मायबोली गणेशोत्सव २०१२

व्यंगचित्रे - भाऊ नमसकर - भाग २

Submitted by संयोजक on 15 September, 2012 - 18:13

मायबोली परीवारातील श्री. भाऊ नमसकर यांनी गणेशोत्सव २०१२ करता काढलेली व्यंगचित्रे

mankokan1.JPG

**************************************************************************************************

surprise.JPG

व्यंगचित्रे - भाऊ नमसकर - भाग १

Submitted by संयोजक on 15 September, 2012 - 17:33

मायबोली परीवारातील श्री. भाऊ नमसकर यांनी गणेशोत्सव २०१२ करता काढलेली व्यंगचित्रे

prarthanaa.JPG

**********************************************************************************************************

navas.JPG

मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम्! - (पाककृती स्पर्धा) - प्रवेशिका (मुदत संपल्यामुळे प्रवेशिका स्वीकारणे बंद करत आहोत)

Submitted by संयोजक on 15 September, 2012 - 16:22

मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम्! (पाककृती स्पर्धा) - नियम

"मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम्!" या पाककृती स्पर्धेसाठी आलेल्या सर्व प्रवेशिका इथे एकत्र दिल्या आहेत.

टीप :या स्पर्धेसाठी येणार्‍या प्रवेशिका संयोजकांकडून ह्या धाग्याच्या हेडरमधे दिल्या जातील. कृपया धाग्याच्या प्रतिसादात कोणत्याही प्रवेशिकांच्या लिंक्स देऊ नयेत.

**********************************************

प्रवेशिका

गोड

१) किरमीजी गुलाबजाम - सुलेखा.

गर्जा महाराष्ट्र माझा! - (गटलेखन स्पर्धा) - प्रवेशिका (मुदत संपल्यामुळे प्रवेशिका स्वीकारणे बंद करत आहोत)

Submitted by संयोजक on 15 September, 2012 - 16:16

गर्जा महाराष्ट्र माझा! (गटलेखन स्पर्धा) - नियम

'गर्जा महाराष्ट्र माझा' या गटलेखन स्पर्धेसाठी आलेल्या सर्व प्रवेशिका इथे एकत्र दिल्या आहेत.

टीप : या स्पर्धेसाठी येणार्‍या प्रवेशिका संयोजकांकडून ह्या धाग्याच्या हेडरमधे दिल्या जातील. कृपया धाग्याच्या प्रतिसादात कोणत्याही प्रवेशिकांच्या लिंक्स देऊ नयेत.

***********************************************

प्रवेशिका:-

१) गर्जा महाराष्ट्र माझा! - "माणिकमोती" - उनाडके

कंपूचे नाव : उनाडके
ठिकाण: माळशेजघाट परीसर
सहभागी माबोकर:

पुनः (पुनःपुनः) सहप्रवास! - भारती बिर्जे डिग्गीकर

Submitted by संयोजक on 15 September, 2012 - 07:40

'सहप्रवास प्रतिष्ठान' हे आम्हा समविचारी (कधी अविचारीसुद्धा) मित्रमंडळींच्या एकत्र येण्याचं एक नाव. त्याचं असं झालं, प्रज्ञा हरणखेडकर (पूर्वाश्रमीची वैद्य) ही माझी शाळेतली जिवाभावाची मैत्रीण. आयुष्यभर त्या मैत्रीला निभावणारी. आमची घरे एकाच इमारतीत. आम्ही एकाच शाळेत, एकाच वर्गात, एकाच बाकावर. आमच्या कुमारवयात एकमेकींसोबत आम्हाला खूप वेळ राहता आलं. व्रात्य खोड्या, नष्ट चकाट्या, अफाट कल्पना, अगोचर खेळणं, सोबत भोगलेल्या शाळकरी शिक्षा, मरेपर्यंत हसणं, हे मैत्रीचे पायाभूत घट्ट घटक. बाकी फरक अनेक... दोन भावंडांमध्येही असतात ना फरक! मी मनापासून अभ्यास करणारी, उरलेला वेळ तंद्रीत राहणारी.

