नवीन घरासाठी लागणारी भांडी - यादी

Submitted by किल्ली on 12 January, 2022 - 03:09

नवीन घरात राहायला जाणार असाल तर कोणती भांडी असायला हवीत?
Basic यादी देते आहे.
जुन्या घरातून नवीन घरात जाताना किंवा नवीन संसार थाटणाऱ्यांना उपयोग होईल.

.
देवपूजेचे साहित्य
ताम्हण, पळी, कलश इत्यादी
पिण्याचे पाणी भरून ठेवण्यासाठी हंडे, कळशी
स्टील च्या बादल्या इत्यादी
..

फराळाचे चमचे, स्वयंपाकाचे मोठे चमचे (पळी, उलथणं इत्यादी)
विळी
चाकू
सालकाढणी
स्टीलची कढई
परात
पोळपाट लाटणे
पातेली 4
चहासाठी कप बशा, गाळणी
कडची
किसणी
Lighter
तिखटमीठाचा डब्बा
तेलाचा कावळा
मीठाची बरणी
कढई
पातेली

.
Cooker, डब्बे
मिक्सर
Induction / गॅस स्टोव्ह, सिलिंडर
Induction वर चालणारे cookware
कात्री
.
पाण्याची रिफील, dispensar
.
ताटे 6
वाट्या 6 (लहान, मोठ्या )
पेले 6
तांबे 6
तवा
फराळाच्या प्लेट्स (खड्डे असणाऱ्या )
(Dinner set असेलतर )
.
सरबताचे पेले
चहा/ कॉफी /दूध पिण्यासाठी कप/मग
ट्रे
.
अजून काही आठवलं तर भर घालूया

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

What is कडची?
पक्कड, चिमटा, लिंबू पिळायचं जे काही असतं ते.
धान्य, पिठं, मसाले, इ. स्टोअर करायला वेगवेगळ्या आकाराचे डबे / बरण्या. तयार खाद्यपदिर्थ ठेवायला डबे, बरण्या.
प्रेशर पॅन
तवे - चपाती साठी, डोशांसाठी, भाकरी साठी.
चाळण्या,
भाज्या, डाळ तांदूळ इ. धुण्यासाठी ( यांना काहीतरी नावं आहेत)
इडलीपात्र ( इडली ढोकळा आळुवड्यांसाठी three in one मिळतं)

---+
तांबे सहा कशाला?

- विविध गोष्टी पुसण्यासाठी फडकी - जुने कपडे फाडून तयार करता येतात बऱ्याचदा.
- फ्रीज (मिक्सर वरच्या यादीत आहे म्हणून)
- भांडी झाकता येतील अशा ताटल्या

स्टी लच्या बादल्या घेउ नका. त्यात इलेक्ट्रिक वॉटर हीटर रॉड लावता येत नाही. प्लास्टिकच्या दोन व एक टब ज्यात कपडे भिजवता येतात
व एक बारकी घ्या ज्ये ना किंवा मुले उचलू शकतील अशी. ही पोछा करताना पण उपयोगी येते. प्लास्टिक मग व बादली प्रत्येकी एक बाथरूम मध्ये.

इतके स्टीलचे मेटलचे कशाला घेता. एक पॅन एक दोशा तवा व एक आमलेट साठी. दोन सॉस पॅन एक इलेक्ट्रिक कुकर आय पी घ्या.
तळण करू नका. एअर फ्रायर घ्या.

ताटे वाट्या भांडी कोन वापरते? मेलामाइन चा प्लेट चा से ट. तोच जेवायला तोच ब्रेफा.

मावे सेफ भांडी व काचेची भांडी पाहिजेत कि नाही.

स्टीलच्या चार बाटल्या पाणी भरून ठेवायला. भांड्यात घेउन कोण पिते आजकाल?

कॉफीचा मग माणशी एक. व फ्रेंच प्रेस कॉफी साठी एक

भाज्या, डाळ तांदूळ इ. धुण्यासाठी ( यांना काहीतरी नावं आहेत) >>>>> रोळी
कडची>>>> सांडशी, चिमटा, पकड
दुध दह्याची वेगळी भांडी हवीत.
उरलेलं अन्न काढून ठेवायला शक्यतो मायक्रो सेफ भांडी.
साठवणूकीसाठी छोट्या बरण्या ते मोठे डबे (डाळ!तांदूळ, कणिक)

अर्थ एशिआ साइट आहे तिथे मस्त सिरॅमिकची भाडी व माल आहे. शोधा गुगल करा. लिंक देणे साइटच्या धोरणात बसत नाही.

