उपयोगी चकटफू सॉफ्टवेअर्स

Submitted by सदानंद कुलकर्णी on 6 July, 2013 - 10:48

व्यवसायानिमित्त मला आर्किटेक्चरल डिझायनिंग, थ्रीडी मॉडेलिंग, ऑडीओ-व्हिडीओ एडिटिंग, इमेज एडिटिंग, ग्राफिक्स डिझायनिंग, फोटोग्राफी, व्हिडीओ रेकोर्डिंग अशा विविध आघाड्यांवर काम करावे लागते. यासाठी मला अनेक वेगवेगळी software applications वापरावी लागतात. पायरसी करायची नाही आणि उजळ माथ्याने बिनधास्त व्यवसाय करायचा हे धोरण असल्याने मी आधी दर्जेदार freeware applications उपलब्ध आहेत का याचा शोध घेतो आणि ती वापरून पाहतो अगदीच पर्याय सापडला नाही तर मग commercial application विकत घेतो. मला गवसलेल्या काही दर्जेदार freeware software applications ची माहिती खाली देत आहे.

1: Engineering/architectural drawings करण्यासाठी ऑटोकॅड हे जगप्रसिध्द सॉफ्टवेअर वापरले जाते. त्याचे लायसन्स तीस हजारापासून दीड लाख रुपयापर्यंत आहे. ज्यांना ऑटोकॅडला मजबूत पण फ्रीवेयर पर्याय हवा आहे ते draftsight हे सॉफ्टवेअर वापरू शकतात. draftsight हे Dassualt Systems या कंपनीने विकसित केलेले सॉफ्टवेअर आहे. त्यांचे CATIA हे CAD CAM मध्ये वापरले जाणारे अत्यंत लोकप्रिय सॉफ्टवेअर आहे. ऑटोकॅड ला स्पर्धा करण्यासाठी त्यांनी draftsight हे सॉफ्टवेअर चक्क फ्री उपलब्ध केले आहे. draftsight ही ऑटोकॅड ची सहीसही नक्कल आहे. त्याचा इंटरफेस, टूल्स, कमांड अगदी ऑटोकॅड सारख्याच आहेत. draftsight साठी ही लिंक पहा http://www.3ds.com/products/draftsight/overview/

2: Civil engineering, Architecture, Interior designing या क्षेत्रात 3D Modeling ला खूप महत्वाचे स्थान आहे. त्यासाठी अनेक महागडी सॉफ्टवेअर मार्केट मध्ये उपलब्ध आहेत. गेल्या काही वर्षात यासाठी Sketchup या नावाचे सॉफ्टवेअर मोठ्या प्रमाणात वापरले जाते. Sketchup हे Google ने विकसित केलेले सॉफ्टवेअर आहे. Sketchup फ्रीवेयर आणि कमर्शियल अशा दोन्ही स्वरुपात उपलब्ध आहे. याची फ्रीवेयर व्हर्जन सुद्धा अत्यंत शक्तिशाली आहे (शेवटी ते गुगलचे आहे ना!) Sketchup वापरणे खूप सोपे आहे. त्याची video tutorials सुद्धा त्यांच्या साईट वर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत. मुलांची 3D Visualization क्षमता वाढविण्यासाठी सुद्धा हे सॉफ्टवेअर मुलांना 'खेळायला' देता येईल. Sketchup मध्ये काम करणे म्हणजे अक्षरशः धमाल आहे. बघता बघता मुले त्याच्या आसपास दिसणाऱ्या अनेक वस्तूंचे थ्रीडी मोडेल करू शकतात. Sketchup Make साठी या लिंकवर जा http://www.sketchup.com/products/sketchup-make

