कलियुग

Submitted by सेन्साय on 7 October, 2018 - 05:32

कलियुग
~~~~~

कलियुगात भेटला एकदा अजब चित्रकार
रेखाटले त्याने सुंदर स्वप्नांचे कल्पित आकार
निरखुन पाहता चित्रातून झाले भविष्य साकार
अकल्पित अघटित सर्वच तेथे अंधकार !

छाटलेल्या शिश्नाचाही दिसू लागला आविष्कार
घड़तो तिसऱ्या पंथाकडूनही तेथे बलात्कार
सुंथा केलेला, न केलेला राही निर्विकार
हाच असेल का बरे कलियुगाचा चमत्कार !

स्पर्श घृणावणारा लपवतो अस्फुट चित्कार
पोटाची खळगी बनतात येथे लाचार
राजरोस सुरु झाला पहा हां व्यभिचार
खुलेआम भरतो आता चमड़ीचोरांचा बाजार !

दुर्गुणांचा चालतो बरे का ईथे सत्कार
बोकाळला सगळीकडे हां शैतानी कुलाचार
रावणांची पैदास वाढली बेसुमार
कल्पांतापर्यन्त सारे हे असेच का चालणार ?

― अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users