टॅबलेट कोणता घ्यावा?

Submitted by निंबुडा on 18 January, 2013 - 02:29

मार्केट मध्ये सध्या उपलब्ध असणार्‍या टॅबलेट्स बद्दल इथे चर्चा (अनुभव, वैशिष्ट्ये, किमती, तुलना इ.) करूया.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवीन टॅबलेट घ्यायचा आहे, पण कोणता घ्यावा समजत नाही. जाणकारानी आणि अनुभव घेतलेल्यांनी कृपया इथे लिहा. मायक्रोमॅक्स आणि hcl चे ७-८ हजारापर्यंत पण सॅमसंग चे ३०-३२ हजारांपर्यंत इतकी किमतींची तफावत आहे. त्यामुळे जरा गोंधळ होतोय.

येह, मी असा धागा सुरू करायच्या विचारात होतो.
सॅमसंग टॅब २ बद्दल काय मत आहे ? १९ ते २० ह. पर्यंत आहे.
७ इंआ, वायफाय, सेल्युलर
घेताना सेल्युलर (ज्यात सिमकार्ड वापरता येईल डेटा प्लॅन साठी) असाच घ्यावा.

मी २-३ महिन्यांपूर्वी Micromax Funbook Alpha घेतला होता.
सध्या तो गेल्या २०-२५ दिवसांपासून सर्विस सेंटरमध्ये आहे. (स्क्रीन खराब झाली आहे.)

Micromax Funbook Infinity सुद्धा चांगला आहे.
बजेट जास्त असेल तर Funbook Pro सुद्धा एक ऑप्शन आहे.

माझा सॅमसंग ७ इन्ची आहे. रु. १९३००.
फायद्याची बाब म्हणजे त्यात सिमकार्ड ची सोय आहे. म्हणजे वायफाय नसेल तरी माझी नेट विना डाँगल सुरू रहाते. निगेटिव्ह साईडला कॅमेरा ३.२ मेपि आहे. फ्लॅश नाही. बाकी स्पेक्स सुंदर. पक्की पावती असल्यास आफ्टरसेल्स सुंदर. अँड्रॉईड ४.१.१ आहे.
(सॅमसंगनेच ऑनलाईन सिस्टीम अपडेट दिला त्यानंतर मात्र त्याचे टिथरिंग बंद पडले आहे. ते एक दोन दिवसात करून आणीन असे गेले अठवडाभर ठरवतो आहे.)

लोक मला म्हणू शकतील की हा अ‍ॅपलचीच टीमकी वाजवतो, पण व्हायनॉट आयपॅड? २१के पास्न मिनी स्टार्ट होतो... + अमेझिंग टच, सुपर ब्राईट स्क्रीन, १०+ तास चालणारी बॅटरी, पूर्ण मेटल ची बॉडी... !

मोगँबो, किम्मत पण लिहि ना.

घरातला लॅपटॉप सध्या अक्षरशः कामचलावू झाला आहे. Sad शिवाय BSNL चे नेट कनेक्शन (मॉडेम) असल्याने लॅपटॉप पेक्षा डॅस्कटॉप सारखे (नेट वर काम करायचे असल्यास एकाच जागी ठेवून!) वापरावे लागत आहे. त्यामुळे मोबिलिटी आणि एकूणच नेटचा वापर इत्यादी च्या दृष्टीने टॅबलेट हा लॅपटॉप ला रीप्लेस करू शकेल का ते पहायचे आहे. कुणाचे काय मत?

निंबुडा,

खूप टंकायचं असेल तर जानूस्थ (ल्यापटॉप) बरा पडेल. हस्तपत्रीवर (ट्याबलेट) देव्नागेई टंकणे जरासे किचकट आहे.

आ.न.,
-गा.पै.

निंबे - वाच -

माझ्या माहितीनुसार आयपॅडला सिमकार्ड चालत नाही>>> असं नाहीये.

सध्या खालील आयपॅड्स उपलब्ध आहेत -
आयपॅड २ - वायफाय ओन्ली - १६, ३२, ६४ जीबी - रू. २५के पास्नं सुरूवात
आयपॅड २ - वायफाय + ३जी (मायक्रो सिम) - १६, ३२, ६४ जीबी - ३३के पास्नं सुरूवात
=====================================================

आयपॅड ३ - वायफाय ओन्ली - १६, ३२, ६४ जीबी - रू. २८के पास्नं सुरूवात
आयपॅड ३ - वायफाय + ३जी (मायक्रो सिम) - १६, ३२, ६४ जीबी - ३९के पास्नं सुरूवात
=====================================================

आयपॅड मिनी - वायफाय ओन्ली - १६, ३२, ६४ जीबी - रू. २१के पास्नं सुरूवात
आयपॅड मिनी - वायफाय + ३जी (नॅनो सिम) - १६, ३२, ६४ जीबी - २९के पास्नं सुरूवात
======================================================
आयपॅड ४ - (छोटा चार्जर असलेला) - भारतात लॉन्च झालाय पण मला किंमत नाही माहीती

हे पहा - http://store.apple.com/us/browse/home/shop_ipad/compare

याच प्रॉडक्ट्स च्या भारतातील किंमतीं साठी या साईट वर दिलेल्या किंमतीत अंदाजे ४/६ के वाढवा...