3: सध्या व्हिडीओ शूट करणे सहज शक्य आहे. पण शूट केलेल्या व्हिडीओला एडिट करून त्यात निवेदन, संगीत, टायटल यांचा समावेश करून एक छोटी अर्थपूर्ण फिल्म तयार करता येते. घरघुती व्हिडीओ एडिटिंग साठी Pinnacle Videospin हे फ्री सॉफ्टवेअर वापरता येईल. घरघुती समारंभ, व्यावसायिक छोटे व्हिडीओ प्रेझेन्टेशन यातून सहज करता येतील. सुट्टीत दिवसभर गेम बडवत बसलेल्या मुलांना हा नवीन खुराक नक्की आवडेल. Pinnacle Videospin हे सॉफ्टवेअर Pinnacle कंपनीने त्यांच्या वेबसाईट वरून काढून टाकले असले तरी ते या ठिकाणी उपलब्ध आहे. http://videospin.en.softonic.com/

4: Audio शिवाय Video म्हणजे मिठाशिवाय जेवण! Audio recording, editing, conversion या कामांसाठी Audacity हे दमदार freeware सॉफ्टवेअर आहे. audacity डाउनलोड करण्यासाठी पहा. http://audacity.sourceforge.net/ मदतीसाठी इथे जा http://wiki.audacityteam.org/wiki/Audacity_Wiki_Home_Page

5: डिजिटल कॅमेराने काढलेले फोटो एडिट करण्यासाठी अडोबी फोटोशॉप हे व्यावसायिक सॉफ्टवेअर खूप प्रसिद्ध आहे. photoshop मधील फिचर्स, समान इंटरफेस आणि समान कार्यपद्धती चकटफू हवी असेल तर GIMP हे सॉफ्टवेअर वापरा. कलर करेक्शन, इमेज रीटचिंग, मल्टी लेयर काम्पोजीशन ही सर्व कामे जी photoshop मध्ये केली जातात ती सर्व GIMP मध्ये करता येतात. GIMP साठी ही वेबसाईट पहा http://www.gimp.org/

GIMP ला आणखी एक सशक्त पर्याय म्हणून Paint.net हे सॉफ्टवेअर वापरता येईल. त्याची लिंक आहे: http://www.getpaint.net/index.html

5: Audio आणि Video convert करण्यासाठी Freemake Video Converter हे माझे आवडते सॉफ्टवेअर आहे. यात अक्षरशः कोणताही Video format कोणत्याही Video format मध्ये convert करता येतो. Output quality एकदम प्रोफेशनल! एवढेच काय हा Video DVD Author सुद्धा आहे. DVD मध्ये मेनू सुद्धा तयार करता येतात. तसेच तुमच्या कडे असलेल्या mobile handset साठी अनुकूल असलेया format मध्ये हा Video convert करून देतो. Youtube video डाउनलोड आणि convert सुद्धा यात करता येतात, video पासून audio वेगळा करता येतो. Freemake Video Converter हे अष्टपैलू सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी ही लिंक पहा. http://www.freemake.com/

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माहितीबद्दल धन्यवाद.
पण ऑडासिटी हे फ्रिवेअर नसुन ओपनसोर्स आहे. तेवढा बदल करा जमल्यास.
तसेच जीम्पला स्वतःची ओळख आहे. ते नुसते फॉटोशॉपचे क्लोन नाही. नव्या वापरकर्त्यांसाठी तोंडओळख म्हणुन सुरुवातीला असे म्हणने ठिक आहे. पण प्रतिसादातही तुम्ही जीम्प हे फॉटोशॉपची नक्क्ल / क्लोन आहे वगैरे म्हणत आहात, म्हणुन हा प्रतिसाद.

जुन्या ऑडिओ कॅसेट्स मधली गाणी संगणकावर कॉपी करायची असल्यास त्यासाठी काही सॉफ्ट्वेअर लागेल का ? कोणी असा प्रयोग केला असेल तर कृपया येथे माहिती द्यावी.
कॅसेटची एक बाजू एकाच फाईल मधे सेव्ह होणे हा प्रकार फार पुर्वी एका प्रयत्नात केला होता.
पण तसे न होता प्रत्येक गाण्याची एक एमपी३ बनवता आली पाहिजे.
धन्यवाद.

पण तसे न होता प्रत्येक गाण्याची एक एमपी३ बनवता आली पाहिजे. >>> आधी एका साईडची एक फाईल बनल्यावर mp3cutter सारखे सॉफ्टवेअर वापरुन हवे तसे तुकडे पाडा, हाकानाका.

