मायबोली गणेशोत्सव २०१२

गुप्तता, चित्र चालू आहे! - आशिष महाबळ - aschig

Submitted by संयोजक on 19 September, 2012 - 15:46

(छ. टि. १: भारतीय कथांनुसार चित्रगुप्त, नारद आणि अत्री ही ब्रह्माची मुलं आहेत.
छ. टि. २: खालील संभाषणातील लोक व घटना खऱ्या आहेत आणि कल्पनांशी त्यांचा काहीही संबंध नाही.)

नारद : नारायण, नारायण! चित्रगुप्ता, तू या लोखंडी गजांच्या पलीकडे काय करतो आहेस?
चित्रगुप्त: काय करणार? मी लोकांवर पाळत ठेवतो तशी कोणीतरी माझ्यावर ठेवली.
ना: अरे पण तू केले तरी काय?
चि: मला जसे सर्व कळते तसे तुलाही कळते, तरी सांगतो, ऐक: मी काम करता-करता डुडलींग करत होतो.

सुंदर माझा बाप्पा! - तोषवी - सानिका

Submitted by तोषवी on 19 September, 2012 - 14:46

कलाकाराचे नाव - सानिका
पालकाचा आयडी - तोषवी

'सुंदर माझा बाप्पा' उपक्रमासाठी मी चित्र काढायला घेतलं तेव्हापासूनच सानिकाला त्याला सजवायचं होतं. मग काय तिच्या ट्रेझर बॉक्स मधील ठेवणीतला खजिना बाहेर काढला आणि तिने तिच्या बाप्पाला सजवलं!

IMG_1601.JPG

बालचित्रवाणी - सावलीची बाहुली (सावली)

Submitted by संयोजक on 19 September, 2012 - 14:05
मायबोली आयडी - सावली
कलाकाराचे नाव - सावलीची बाहुली
वय - पावणे सहा वर्ष

लिंक - http://youtu.be/azqZik60eCM


कार्यक्रमाचे नाव - पिंकीचा गणपती

आज आम्ही पपेट शोच्या माध्यमातून गोष्ट सांगायचा प्रयत्न करणार आहोत.

तों.पा. सु. - स्वीट ट्रीट - प्राजक्ता_शिरीन

Submitted by प्राजक्ता_शिरीन on 19 September, 2012 - 00:09

फेल्ट पासून बनवलेले गोड पदार्थ -

१. केक आणि त्यावर स्ट्रॉबेरी
२. कँडी
३. चॉकलेट कुकीज ( त्यावर M & M गोळ्या )
४. डोनट

विषय: 

कोणते वाहन घ्यावे? - मामी

Submitted by संयोजक on 18 September, 2012 - 14:01

सप्टेंबरचा महिना. पाऊस संपल्यात जमा आणि ऑक्टोबर हीट सुरू झाल्यात जमा असा हा काळ. दुपारचं जेवण जेऊन साजिरा त्याच्या केबिनमध्ये एसीच्या थंडगार झुळकांमध्ये गुबगुबीत झुलत्या खुर्चीवर बसून, टेबलावर पाय पसरून गाढ झोपला होता. दुपारी ऑफिसमध्ये कस्टमर सहसा यायचाच नाही. एखाद-दुसरा चुकार वाटसरू आलाच तर किशन होताच बाहेर. तो बघून घ्यायचा.

शिवगौरीच्या बाळा - सूरमाय (३)

Submitted by संयोजक on 18 September, 2012 - 13:45