा प्रयत्न केलाय
आणि निर्माण झालाय
तुझ्याबद्दल नितांत आदर
आता आलास तरी मी
न घाबरता तुझे स्वागतच करेल
तु तुझे काम करतोस
कपडे बदलावेत तसे
आमची शरीरं बदलतोस
आवडेल पुन्हा नवा जन्म घेउन
नवी सुरुवात करायला
तो बालपनाचा आनंद पुन्हा अनुभवायला
मग कधी येतोयेस?
वाट पहातेय..
तुही बहुदा मला धडा
तुही बहुदा मला धडा शिकवायलाच
आला होतास
व्यवस्थीत टर्ण मारुन निघुन गेलास
मला दिसली होती तुझ्या चेहर्यावरची
मिश्कील छटा
वर्षा... सुंदरच लिहीलंय.
सर्वांचे आभार
शशांक तुम्ही पण लिहा ना..प्लीज !
४ आणि ५ विशेष आवडली. मृत्यूला
४ आणि ५ विशेष आवडली.
मृत्यूला उद्देशून लिहिलेली एका महान कवीची 'मरणोन्मुख शय्येवर' ही दीर्घ कविता यानिमित्त आठवली. तिची सुरुवातच
'ये मृत्यो!' अशी होते.
पहिल्या ओळी आहेत :
'ये मृत्यो! ये तू ये, यावया प्रती
निघालाच असशिल जरि ये तरी सुखे!'
आपण स्वतः काव्य लिहिता. त्यामुळे आपणही ती वाचली असेलच.
मैत्रेयी! निर्भयतेचे आकर्षण
मैत्रेयी!
निर्भयतेचे आकर्षण आहे मला फार म्हणून जास्तच अपील झालीये कविता!
आणि त्या व्रूद्धजीवासाठी लिहेलेले तर अगदी शहारा आणून गेले.
आताच नकोय तुझाशी
निळी जांभळी नजरानजर>> आह!! ह्यापेक्षा सुंदर उपमा आणि शब्दप्रयोजन असूच शकले नसते... क्लास!
काय केलंस हे ?
प्रवासाच्या आरंभालाच झडप घातलीस ?>> झडप पडणारच आहे... खाटकन! ती जितकी नकळत तितकी सुखद!!
मस्त
मस्त
मी भास्कर, मी नाही वाचली
मी भास्कर, मी नाही वाचली कविता.
बागेश्री, अज्ञात धन्यवाद.
हे मृत्यो ===== ६. निर्जन
हे मृत्यो
=====
६.
निर्जन ओसाड वाटेवरती
अस्ताव्यस्त पसरलेला तू
आणि मी अनवाणी अनभिज्ञ
सभोवारच्या काट्याकुट्यांनी
आणि दगडाधोंड्यांनी
श्वास रोखून पाहीलं तेव्हां
तुला पायांवरून सरपटतांना
युगं आणि पळांतलं अंतर नाहीसं होतांना
निळाईची अगाध व्याप्ती
शिकवून गेलास तू
थंडगार स्पर्शाने ..
ही जीवघेणी थट्टा कि
तुझा बर्फाळ मिस्कीलपणा !
- मैत्रेयी
मृत्यूशी केलेला
मृत्यूशी केलेला संवाद............ छान जमलाय.
धन्यवाद उकाका.
धन्यवाद उकाका.
हे मृत्यो - ७ ========= एक
हे मृत्यो - ७
=========
एक शहर सुनं पडलेलं
घट्ट बंद खिडक्या नि दारं
मी किलकिल्या कवडशात पाहीलं तुला
वाटलं, इतकं थैमान घातल्यावर
तुझ्या डोळ्यातली ती
निळी वेडसर झाक
गडद झाली असेल...
पण
थक्क होण्याची पाळी माझी होती
तुझ्या कपाळावर आठ्यांचं जाळं
आणि डोळ्यातली चिंता
मला अगदीच अनपेक्षित !!!