१. अ‍ॅपल वर धूळ जमली तर ती पुसायला सुद्धा व्हाया आय ट्यून जावे लागते.
२. अ‍ॅपल वर उपलब्ध असलेल्या फ्री अ‍ॅप्स ची संख्या खूपच मर्यादित आहे. फुकट अ‍ॅप डालो करायला देखिल कार्ड नंबर मागतात. (असा एक धागा इथेच आला होता मध्यंतरी)
३. तुलनेने पहाता किंमत प्रत्येक ठिकाणी कमीत कमी १०-१५ हजार रुपयांनी जास्त आहे.
४. साधं सिमकार्ड चालणार नाही. मायक्रो सिम, किंवा कात्रीने आहे ते कापून घ्यावं लागेल.
५. आफ्टरसेलच्या नावाने आनंद आहे.

एकंदर मला अ‍ॅपल आवडत नाही, कारण मी डाक्टर आहे (व्हॉट हॅपन्स इफ अ डॉक्टर टेक्स अ‍ॅन अ‍ॅपल अ डे?) Wink

टॅबवर टायपिंग एसेमेस पुरतेच चांगले.
जास्त टायपायला डॉकिंग स्टेशन घ्या.
इन्टेक्स चा टॅब ७ हजार प्लस डॉकिंग यूएस्बी कीबोर्डवालं ७५० रुपये असं पाहिलं परवा मी. झक्कास आहे. पण मग नेटसाठी डाँगल घ्यावं लागेल वेगळं. किंवा वायफाय करून घ्या घरच्या मोडेमला.
(सॅमसंगचे टॅब घेतलेत तर यूएस्बी/पेन ड्राईव्ह डायरेक्ट लावता येत नाही त्याला. ९पिन नामक वेगळीच झंझट दिलेली आहे. केबल वेगळी घ्यावी लागते.)

खूप टंकायचं असेल तर जानूस्थ (ल्यापटॉप) बरा पडेल. हस्तपत्रीवर (ट्याबलेट) देव्नागेई टंकणे जरासे किचकट आहे.

>>
नाही हो नाही! घरातून आमचा मायबोलीला रामराम असतुया! Happy त्यामुळे देवनागरी टंकणे हा मुख्य उद्देश नाही. Happy

Apple is so expensive. There have there own problems. For simple download also u have to depend on pin code. Also you cant use download apps from every pc. PC has to be register with ITUN then only you can use that PC for download any application.

You can try a from company called iberry. Try http://iberry.asia/

I am using 7" tablet from last 1 year which perfectly working. I am not getting single problem from this tablet. The range start from 7.5K (7") to 15K (9") with and without 3G slot. Only problem is they don't have exchange facility.

overall this tablet is really good compare to any other tablet offered by various companies in india. You can use following url for review.

http://www.thinkdigit.com/Tablets/iberry-Auxus-CoreX2-3G-Review_12945.html

मलाही टॅब घ्यायचाय. आयपॅड मिनी आणि सॅमसंग यांची तुलना करुन मी सॅमसंग ७ इन्ची घ्यायचे नक्की केलेय.

टॅबवर टायपायचा त्रास आहे, मला तसेही लॅपटॉपवरही टायपायला त्रास होतो. मी कायम डेस्क्टॉप वापरलाय. लॅपटॉपपेक्षा टँब बरा वाटतो. हाताळायला सोप्पा, बाहेर घेऊन जाताना गळ्यात तिन किलोचे ओझे पडत नाही.

लॅपटॉपला संपूर्ण सबस्टीट्यूट म्हणून टॅब चा विचार करू नका. करणारच असलात तर कदाचित विण्डो बेस्ड असला तर बघा, पण त्यातले मला माहीत नाही. ऑफिसचे सगळे फीचर्स (अ‍ॅटलिस्ट पॉवरपॉईंट) जे लॅपीवर चालतात ते टॅबवर चालत नाहीत. (ट्रान्सिशन इफेक्ट इ.)
सर्फिग, मेल्स वाचणे/लिहिणे, माबो, यूट्यूब, (अँड्रॉईड बेस्ड कोणत्याच टॅबवर यूट्यूब व्हिडू डालो होणार नाही डायरेक्ट. त्यासाठीचे अ‍ॅप्स लिहू नयेत असा गूगलचा कटाक्ष आहे.) पुस्तके वाचणे, व लिमिटेड फीचर्स ऑफिस. हे चालते.
टॅब ७ काँप्युटरशी जोडताना कमीत कमी विण्डोज ७ असेल तरच इंटरफेस होते.

घरी डेक्स्टॉप आहेच की पडलेला.. कुठे बाहेर गेलो की पंचाईत होते, म्हणुन टॅब.

