आजकालचे सौंदर्य डोळ्यात मावत नाही

Submitted by सिद्धेश्वर विला... on 11 October, 2018 - 10:51

आजकालचे सौंदर्य डोळ्यात मावत नाही

कोण खरंच सुंदर मनाने, तेच तर कळत नाही

जी बघावी एकसारखीच दिसते

उगाच ओळखत नसली तरी , गालातल्या गालात हसते ॥

पूर्वी फार बरे होते , फक्त नजरेचे इशारे होते

ती पण बघायची दुरून चोरून चोरून

जवळ येता जरा तिच्या

निघून जायची पटकन , मान खाली घालून ॥

आमचा काळ बरा होता , साधे असलो तरी खरा होता

मी असं म्हणत नाही , कि आजच्या प्रेमात दमच नाही

जोड्या भरपूर जुळत असतात , पण खरी कुठली तीच मिळत नाही ॥

दूरचित्रवाणीवर चित्रपटात , पूर्वी फक्त दोन फुलं एकत्र यायची

तेवढंच बघितलं तरी आमची अख्खी रात्र जायची

चुंबनाची सुरुवात , मधुचंद्राची असायची पायरी

आजकालच्या पिढीची असते अख्खी मधुचंद्रांची डायरी ॥

इश्श , अय्या हे आवाज हल्ली हरवल्यासारखे वाटतात

आजकालच्या पोरंपोरी जरा खुट होताच

दुसऱ्याचा हात पकडून चालतात ॥

हे जरी खरं असलं , तरी किंमत त्याची द्यावी लागते

हात बदलून थकत जातात , मग कोणतरी जवळची असावी लागते

प्रेम आहे तिथेच अजूनही आहे गड्या, फक्त त्याची नशा डोळ्यातून हृदयात उतरावी लागते ॥

तुम्ही भले बघा , वॉट्स अप नि अजून काही

प्रेमातली ताकद तुम्हाला कधी वेळ दिल्याशिवाय कळायची नाही ॥

{सिद्धेश्वर विलास पाटणकर}

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults