तंदूर

Submitted by अंजली on 17 November, 2021 - 00:38

उन्हाळ्यात किंवा इतर वेळीही स्वच्छ दिवस, चांगले तापमान वगैरे बघून बार्बेक्यू करणं इथं खूप कॉमन आहे. कबाब वगैरे कोळशाच्या बार्बेक्यूवर करता येतात पण कोळशावर भाजलेले नान, रोटी किंवा तत्सम प्रकार करून बघण्यासाठी तंदूर घ्यावा असं वाटत होतं. किंमती बघितल्यावर 'कुठे इतका वापरला जाणार आहे' म्हणून आपसूकच ऑप्शनला टाकलं जात होतं. एकदा यूट्यूबवर कोणीतरी घरी तंदूर केलेलं पाहिलं तेव्हापासून डोक्यात घरीच तंदूर करायचं घोळू लागलं. त्यातच एका क्लायंटनं 'outdoor kitchen' डिझाईन करण्याबद्दल विचारलं. त्याला मोठ्या आकाराचा तंदूरही हवा होता. बरंच संशोधन वगैरे करून, मिनोतीला माती बद्दल, तंदूर भाजण्याबद्दल काही माहिती विचारून घरीच प्रयोग करून बघायचं ठरवलं. सामानाची जमवाजमव केली. चुकत माकत, दुरूस्त्या करत तंदूर बनवला.

बेसिक आकारासाठी टेराकोटाच्या कुंड्या वापरल्या.
WhatsApp Image 2021-06-01 at 10.35.54 PM.jpeg

त्याचे बेस कापून टाकले.
WhatsApp Image 2021-06-01 at 10.35.54 PM(1).jpegWhatsApp Image 2021-06-01 at 10.35.55 PM.jpeg

कुंड्या एक्मेकांवर उपड्या ठेवून मातीनं लिंपन करायचं ठरवलं.
WhatsApp Image 2021-06-01 at 10.35.55 PM(1).jpeg

त्यासाठी लागणारं सामान - वाळू, माती, फायर क्ले, सिमेंट, गवत वगैरे जमवलं
WhatsApp Image 2021-06-01 at 10.35.55 PM(2).jpegWhatsApp Image 2021-06-01 at 10.35.55 PM(3).jpegWhatsApp Image 2021-06-01 at 10.35.55 PM(4).jpeg

सगळं कालवून लिंपण करायला सुरूवात केली.
WhatsApp Image 2021-06-01 at 10.35.55 PM(5).jpegWhatsApp Image 2021-06-01 at 10.35.55 PM(6).jpeg

दोन्ही कुंड्यांमधल्या फटी नीट बुजवून आतून आणि बाहेरून लिंपण केलं.
WhatsApp Image 2021-06-01 at 10.35.56 PM(1).jpegWhatsApp Image 2021-06-01 at 10.35.56 PM.jpegWhatsApp Image 2021-06-01 at 10.35.56 PM(2).jpeg

या कुंड्या एका पत्र्याच्या ड्रममधे ठेवल्या.
WhatsApp Image 2021-06-01 at 10.35.56 PM(3).jpeg

आजूबाजूची जागा वाळू, मीठ, perlite घालून वरून सीमेंट लावून बंद केली.
WhatsApp Image 2021-06-01 at 10.35.56 PM(4).jpegWhatsApp Image 2021-06-01 at 10.35.56 PM(5).jpeg

तंदूरला तेल, पालक, ताक वगैरे मिश्रणाचा लेप देऊन 'सीझन' केलं. मंद आचेवर तंदूर आतून 'भाजला'.
WhatsApp Image 2021-06-01 at 10.35.56 PM(6).jpegWhatsApp Image 2021-06-01 at 10.35.56 PM(8).jpeg

सुरवातीला नान चिकटत होते पण जसं जसा तंदून सीझन होत गेला, तसतसे नान छान निघू लागले.

WhatsApp Image 2021-11-18 at 7.43.53 PM(1).jpegWhatsApp Image 2021-11-18 at 7.43.53 PM(3).jpegWhatsApp Image 2021-11-18 at 7.43.53 PM(4).jpegWhatsApp Image 2021-11-18 at 7.43.55 PM.jpegWhatsApp Image 2021-11-18 at 7.43.54 PM(1).jpegWhatsApp Image 2021-11-18 at 7.43.53 PM(4).jpegWhatsApp Image 2021-11-18 at 7.48.10 PM.jpeg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारीच... किती छान तंदूर बनवलात हो अंजली..!! डेडीकेशन्स हां.. Bw

तंदूर नान तर बनतीलच पण चिकन तंदूर, कबाब्स, तंदूरी बटाटा पण छान बनेल यात.

