इंटरनेट सर्वीस प्रोवायडर ची माहिती हवी आहे

Submitted by मनीशा on 9 August, 2013 - 23:31

मला इंटरनेट घ्यायचे आहे. घरच्या वापराकरता हवे आहे पण खालील गोष्टी असाव्यात.

१> fast speed
2> wireless network
3> good & uninterrupted service
4> reasonable price (as for home use)

या व्यतीरीक्त जर telecom service provider असेल तर चांगले. MTNL/ vodaphone वगैरे कसे आहेत?

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंटरनेट कुठे हवंय? शहर कुठलं?
काय सोयी हव्यात? मोबाईल ब्रॉड्बॅन्ड (म्हण्जे डाँगल जे की लॅपटॉप वर कुठेही वापरता येतं) की घरीच वापरायचंय?

किती डीवाईसेस वर वापरायंचय? त्यानुसार मग प्लॅन निवडावा लागेल...
विपीएन वापरणारात का?

मुंबई मध्ये हवे आहे. २ laptop शिवाय 1 smart TV मध्ये हवे आहे. डॉगल नको आहे. घरिच वापरणार आहे.

मुंबईत जर ठाण्यात वापरायचं असेल तर एमटीएनएल चांगलं आहे. नवीमुंबईत केबल ब्रॉड्बँड परवडतं. मला माहित असलेला केबल ब्रॉड्बँड चा नवी मुंबईत ला रेट साधारण पणे ४००/- प्रती महिना, १ एमबीपीएस अनलिमिटेड असा आहे.

या तीन ठिकाणी वापरण्यास सोयीचं व्हावं तर वायरलेस राऊटर योग्य राहील. त्यात टिवी ला वायर्ड कनेक्शन घेता येईल. बाकी दोन्ही लॅपटॉप्स + असेल तर फोन, टॅब हे सगळं वायरलेस वापरता येईल.

बेसिक वायरलेस राऊटर १५००-२०००/- पर्यंत मिळेल वाशी/ठाणे मार्केट्मध्ये.

टाटा कम्युनिकेशन्सची लिज्ड लाईन मिळवत असाल तर तिच वापरा. सेल्स नंतरचा सपोर्ट खुप चांगला आहे. इतरांचा विचार करू(ही) नका!

बेसिक वायरलेस राऊटर कोणत्या कंपनीचा चांगला आहे? <<< बाकी राऊटरांचा अनुभव नाही पण नेटगिअरचा चांगला आहे. गेले दीड-दोन वर्षे वापरतोय पण कसलाच ताप नाही.

होम यूज करता लिज्ड लाईन मिळते? काय कॉस्टिंग पडतं पर मन्थ? सर्वीस सगळ्या एरीयामध्ये उपलब्ध आहे का?

smart TV ला wifi connection automatic आहे .तोच घेणार आहोत त्या मुळे tv ला wired connection चा प्रश्न नाहि.

बीएसएनएल, रिलायन्स, टाटा इन्डिकॉम, यु टेलीकॉम्..ह्या सगळ्यांमधे पुण्यात चांगला स. प्रो. कोणता आहे? हल्ली बीएसेन्लवाले मॉडेम विकत नाहीत. ग्राहकालाच ते त्यांच्या घ्यावे लागते व मग व नंतरचे सपोर्टचे काम त्यांच्याकडे रहात नाही. त्यामुळे बिसेनेल्ची जरा भिती वाटते आहे.
नेट कनेक्शन माझ्या सासुबाईंसाठी हवे आहे. त्यांना अनलिमिटेड डाटा चा चांगला प्लॅन हवा आहे. चांगल्यात चांगला व स्वस्तात स्वस्त असा प्लॅन कोणता आहे ? एकच कॉम्प वापरायचा आहे.

सुमेधा - बीएसएनएल चांगलं आहे पुण्यात. मॉडेम आपण जरी घेतलं तरी एवढा प्रॉब्लेम नाही. प्लॅन- ४९९ काँबो अनलिमिटेड चांगला आहे. त्यात लँड्लाईन करता काही कॉल्स फ्री आहेत + ५१२ केबीपीएस ची स्पीड पहिल्या ४ जीबीला आहे, हे चार जीबी संपलेत की २५६ केबीपीएस वर अन्लिमिटेड यूज आहे. जर घरात आलेली फोन केबल अजिबात नॉईज वाली नसेल तर जनरली इंटरनेट ची लिंक छान मिळते.

MTNL चे नेटवर्क घेणार असाल तर (बहुतेक ) त्यांचा वायरलेस राऊटर आहे. मी तो घेतला नाही कारण माझ्याकडे अ‍ॅपलचा आहे.
नेट चालु करुन देणारा माणुस येऊन नेट लावल्यास फोनचा आवाज नीट येत नाही, त्यासाठी स्प्लिटर लागतो असे सांगेल. मग तो स्प्लिटर स्पेशली तुम्हाला फ्री / कमी किंमतीत द्यायचा प्रयत्न करेल आणि सांगेल की खरंतर यासाठी पैसे लागतात पण तुम्हाला म्हणुन देतो. मला थोडे फार काहीतरी समजून द्या. माझा मोबाईल लिहुन ठेवा, हवं तेव्हा येईल.
हे असले काही अजिबात ऐकू नका. स्प्लिटर घ्याच आणि तो फ्री आहे. त्यावर MTNL असे लिहीलेले आहे. जर त्याने सांगितलेच की फ्री नाहीये तर स्प्लिटरची रिसीट द्यायला सांगा. ( हि लाच मागण्याची पद्धत आहे Angry )
MTNL मधे बिघाड असेल आणि तक्रार केली तर लगेच सॉल्व्ह करतात. दिड वर्षात फक्त २ वेळा प्रॉब्लेम आला, तोही लगेच नीट झाला.

सावली राऊटर कुठला आहे? एअर्पोट एक्स्ट्रीम का एक्स्प्रेस? की टाईम मशीन आहे? वापरायला कसा आहे?

धन्यवाद सावली आणि योगेश . mtnl चा xpress combo unlimited 650 घेण्याचा विचार आहे. मला tv वर picture /old serial बघायच्या आहेत. तो data downloading म्हणुन count होतो का की फक्त songs/ files download केला की download पकडतात?

मनीशा, अगदी गूगल जरी ओपन केलं तरी ते काऊंट होतं. त्यामुळे शक्यतो अन्लिमिटेड प्ल्यान पहा...

सावली मी नवीन आलेलं टाईम कॅप्स्यूल पहातोय पण सध्यातरी बजेट बाहेरेते :(. पण एकदम २ टीबी ची हार्डड्राईव मिळेल वापरायला म्हणून मोह!!