शब्द माझ्या मनातले

Submitted by Hemali Mhatre on 14 August, 2018 - 03:39

नको ना असं करु. बस्स्स झाले.. सोड ना आता.. किती हा त्रास .. मला,तुला,फॅमिलीला ,आणि आपल्या फ्युचर ला सुद्धा... काय मिळतय यातून.. टेंशन नि फक्त टेंशन .. बाकीचे सर्व एंजोय करतात लाईफ.. त्यांना ही प्रोब्लेम्स् असतात..म्हणून असं नाही जगत रे ते .. मग आपणच का ? आपलं तर क्षुल्लक भांडण आहे रे ... तू ही ताणलं मी ही ताणलं तर कसं रे होईल...
असच जगायचं होते तर का भेटलो आपण.. केलं होतं ना आधी पण हे सगळं सहन .. मग पुन्हा पुन्हा असच जगायचं का ? आधीचेच जीवन जगायचे होते तर का भेटलो आपण? का नात्यात अडकलो पुन्हा ? केली होती ना पुन्हा नव्याने सुरुवात... दोघांच्या समंतीने ... होते ते चांगले होते ना ..
असं रोज काय मरायचं रे ... एकदाच मेलेलं बरं .. सौरी... म्हणजे तुला असं मरणाच्या गोष्टी नाही आवडत... पण काय करु . असेच विचार येताय मनात एकटी राहून ... पण मला बाळासाठी जगायलाच लागेल .. इच्छा असली नसली तरीही... कारण माझ्याशिवाय कोण आहे रे त्याला या दुनियेत.. त्याच्यासाठी तरी एकत्र येउ या. जे आपल्याला नाही मिळाले ते त्याला देउ या .. तुला नाही ना जमले तरी मी देइन रे सर्व काही माझ्या पिल्लू ला .. तुझी साथ असली नसली तरीही...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users