अरे हो पण मी जो प्रयोग केला तो पार १० वर्षांपुर्वी केलेला होता. त्यावेळी काय वापरले होते ते आठवत नाहीये.
आता काय सोयी आहेत कॅसेट संगणकावर कॉपी करण्यासाठी ?

ऑडासिटी जिंदाबाद... वापरायला सगळ्यात सोपे सॉफ्टवेअर.. कॅसेट सलग वाजवून रेकॉर्ड करायची आणि मग गाण्यांच्या नुसार तुकडे पाडायचे... आणि एमपी३ म्हणून सेव्ह करायचे.. हाकानाका..

कॅसेट सलग वाजवून रेकॉर्ड करायची आणि मग गाण्यांच्या नुसार तुकडे पाडायचे.. >>> हिम्स, लाईव्ह रेकॉर्डिंग करताना रेकॉर्डेड आवाजाची क्वालिटी खराब होते का? म्हणजे आजुबाजुचे आवाज त्यात मिसळले जाऊ शकत असतील ना?

लाइव्ह रेकॉर्डींगला लिमिटेशन्स आहेतच. कारण आपण साऊंडप्रूफ ठिकाणी काही रेकॉर्डींग करणार नाही. पण तरीही एकदम शांतता असेल अर बर्‍यापैकी कमी नॉइस मध्ये रेकॉर्डींग होते..

आणि जर कॅसेट वरून करायचे असेल तर कॉम्प्युटरच्या लाईन इन मध्ये कॅसेट प्लेयरचा आउटपुट द्यायचा. डायरेक्ट असेल तर तो किंवा हेडफोनचा पण चालतो.
कॅसेट प्लेयरच जर खराब असेल किंवा मूळ कॅसेट खराब असेल तर काही करता येत नाही.. कॅसेट प्लेयर जर चांगला असेल तर मात्र एकदम चकाचक रेकॉर्डींग होते..

हिम्सकूला, धन्यवाद ! Happy
ऑडासिटी पाहतो चेक करून. पण ते पुर्णपणे चकटफू आहे काय ?
कारण काही वेळा ट्रायल व्हर्जन्स असतात फक्त काही दिवसांसाठी.
तसेच एक बाजू कॉपी करून झाल्यावर त्याचे तुकडे पाडायचे काम पण ऑडासिटी मधेच करता येते का ?
की वेगळे कटर वापरावे लागेल ?
तसेच केबल कोणती वापरावी यासाठी, काही रेकमेन्डेड आहे का ?

ऑडासिटी पाहतो चेक करून. पण ते पुर्णपणे चकटफू आहे काय ?
कारण काही वेळा ट्रायल व्हर्जन्स असतात फक्त काही दिवसांसाठी.
>>
बघीतलेत? यासाठीच म्हणत होतो की फ्रिवेअर नका म्हणू. ते फ्रिवेअर नाही. ओपनसोर्स आहे.

महेश, ते पुर्णपणे खरोखर मोफत आहे.

फार वर्षापूर्वी केले होते. बहुधा Jet Audio वापरुन. कॅसेट प्लेयर चे ऑडीओ आउट्पुट पिसि च्या ऑडीओ इन ला दिले होते आणि त्यात mp3 मधे सेव करण्याचा ऑप्शन पण होता.

कृपया ओपन ऑफिस न वापरता त्याचेच फोर्क असलेले लिबरऑफिस वापरावे.
लिबर ऑफिस, ओपनऑफिस पेक्षा बरेच लाईट आहे व ओपन ऑफिसपेक्षा चांगले आहे काही फिचर्सबाबतीत.

ऑडसिटी चांगले आहे, मित्राने त्याच्या प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशनमधे वापरले आहे. मस्त\ रिझल्ट्स मिळाले नॉइज रिडक्शनमधे.

WPS Office (earlir kingsoft) हे देखिल चांगले वाटले. त्याचा interface जवळपास MS Off सारखाच आहे. Macros साठी मात्र MS Off ला पर्याय नाही.