तंदूरला तेल, पालक, ताक वगैरे मिश्रणाचा लेप देऊन 'सीझन' केलं.

हे नक्की का करावं लागतं , म्हणजे फक्त मातीवर रोट्या, नान इ. नीट चिकटत नाहीत म्हणून कि इतर काही कारण?

कसलं भारी!!
यातल्या रोटी चा पण फोटो पाहिजे, क्लायंट ने दिले तर.

अमेझिंग आहे हे! एखाद्या नानचा फोटो पण टाका ना.
एकूण खर्च किती आला तरी? आणि विकतचा आयता तंदूर कितीला येतो? ही आपली उगीचच चौकशी Happy

हे खूपच मस्त झाले आहे. नथिंग लाइक तंदुरी एनि थिंग. पेटं ट घेउन टाका. व छान छान पदार्थांचे पण फोटो द्या.

अंजली आणि मिनोती, तुम्ही दोघीही ग्रेट आहात! फारच भारी आहे हे! शेवटचा रसरशीत तापलेल्या तंदूरचा फोटो मस्त!

भारीच झालयं हे...

याला तंदूर च म्हणतात कि तंदूरची भट्टी ?

अंजली आणि मिनोती, तुम्ही दोघीही ग्रेट आहात! फारच भारी आहे हे! शेवटचा रसरशीत तापलेल्या तंदूरचा फोटो मस्त! +१

_/\_ _/\_ _/\_ त्रिवार दंडवत तुम्हा दोघींना.

ते मॅरिनेटेड कोंबडी घेऊन कधी येऊ म्हणता ? Lol

कसलं भारी DIY प्रोजेक्ट आहे हे. ग्रेट.
इतक्या मेहनतीनंतर ते भाजलेले खरपूस नान खायला काय मज्जा येत असेल ना!

शहरी ब्लॉक पद्धतीच्या घरांत वापरणे शक्य नाही. त्यासाठी gas तंदुर हवा.
चेंबुर camp भागांत बिस्किटाच्या मोठ्या डब्यांना माती लिंपून बनवलेला वापरत.

तंदूरला तेल, पालक, ताक वगैरे मिश्रणाचा लेप देऊन 'सीझन' केलं.
हे नक्की का करावं लागतं , म्हणजे फक्त मातीवर रोट्या, नान इ. नीट चिकटत नाहीत म्हणून कि इतर काही कारण?>>>>>

तंदूरची आतली बाजू 'नॉनस्टीक' व्हावी म्हणून हा लेप द्यावा लागतो. रेस्टोरंटसमध्ये रात्री किचन बंद झाले की लेप लावतात आणिअगदी मंद आच ठेवतात.

अनु, हा मी शेवटी आमच्यासाठीच ठेवला. क्लायंटला पुढच्या उन्हाळ्यात करून देणार आहे.

एकूण खर्च किती आला तरी? आणि विकतचा आयता तंदूर कितीला येतो? ही आपली उगीचच चौकशी >>> साधारण $१५०. काही सामान उरले आहे, त्यात अजून चार तंदूर होतील Proud . या आकाराचे तंदूर कमर्शिअल आकाराचे समजले जातात. त्यांची किंमत साधारण $२००० च्या आसपास असते. छोटे घरगुती वापराचे तंदूर $७५० पर्यंत मिळतात. पण आकार अगदीच लहान असतो.

हा गॅस बर्नरवर पण चालू करता येईल. पुढच्या उन्हाळ्यात तो प्रयोग करून बघणार आहे.

पण अनुभवावरून कळलं की कबाबसाठी कोळशाचा बार्बेक्यू उत्तम. तंदूर नान रोट्यांसाठी चांगला आहे.

WhatsApp Image 2021-11-18 at 8.11.52 PM(1).jpegWhatsApp Image 2021-11-18 at 8.11.52 PM.jpeg

धनि,

ती मॅरीनेट केलेली कोंबडीपण मिळेल इकडे. Happy

विस्तव नेमका कुठे पेटवायचा? >>> चौथ्या फोटोत खालच्या बाजूला (बेसला) चार इंचाचा (तीन बाजू असलेला) चौकोना सारखा आकार कापलेला दिसतोय. ड्रममधे तंदूर ठेवल्यावर त्या चौकोनाच्या समोर येईल असा चौकोन ड्रमला देखिल पाडायचा. तिथून कोळसा, लाकूड वगैरे घालता येतं. विस्तव पेटवता येतो, राख काढता-साफ करता येते. ते ओपनिंग कमी जास्त झाकून आच मोठी - कमी करता येते. चुलीसारखंच टेक्निक आहे.

Pages