.

.
आता बस्स ...
खुप ऐकली तुझी बोलणी
हृदय पोखरणारी आणि
मेंदूचीही चाळण करणारी
विसरावं तुला पक्के ठरवलं
नको स्मृतिदंश पुनः कधीही
राग अनावर झाला म्हणून
आठवणी शिफ्ट डिलीट करत
कायमसाठी पुसून टाकल्या
म्हटलं ...
नाही आता
नाव सुध्दा काढायचं कधीही..
अगदी मन घट्ट करून घेतलं..
आणि...
.

.
श्वास श्वासात मिळतो
ओठ एकमेकांत गुंततो
छातीचा भाता फुलतो
सवयीने ....!
श्वास कलियुगी विकतो
पोटाची खळगी भरतो
ओठांचे चंबु पैसा मिळवितो
मजबूरीने .....!
श्वास आशा पालवितो
रंगी बेरंगी फुगे फुगवितो
कुटुंब जगवितो
मेहनतीने ....!
श्वास स्वप्नेही पाहतो
देवाकडे एकचि मागतो
थोडा अधिक श्वास
निष्ठेने ....!
― अंबज्ञ
""हो हो हो" करत होते मी तुझ्यावर प्रेम, अगदी जीवापाड करत होते पण तुला ते कधी जाणवलंच नाही" शलाकाचे हे शब्द ऐकून मी स्तब्ध झालो ...............................................................
......................................................................................................................................
माफी असावी........ असे परत घडाणार नाही ह्याची काळजी घेइन.....
.

.
लगबग पाहायला सांज क्षितीजे
आणि उमलत्या कुमुदिनी सवे
तळ्यात डोलणाऱ्या चंद्रराशी
पाऊल पुनः त्या टेकड़ीपाशी
हिंदकाळणाऱ्या त्या पारंब्या
कुंद दरवळतोय केवड़ा अन्
परतीची ती किलबिल वाणी
सादवते आतुरलेली रातराणी
क्षितिज आसमंत कार्योत्सुक
मावळतीचा धुंद समागम
प्रसवता ही नित्य रजनी
लुचते आभाळाला चांदणी
.

.
आपमतलबी बेरजा,
अजाणतेपणी केलेल्या
वजाबाक्या मदतीच्या
अचूक निःशेषाच्या
गुणाकार भागाकार
फक्त हित संबधांचा
आणि परत त्यांच्याही
बेरजा वजाबाक्या
अपूर्णांकात उरणाऱ्या !!
.

.
लाट धावते लाटे मागुनी
तरी किनारा भेटेना
आकाश लोपते आकाशी
तरी क्षितिज भेटेना
माणुसकीच्या वाटा हरवल्या
ओळख कुठे सापडेना
जाती पातीत तो भेदावला
माणूस कुठे मिळेना
होकायंत्र शोधते दिशेला
उत्तर दक्षिण आणि पूर्वेला
उर्ध्वाभिमान अध:महिमान
प्रीत मावळली पश्चिमेला
हीरा छेदितो हीऱ्याला
कर्म काही चुकेना
लोभ भुलवितो लोभाला
चक्रव्यूह काही सुटेना
.

.
निखळ हासिरी
मनमुक्त विहारी
गोड गोजिरी
छान एक परी
वेचत मकरंद जीवनाचा
वाऱ्यासंगे हिची फेरी
सवे कुंद कळ्यांच्या
बनली ही पवनपरी
स्वप्नं सुंदर पेरत
नभांगणी स्वारी
आकांक्षापूर्ती
सर्व मनोहारी
कुणी दावेल ममत्व
कुणास लाभेल स्वामित्व
आयुष्य सुंदर फुलवणारी
नित्य भरती सागरापरी
प्रत्यक्ष ही वसुंधरे वरी
भेट ही दैवी ईश्वरी
लाभों सर्वांस ऐसी
जीवनी एक परी
― अंबज्ञ