सर्फिग, मेल्स वाचणे/लिहिणे, माबो, यूट्यूब, (अँड्रॉईड बेस्ड कोणत्याच टॅबवर यूट्यूब व्हिडू डालो होणार नाही डायरेक्ट. त्यासाठीचे अ‍ॅप्स लिहू नयेत असा गूगलचा कटाक्ष आहे.) पुस्तके वाचणे, व लिमिटेड फीचर्स ऑफिस. हे चालते.
\

एवढेच करायचे, गावी गेलो की मोबाईलच्या छोट्या स्क्रिनवर हे करण्यापेक्षा ७ इन्च् स्क्रिन परवडला. आम्ची कंपनी दर तीन वर्षांनी रु. १५००० देते नविन फोन घ्यायला, त्यात पदरचे थोडे घालुन टॅब घ्याय्चा विचार करतेय, ते १५,००० नसते तर छोटा स्क्रिन चालला असता. Happy

आफ्टरसेलच्या नावाने आनंद आहे.>> खर की काय? आत्तापर्यंत अ‍ॅपल एवढी उत्तम आफ्टर सेल सर्विस अजून कोणाचीतरी पाहिली नाहीये. स्वानुभव.

माझ्यामते one of d best tablet available is iberry CoreX4 3G
9.7" 1024x768 IPS Panel, Android ICS 4.0, Samsung Exynos 4412
ARM Quad-core 1.6GHz, 1.6GHz Quad Core Processor, 2GB Ram, Inbuilt sim slot, Wifi, v1.3 FullHD 1080p, HDMI out... आणि ईतर बरेच काही

किंमतः- १५९००/-
दोन दिवसांपुर्वी प्रिलाँच साठी ईबे वर यापेक्षा कमी किंमतीला उपलब्ध होता Happy

टॅब्जमधे ऑफिस वाली सगळी कामं होतात का?

लॅपीपेक्षा वजनाला हलके, आकाराला लहान, ऑफिस (वर्ड, एक्सेल, पिपिटी इत्यादी), एल सि डी प्रोजेक्टरला जोडता येईल असे, नेट वापरता येईल असे. क्वचित फोटोशॉप चालवता येईल असे प्रकरण आहे का हे?

असं काहीतरी मला हवंय. ते टॅब्लेट असू शकते का की नेटबुक असू शकते. प्रोजेक्टरला जोडता येणे अनिवार्य आहे.

एल सि डी प्रोजेक्टरला जोडता येईल असे >>>>>>@नीधप एल सी डी ला जर HDMI कनेक्टीव्हेटी असेल तर iberry चालेल. नविन आलेल्या सोनीच्या मोबाईल मधे देखील HDMI आउटपुट असते,

प्रसिक, सहमत
नीधप,
जुन्या प्रोजेक्टरला नाही जोडता येत. नवे निघालेत त्यांना येतं.
फोटोशॉप चालणार नाही.
तत्सम वेगळे अ‍ॅप्स चालतील.
ऑफिसची पण सगळी फीचर्स चालत नाहीत. लिमिट्स बरीच आहेत अजून. कुणाचा तरी टॅब उसना मागून किंवा २-४ तास हाताळून पहा.
मायक्रोमॅक्स ए११० पण वापरून पहा. ५ इन्ची स्क्रीन वाला फोन आहे. सग्ळी टॅब फीचर्स देखिल आहेत. १०-१०५०० पर्यंत मिळेल.

प्रोजेक्टर्स हे शैक्षणिक संस्थांमधले, विद्यापिठांमधले आहेत. ते तेवढे अपडेटेड असतीलच असे नाही. सध्या माझ्या लॅपीला ती प्रिंटरला लावायचो तसली कॉर्ड लावून आम्ही वापरतो.
एक दोन ठिकाणी मोठ्या स्क्रीनच्या टिव्हीला जोडतो. तिथे तसलीच कॉर्ड किंवा यू एस बी असते.

यू बेटर गो फॉर 'नेटबुक' प्रकारचे चिंटू लॅपी. विण्डोज हवी त्यावर.
हे असे:
2012-05-17 16.54.57.jpg
रिलायन्स डिजिटल ला १५८०० ला पहिला होता पुण्यात. लीगल विण्डोज. यात सीडी/डीव्हिडी ड्राईव्ह नसतो. स्क्रीन १० इन्ची उक्कूसा असतो. क्यूट अन लाईट.

DLL XPS १२" TABLET CUM LAPTOP

हा पर्याय चांगला आहे...जर तुम्हाला दोन्ही गोष्टीची गरज असेल तर..
http://www.dell.com/us/p/xps-12-l221x/pd

हा tablet पेक्षा थोडा जड आहे...आणि यात windows ८ OS आहे...आणि हेप्रकरण जरा महाग आहे USA मध्ये $1098.99 फक्त.

तिकडे एवढा महाग तर इथे किती असेल. एवढं महाग असेल प्रकरण तर टेक्नोलॉजी आणि माझा खिसा अजून डेव्हलप होण्याची वाट बघेन म्हणते Happy

Pages