कडची म्हणजे काय? आणि तांब्ये सहा कशाला? यासाठी +१
Happy
ताक घुसळायची रवी (ताक मिक्सरमध्ये केलं तरी नंतर थोडं घुसळलं की लोण्याचा गोळा चांगला येतो)
एग बीटर (हाताने वापरण्याचा, स्प्रिंगसारखा असतो तो ) आणि हँड ब्लेंडर ( आंबोळीचं पीठ वगैरे भिजवताना गुठळ्या होऊ नये म्हणून याचा चांगला उपयोग होतो)
इडली डोसे भरपूर वेळा करत असल्यास वेट ग्राइंडर

अगदी नवीन संसार स्थापन करणे खूप अवघड असते
सर्वांच्या नशिबात आयते भेटत नाही.
सुरुवात खोली भाड्या नी घेण्या पासून होते आणि तेव्हा पगार खूप म्हणजे खूप कमी असतो.
मी लग्न झाल्या नंतर room भाड्या नी घेतली तेव्हा लग्नात घातलेली सोन्याची चैन गहाण ठेवली होती
बायको च्या हातात असणारी एक सोन्याची बांगडी गहाण ठेवली होती.
आता अतिशय उत्तम स्थिती मध्ये आहे पण सुरुवात खूप संघर्ष मय होता.
भाड्याचे घर जावून आज सुसज्य स्वतःचे घर आहे मुंबई मध्यें

तेलाचा कावळा>>>हे काय आहे.

छोटा खलबत्ता-लसूण ठेचणे,चहासाठी आलं ठेचणे,इलायची कुटणे (थोडी लागते तेव्हा)

तेलाचा कावळा म्हणजे तेलाचे छोटे भांडे किंवा बुटकुले

पोह्याचे चमचे आणि डिश ६ प्रत्येकी
खडे मसाले ठेवण्याच्या बरण्या ( छोट्या असतात ) वेलची जायफळ ओवा जिरा मिरे लवंग ठेऊ शकता

आमच्याकडे होता तेलाचा कावळा. अशी चोच असलेली बुधली असते.
__________-
@हेमंत - कौतुक आहे. पण स्ट्रगलल्सचे / धकाधकीचे दिवसच मस्त बाँडींग करतात. छान आठवणी निर्माण करतात.

ताटे वाट्या भांडी कोन वापरते? मेलामाइन चा प्लेट चा से ट. तोच जेवायला तोच ब्रेफा.>>
मी वापरते, फक्त मी सेक्शन्च्या स्टिलच्या प्लेट आण्ल्या आहेत
म्हणजे एकाचे वेळेस चार आयटम सर्व्ह करता येतात्,वेगळ्या वाट्या लागत नाही ,डिशवॉशरला लावल की झाल. आता स्टोरेज शिवाय कुठेहि प्लास्टिक आणि नॉनस्टिक वापरत नाही एकतर स्टीलची भान्डी,पॅन आहेत , स्पेशल ऑकेझन्साठि ग्लास किवा सिरॅमिक वेअर पण डेली युझ ला ते ते जमत नाहीत घाइत फुटाफुटी होतेच.
मेलामाइन्चा डीनर सेट आइकडे होता, पिवळा पडायला लागल्यावर टाकुन दिला.सासरी पण आहे,काहि दिवसानी त्या पिवळ्या पडतात,मला त्याच्या लुक अजिबात आवडत नाही,त्यापेक्षा सिरॅमिक प्रिफर करेल केव्हाही.
हेहि वाचा Is melamine as bad as plastic?
Even though melamine dishware doesn't look like plastic, melamine can leach into food after dishes are repeatedly microwaved or used to hold both hot and acidic foods (3). ... Bottom line: stay away from dishes and containers made of plastic and melamine.