@ हर्पेन, धागा वर आणल्याबद्दल धन्यवाद.
२०१३ ची साइट्स आहेत.पुन्हा तपासून -१) सॅाफ्टवेरची साइजही लिहा. मोबाइल अॅप्स असल्यासही ( windows/ android ) टाका.

ऑडासिटी पूर्णपणे फ्री आहे. आणि त्यात गाण्यांचे तुकडे करता येतात काही प्रश्न नाही.. एमपी३ सेव्ह करण्यासाठी एक वेगळे प्लगइन लागते पण तेही फ्रीच आहे.. त्यामुळे एकदम बिन्धास्त वापरा.. ऑडासिटी वापरताना काही शंका आली तर विचारा.. शक्य असेल तर नक्कीच मदत करीन.

केबल अशी काही स्पेसिफिक नाही.. पण जनरली ३.५ चा जॅक असतो कॉम्पला आणि ऑडिओ आऊटला पण त्यामुळे दोन्हीकडे सेम पिन असलेली वायर पाहिजे.

हा धागा वाहता आहे का? Uhoh तसे असेल तर माहितीपुर्ण पोस्टी वाहुन जातील. एकतर कुलकर्ण्यांना हाक मारा अथवा इथली माहिती दुसर्‍या नविन धाग्यात चोप्य पस्ते करा रे कुणीतरी.

पिडीएफ फाईल्स हाताळण्यासाठी एक उपयुक्त सॉफ्टवेअर. वेगवेगळ्या पिडीएफ फाईल्स एकत्र करण्यासाठी किंवा एका फाईलमधील पाने सुट्टी करुन नविन पिडीएफ फाईल बनवण्यासाठी.

http://icecreamapps.com/PDF-Split-and-Merge/

मी सध्या वापरतो ती किंवा पूर्वी वापरलेली सॉफ्टवेअर्स:

  • Drupal/WordPress - Content Management system.
  • Notepad ++ - Source code editor
  • KeePassXC - Password Manager
  • Firefox - web browser
  • Tor Project - For online privacy
  • Mozilla Thunderbird - email and news client, RSS feed reader (replacement of Microsoft Outlook)
  • Greenshot - Screenshot tool with image editor - replacement of Microsoft Paint
  • LibreOffice - replacement of Microsoft Office suite
  • VLC Media Player - replacement of Microsoft Windows media player
  • 7z - File archiver with data compression and encryption (replacement of WinZip)
  • FileZilla - FTP & SFTP client (replacement of WS_FTP)
  • GNU Privacy Guard (GPG) - replacement of PGP
  • Eraser - Securely erase data from Microsoft Windows
  • digiKam - Photo & image organizer (replacement of Adobe Lightroom)
  • GIMP - Photo and image editor (replacement of Adobe Photoshop and Microsoft Paint)
  • Git - distributed version control system (replacement of Microsoft Visual SourceSafe)
  • Calibre - eBook management

सर्व सॉफ्टवेअर ही GPL किंवा AGPL अथवा LGPL लायसेन्सची आहेत.

Submitted by उपाशी बोका on 11 June, 2022 - 09:48
>>
या यादीतील मुक्तस्त्रोत सॉफ्टवेअरला उद्देशुन वापरलेले, "replacement of XYZ" हे वाक्य खटकले.
वरील सर्व मुक्तस्त्रोत सॉफ्टवेअर, त्या त्या डेवलपरने स्वत:च्या उद्देशपुर्तीसाठी तयार केले आहे.
या वाक्यप्रगोयामुळे, "XYZ हे त्या क्षेत्रातले मुख्य सॉफ्टवेर असून, हे बाकीचे सॉफ्टवेअर जास्त माहितीतले नहीत व ज्यांना पैसे द्यायचे नाहीत अशा लोकांनी तयार केले आहे", असा अर्थ निघतो. परंतु तसे नाही.

<< वरील सर्व मुक्तस्त्रोत सॉफ्टवेअर, त्या त्या डेवलपरने स्वत:च्या उद्देशपुर्तीसाठी तयार केले आहे. >>
यात replacement हा उद्देश ही असू शकतो.

Pages