गणेशोत्सव २०१२ : स्पर्धांचा निकाल!

Submitted by संयोजक on 6 October, 2012 - 03:27

नमस्कार मंडळी,
गणेशोत्सवातील सर्व स्पर्धांमध्ये आपण बहुसंख्येनी सहभागी झालात, तसेच भरभरून दादही दिलीत, त्याबद्दल संयोजक मंडळातर्फे आपणासर्वांचे मन:पूर्वक आभार.

यावर्षी आम्ही ४ स्पर्धा आयोजित केल्या होत्या.
१. तों.पा.सु. - हस्तकला स्पर्धा
२. गर्जा महाराष्ट्र माझा - गटलेखन स्पर्धा
३. मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम् ! - पाककृती स्पर्धा - गोड विभाग व तिखट विभाग
४. चित्र बोलते गुज मनीचे - काव्य-प्रकाशचित्र स्पर्धा

यातील पहिल्या ३ स्पर्धांचे निकाल जनमत चाचणीने लावण्यात आले आहेत. चवथ्या 'चित्र बोलते गुज मनीचे' या काव्य-प्रकाशचित्र स्पर्धेचा निकाल परीक्षकांकडे सोपवण्यात आला होता. मायबोली परिवारातील श्यामलीउल्हास भिडे यांनी हे परीक्षणाचे काम पाहिले.

या स्पर्धांचा निकाल खालीलप्रमाणे:-

तों.पा.सु. - हस्तकला स्पर्धा

प्रथम क्रमांक - लाजो : मिठास ६९ मते
द्वितीय क्रमांक - नीलू : सुरळीच्या वड्या (खांडवी) ६१ मते
तृतीय क्रमांक - (विभागुन) - sonalisl : ब्राऊन राईस नूडल्सवर्षा व्हिनस : पार्टी टाईम - २७ मते

मतदान इथे पहायला मिळेल.

गर्जा महाराष्ट्र माझा - गटलेखन स्पर्धा

प्रथम क्रमांक - रंग सोन्नलगीचे - लैभारी (विशाल कुलकर्णी, मुग्धानन्द, MallinathK, स्वप्ना_तुषार, कांचन कुलकर्णी) - ८७ मते
द्वितीय क्रमांक - खखाव्रत - "याबायका" (कविन, मंजूडी, अश्विनी के) - ७८ मते
तृतीय क्रमांक - "माणिकमोती" - उनाडके (रोहित ..एक मावळा, Yo Rocks, जिप्सी, सेनापती, इंद्रधनुष्य) - ३१ मते

मतदान इथे पहायला मिळेल.

मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम् ! - पाककृती स्पर्धा - गोड विभाग

प्रथम क्रमांक - किरमीजी गुलाबजाम - सुलेखा - ७४ मते
द्वितीय क्रमांक - 'स्विटी-पाय' - लाजो - ३० मते
तृतीय क्रमांक - सफरचंद मोदक -साक्षी - २७ मते

मतदान इथे पहायला मिळेल.

मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम् ! - पाककृती स्पर्धा - तिखट विभाग

प्रथम क्रमांक - सखो कचोरी - डॅफोडिल्स - ५५ मते
द्वितीय क्रमांक - 'स्पड थाय' - लाजो - ४० मते
तृतीय क्रमांक - सफरचंद-बटाटा थालिपीठ - अगो ३९ मते

मतदान इथे पहायला मिळेल.

चित्र बोलते गुज मनीचे - काव्य-प्रकाशचित्र स्पर्धा

चित्र बोलते गूज मनीचे - प्रकाशचित्र १

प्रथम क्र. अश्विनी के
द्वितीय क्र. (विभागून) क्रांति, देवचार
------------------------------------------------------

चित्र बोलते गूज मनीचे - प्रकाशचित्र २

प्रथम क्र. (विभागून) मामी, के. अंजली
द्वितीय क्र. (विभागून) रैना, पुरंदरे शशांक
------------------------------------------------------

चित्र बोलते गूज मनीचे – प्रकाशचित्र ३

प्रथम क्र. किंकर
द्वितीय क्र. (विभागून) सामी, विनार्च

ज्या मायबोलीकराचा जास्तीत जास्त स्पर्धा व उपक्रमांत उत्स्फुर्त सहभाग असेल अशा सभासदाचा विशेष प्रशंसा पत्र देऊन गौरव करायचा असं आम्ही ठरवलं. तर हा मान मिळवला आहे 'डॅफोडिल्स' यांनी. ही आधी घोषणा मुद्दामच केली नाही कारण आम्हाला त्यातली उत्स्फुर्तता आजमावयाची होती.

सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हायला! संयोजकांचे, परीक्षकांचे आणि मतदारांचे आभार. मजा आली खूप. सर्व विजेत्यांचे अभिनंदन Happy

"गर्जा महाराष्ट्र माझा" मध्ये तीन बक्षिसं काढली! धन्यवाद धन्यवाद.. "याबायका"तर्फे धन्यवाद Happy संयोजक, कधी येताय खखाव्रत करायला? Wink

"चित्र बोलते गुज मनीचे" साठीही धन्यवाद Happy

अरे व्वा! रिझल्ट लागले Happy

सर्व विजेत्यांचे आणि भाग घेणार्‍यांचे हार्दिक अभिनंदन! Happy

धन्यवाद संयोजक आणि धन्यवाद मायबोली परिवार! Happy

गणपती बाप्पा मोरया!! Happy

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! लैभारी सोलापूरी Happy
विशेषकरून लाजोचे.. सगळीकडे झेंडा 'रोवला' आहे Happy
दक्षे, मराठीलाच गाडलेस Happy

वा, लाजोला "तिहेरी मुगुट" मिळालाय की - हार्दिक अभिनंदन .....

इतर सर्व स्पर्धकांचे, विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन....

संयोजक, परीक्षकांचे मन:पूर्वक आभार......

धन्यवाद..

सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन..

स्पर्धा नसली तरीही यानिमित्ताने सर्व चिमुरड्या बालचित्रवाणीचे देखील अभिनंदन... Happy

सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
धमाल स्पर्धांसाठी संयोजकांचे आभार.

Pages