पुरणपोळीचे यंत्र - गृहिणीला येत नसली तरी कुणी ना कुणी ज्ये.ना येतात नि मग लागतेच. अगदी सुरूवातीपासून हवे. भले वापरले नाही तरी चालेल. घरात असण्याचेच ९५ गुण असतात.
मोठा - बत्ता नारळ वाढवायला लागतो.
कातणे इ नैमित्तिक गोष्टी - ह्या जरा उशीरा जमवल्या तरी चालतात. मुरड, मोदक हातानेच करणे सोपे पण नसेल हौस तर साचे हवे.
झारा, उलथने, डाव इ चा सेट मिळतो.
फुलक्याचा चिमटा/जाळी

मुख्य म्हणजे सर्व प्रकारचे चमचे !
(राजकारण्यांचे असतात तसे नाही... टीस्पून, टेबलस्पून, मिसळणातले, "अमिताभ" चमचा इ इ)

पुरणपोळीचे यंत्र - गृहिणीला येत नसली तरी कुणी ना कुणी ज्ये.ना येतात नि मग लागतेच. अगदी सुरूवातीपासून हवे. भले वापरले नाही तरी चालेल. घरात असण्याचेच ९५ गुण असतात.>> हे कोणत यन्त्र?

पुरणपोळीचे यंत्र - गृहिणीला येत नसली तरी कुणी ना कुणी ज्ये.ना येतात नि मग लागतेच>> हे कधीच विकत घेऊ नये.. शेजाऱयांकडे असतंच म्हणू त्यांच्याकडूनच आणावे Proud

९५ गुण शेजारणीला Wink
प्राजक्ता - पुरण वाटायचं यंत्र गं... ३५ मार्काने पास होणार्‍याला ही व्याख्या कशी चुकली विचारू नाही Wink

शेजाऱयांकडून आणता येतील अशी भांडी-
पुरण यंत्र
अप्पे पात्र
करंजीचा, चकलीचा, मोदकाचा साचा
बिरयाणीसाठी लागणारा भला मोठा टोप
८ लिटरचा कुकर
हॅंड मिक्सर (कधी कधीच केक बनवणाऱयांसाठी)
अजून आठवेल तसं लिहीते

Lol आपल्या वास्तुशांतीलाच शेजारणीला ही लिस्ट द्यायची - "काकू, आम्ही इथे राहायला येणार तर तुम्ही ही भांडी जमवा... Lol

हो ना.. आजकाल मला हिच चिंता लागलेली असते की पुढच्या महिन्यात नविन घरी रहायला जाणार, तिथल्या नविन श्जाऱयांकडे वरच्या लिस्टितली भांडी असतील की नाही Proud

हे कधीच विकत घेऊ नये.. शेजाऱयांकडे असतंच म्हणून त्यांच्याकडूनच आणावे >> Lol
"काकू, आम्ही इथे राहायला येणार तर तुम्ही ही भांडी जमवा.>> Lol

म्हाळसा देवी Lol
आम्हाला लागतात ६ तांबे/ पेले Happy
इथे का असं विचारल्यानंतर लक्षात आलं की सगळ्यांना नसेल गरज Proud
सर्वांनी छान भर घातली आहे, थोड्या वेळात यादी update करते.
.
कडची - चिमटा /सांडशी

पुरणयंत्र अजिबात घेऊ नये स्वत: किंवा शेजार्याकडून त्यापेक्षा चाळणी घ्यावी धुवायला, वापरायला सोपी.
शक्यतो प्लास्टिक नॉनस्टिक टाळावे.

पुरणयंत्रः येस १ विरूद्ध नो २
(आहे आता धाग्यात शतकी पोटेंशियल!! Lol )

भरतजी, कोयता किंवा गृहिणीला जे सोयीचं हत्यार ते. कोयत्याचा नारळ वाढवणे व्हिडीयो यूट्यूबवर बघायला लागेल.

मीही पुरणासाठी चाळण वापरते आणि पुरणयंत्र श्रिखंड बनवण्यासाठी वापरते. पण पाट्यावरच्या पुरणाची चवच निराळी.

आदरणीय सीमंतिनीजी , गृहिणीला - नारळ फोडणार्‍या व्यक्तीला.
फोडण्याआधी अनेकदा नारळ सोलावाही लागतो. वरचं साल काढलेलं असलं तरी भरपूर तुसं असतात.

स्वयंपाकघरात काम करता करता यु ट्यूब व्हिडियो पाहता येतील यासाठी काय करता येईल?

Pages