- मैत्रेयी
हे बघ एक बंद पडलेलं घड्याळ ना
हे बघ
एक बंद पडलेलं घड्याळ
ना कसलीच टिकटिक
ना कसल्याही जाणिवा
आणि कसल्याही नेणिवा..
बस्स एक भयाण शून्य.
तुझं शिक्कामोर्तब व्हायचंय
तू मात्र
बोलावलं कि नेम़कं येत नाहीस
आणि जा म्हटलं कि
येतोस हटकून.....
कविता आवडली.
समीरजी आपल्यासारख्या उत्तम
समीरजी
आपल्यासारख्या उत्तम कवीने कविता वाचली याचा आनंद जास्त आहे
मस्तमस्त
मस्तमस्त
सुपर!
सुपर!
सगळ्याच आवडल्या !
सगळ्याच आवडल्या !
सगळ्याच मेजवानी आहेत. निवडक
सगळ्याच मेजवानी आहेत. निवडक १०.
क्षणभंगुरता
क्षणभंगुरता
Oh! why should the spirit of mortal be proud?
Like a swift, fleeting meteor, a fast-flying cloud,
A flash of the lightning, a break of the wave,
He passeth from life to his rest in the grave.
माझ्या रोजच्या रुटीन जीवनात
माझ्या रोजच्या रुटीन जीवनात आपल्या निसर्गकवितांनी भरभरुन, उल्हास पेरणारी माझी अतिशय आवडती कवि - मेरी ऑलिव्हर. आपल्या कवितांमधुन,व्यक्तीव्यक्तीमधील रेशमी, तलम आणि तितक्याच टिकाउ संबंधावरचे तिचे भाष्य असो की प्रेमकविता असोत, निसर्गकविता असोत की साध्या २ ओळी असोत, प्रेरणादायी, मनामध्ये आशेचा किरण चमकावणाऱ्या अशा तिच्या कविता असतात. मृत्युविषयक कवितांमध्येही दुर्दम्य आशावाद असतो. "I AM PLEASED TO TELL YOU Mr. Death" ही कविता घ्या.
ती म्हणते हे मृत्यु तुझा हा जो मारे भारदस्त असा काळा कभिन्न रोब तू घातलेला आहेस ना तुला माहीतही नाही या रोबला भोकं पडलेली आहेत. - I am pleased to tell you, there are rifts in your long black coat. का सांगते ऐक - आज मला रुमी भेटायला आलेला होता. हांआता तो प्रत्यक्ष माझ्याशी बोलत नव्हता इतकेच काय तो उंच होता की खुजा तेही मी सांगू शकणार नाही. आणि तरीही, मी ज्या वृक्षाखाली बसून रुमीची कविता वाचली त्या वृक्षाइतकाच खराखुरा तो माझ्या समीप होता, माझ्याशी संवाद साधत होता. त्याने मला त्याच्या काही कविता ऐकवल्या. मी आणि तो वृक्ष, आम्ही दोघांनीही कवितांचा आस्वाद घेतला. आज मला रुमी भेटला कारण तो तुझ्या फाटक्या रोबमध्ये मावलाच नाही. तुझ्या त्या भीतीदायक रोबला पडलेल्या उसवणीतून तो केव्हाच निसटला होता.
I AM PLEASED TO TELL YOU
Mr. Death, I am pleased to tell you, there
are rifts in your long black coat. Today
Rumi came visiting, and not for
the first time. True he didn't speak with
his tongue but from memory, and whether
he was short or tall I still don't know.
But he was as real at the tree I was
under. Just because something's physical
doesn't mean it's the greatest. He
offered a poem or two, then sauntered on.
I sat awhile feeling content and feeling
contentment in the tree also. Isn't
everything in the world shared? And one
of the poems contained a tree, so of
course the tree felt included. That's
Rumi, who has no trouble slipping out of
your long coat, oh Mr. Death.