कहाणी - पुस्तक परिक्षण - बी

Submitted by संयोजक on 14 September, 2012 - 12:40

कहाणी
--------

कहाणी कशी? सरिता जशी
वाहात जाय निर्मळ पाणी
पाण्याला बांध घालता फुटे
आसवांना ही समर्थ वाणी

... एका पुस्तकाच्या मागील बाजुस मी ह्या चार ओळी एका दमात वाचल्या आणि त्यातील पहिल्या दोन ओळींनी माझ्या मनात लगेच घर केले. वाटले होते हे पुस्तक एखादे काव्यसंग्रह असेल पण ते एक छोटेखानी पुस्तक निघाले. दिवसाच्या तीन चार तासात रमतगमत सहज वाचून पूर्ण होईल इतके हलकेफुलके आणि रसरशीत पुस्तक! मी हे पुस्तक दोन तीनदा वाचले तशी मला ह्या पुस्तकाची गोडी आणखी आणखी कळत गेली.

नाते : भक्तीचे आणि मातीचे - ललिता-प्रीति

Submitted by संयोजक on 13 September, 2012 - 11:39

गणपती आले. आता दहा दिवस सगळीकडे मंगलमय वातावरण असेल. "गणपती बाप्पा मोरया" च्या गजराने अवघा आसमंत दुमदुमून जाईल. भक्तीरसाला उधाण येईल. गणेशोत्सवाशी संबंधित काहीही लिहायचे झाले, तर त्याची सुरूवात अशीच करायची पध्दत आहे. पण multitaskingच्या जमान्यात केवळ भक्ती एके भक्ती करून भागत नाही. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना गणेशभक्तीशिवाय इतर अनेक गोष्टी कराव्या लागतात.

सुसरबाईची मोडली खोड, हत्तीच्या नाकाची झाली सोंड! - अरुंधती कुलकर्णी

Submitted by संयोजक on 13 September, 2012 - 11:27

प्रत्येक आदिम संस्कृतीत सृजनाच्या, जीवसृष्टीच्या निर्मितीच्या कथा ऐकायला, वाचायला मिळतात. आफ्रिकेच्या जंगलांत नांदणार्‍या अनेक आदिवासी जमातींमध्ये अशा विविध कथा प्रचलित आहेत. या लोककथांमध्ये त्या त्या प्रांतांतील निसर्ग, प्राणी, प्रथा यांचे प्रतिबिंब दिसून येते. एका कथेनुसार सृष्टी-निर्मात्याने आफ्रिकेत आढळणार्‍या महाकाय, विशाल अशा बाओबाब वृक्षाच्या मुळांतून प्राणी, पक्षी, किड्यांना जगात आणले. त्यातील बरेचसे प्राणी तेव्हा जसे दिसायचे तसेच आताही दिसतात. पण काही प्राण्यांचे रूप व रचना काळाच्या ओघात बदलली.

मांजरांचे घर - शशांक पुरंदरे

Submitted by संयोजक on 13 September, 2012 - 11:19

ते घर इतर कोणत्याही घरांसारखेच - चौकोनी कुटुंब - सुलभा, सुनील, त्यांच्या दोन मुली - सानीया, स्वराली आणि मुलींची आजी.

पण त्या घराची एक खासियत अशी की तिथे मांजरांचा सततचा राबता. काही अधूनमधून भेट देणारी भटकी मांजर जमात तर कधी काही काळ वस्तीला असलेली मांजरे. पण मांजरे असणारच तिथे.

सुलभाला मांजरांची आवड का मांजरांना तिच्याविषयी ओढ हे सांगणे जरा कठीणच. सुनीलला प्राण्यांविषयी प्रेम पण मांजरासारख्या स्वार्थी प्राण्याची जरा नावडच. मुली सहाजिकच आईच्या बाजूने.

देव माझा - दिनेशदा

Submitted by संयोजक on 13 September, 2012 - 11:03

देव माझा...

जसं जसं वय होत जातं, तसं आमच्यावेळी हे असे नव्हते हो, असे सूर आळवायची सवय लागते, नाही का ?
आता मुंबईतल्या गणेशोत्सवाचेच बघा ना. मी असे म्हणू शकतो कि पुर्वी थर्मोकोल नव्हते, रोंबा सोंबा नाच
नव्हता, रासायनिक रंग नव्हते, नवसाला पावणारे बाप्पा नव्हते कि राजे ही नव्हते... पण नाही, एक गोष्ट
मात्र, इतक्या वर्षात बदलली नाही, ते बाप्पाचे रुप.

अगदी लहानपणापासून बाप्पाचे जे रुप मनात ठसलेय, त्याला आजही कुणी विचलीत केलेले नाही, करु
शकणारही नाही. आणि हा बाप्पा असतो तो फक्त या उत्सवातलाच. देवळात हा भेटत नाही. देवळातल्या

Pages

Subscribe to RSS - मायबोली गणेशोत्सव २०१२