क्रिएटीव्ह बनूया , चुली बनवूया घरच्या घरी

Submitted by शांत माणूस on 24 October, 2021 - 02:40

माझी आजी पाच पाच बर्नरची चूल फक्त दगड आणि मातीचा वापर करून करायची. खेड्यात चुली शेणाने सारवतात. तिला आजूबाजूला चूल बनवायला बोलवायचे. त्या चुलीला धुराडे पण असायचे. लहान असताना कुणाकडे जाताना मला घेऊन जायची तेव्हां चूल बघताना बघत बसायचो. त्यामुळे ही आवड निर्माण झाली.

आता स्मार्ट चुली आहेत. बंद असलेलं ड्रम टाईप वॉशिंग मशीन, भंगारातला पत्र्याचा तेलाचा बॅरल, बैठं प्लास्टीकचं स्टूल हे सर्व फेकून देऊ नका. याच्यातून आपण चुली बनवूयात. कमी धूराच्या चुली. ज्यांना अजिबातच धूर नको त्यांनी या धाग्यापासून स्वतःला लांबच ठेवावे. पर्यावरण वाल्यांनी पण थोडा संयम बाळगावा.
इंधन म्हणून कोळसा तर आहेच. पण पुण्यातल्या आरती या संस्थेकडून चावून चोथा झालेल्या उसाच्या चिपाटाचा कोळसा बनवतात. कारखान्यात जो उसाचा फेकून द्यायचा भाग असतो तो ही कोळसा बनवायच्या कामाला येतो. पुण्यात एक चक्कर मारली तर वर्षभराचा कोळसा घेऊन यायचा. ते घरपोच सुद्धा पाठवतात.

या धाग्यावर चुली बनवण्याच्या काही पद्धती आहेत.

१. थ्री - इन वन चूल . ज्यांना शक्य आहे त्यांनी फायर ब्रिक किंवा रिफ्रॅक्टरई सिमेंटचा वापर केला तर उत्तमच.
https://www.youtube.com/watch?v=91-DUhmDMcQ&t=641s

२. बाल्कनी किंवा टेरेस वर करता येईल असे साधे डिझाईन
https://www.youtube.com/watch?v=SJaUDTBaKX4

३. इलेक्ट्रीक टोस्टरसाठी का पैसे घालवा. चूल विथ मूल (टोस्टर)
https://www.youtube.com/watch?v=HsNUJpnUyuc

४. खराब, झालेलं , चिरलेलं टब आहे का ? एक सेलोटेप लावा आणि हो जाओ शुरू
https://www.youtube.com/watch?v=PKfPfOAJHeI

५. पडून असलेला बॅरल भंगारवाल्याला द्यायचाय ? थांबा कि जरा. आधी हा व्हिडो बगा.
https://www.youtube.com/watch?v=pC48dSdLU3k

६. उभा बॅरल नको ? आडवा पाहीजे ? बरं मग तसं तर तसं..
https://www.youtube.com/watch?v=Kr9FT9d7eLs

७. पाणी तापवायचा जुन्या पद्धतीचा गिझर, बॉयलर, बंब फेकून देऊ नका. इथून आयडीया घ्या.
three in one wood stove creative ideas

८. स्मार्ट वॉशिंग मशीन बंद पडलं की खूप खर्च काढतं. मग सेमी ऑटोमॅटीक घेऊन भंगारवाल्याला देऊन पाचशे रूपये कमवण्याचे मनसुबे सुरू होतात. त्यासाठी वेगवेगळ्या आयडियाज.

अ) जुनी मशीन
https://www.youtube.com/watch?v=0bfkXPdD0-s
ब) वॉशिंग मशीनचा ड्रम
https://www.youtube.com/watch?v=lR9G6-GJUms

९. बैठं स्टूल चिरलं असेल तर तात्पुरतं फेविकॉल किंवा अरल्डाईट लावा. सेलोटेप लावा आणि या व्हिडीओतून आयडिया घ्या
https://www.youtube.com/watch?v=KZ_ZQZGshAU

१०. ही चूल बहुपयोगी आहे पण कौशल्य लागणार आहे. अवघड पण नाही इतकी
https://www.youtube.com/watch?v=14vBeuPaHkg

आवडले का व्हिडीओज ? बनवणार ना ? बनवून व्हिडीओज टाका.
आपल्याकडे यापेक्षा कल्पकता असेलच. ती ही शेअर करा.

चला मग, सुरू करूयात ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान कल्पना आहे. विडिओ अजून पाहिले नाही. पण एक प्रश्न आहे. अश्या चुलींना मोकळी जागा लागेल ना. चार भिंतींच्या बंद फ्लॅटमध्ये राहत असाल तर शक्य नाही ना?

मोकळ्या जागेत रहायला जाणे शक्य आहे
>>>
शक्य असेलही पण सोपे बिलकुल नाही. सारी लाईफस्टाईल बदलते.
असो हा वेगळ्या धाग्याचा विषय आहे. तुर्तास हे आमच्या कामाचे नाही हे समजले ईतके पुरेसे Happy

ऋन्मेष आणि एसआरडी, तुम्ही टीपी करत नसाल तर व्हिडीओ पाहिल्यावर सगळी कल्पना येईल.
बंद फ्लॅटचा उल्लेख धाग्यात नाहीच. बाल्कनी किंवा टेरेस म्हटले आहे. बंद फ्लॅट ही रिक्वायरमेंट असेल तर थोडी क्रिएटिव्हिटी दाखवून ती शेअर करा.

टीपी नाही हो.
१.चूल म्हटली की इंधन हवे.
२.लाकडं किंवा मुद्दामहून विकत आणावी लागतील ती शहरात कुठे मिळणार? पुन्हा साठवण कुठे?
३.कोकणातल्या वाडीत सुपारीचं झापं असतात ती वापरली जातात. म्हणजे त्याची विल्हेवाट अधिक उपयोग दुहेरी फायदा.
४. उसाच्या चिपाडापासून वापरता येईल अशा आकारात पेलेट बनवलेले वापरायची चूल राष्ट्रीय प्रयोगशाळेने निर्माण केलेली चूल मी पंधरा वर्षांपूर्वी पाहिली आहे. तयारच मिळते,आटोपशीर आणि पेलेट वीसपंचवीस किलो आणून ठेवू शकतो. पण या चुलीचं प्रारूपच चुकीचं होतं. त्याला कंपुटरचा कूलिंगचा पंखा लावलेला आहे. तो (विजेवर)चालू ठेवला तरच निळ्या ज्योतीने जळण पेटतं. पंखा बंद ठेवला तर चिपाडं चांगली पेटती राहात नाहीत. शिवाय चिपाडावर प्रक्रिया करावी लागते.
५. चुलीचा मुख्य उद्देश आता शेतीवाडीतलं मिळणारं लाकुडफाटा इंधन वापरणे आहे. शहरात { बाल्कनी/टेरेसवर }ती करणं म्हणजे उलट प्रवास वाटतो.
६. तुमचा फोटो शेतीवाडीतला वाटतोय. तुमच्याकडे जळण आहे. ते वापरता येणारी चूल हवी.
७. विडिओ पाहिले. पण ते चूल कशी करायची याबद्दल आहेत. म्हणजे मुख्य विषय हा आहे की त्यांच्याकडे जळण उपलब्ध आहे ते वापरायची चेल करणे. शहरात बाल्कनी किंवा टेरेसवर करणे हा विषय वेगळा आहे. जळण आणावे लागत असेल तर काय उपयोग?

कमी धूराच्या चुली. ज्यांना अजिबातच धूर नको त्यांनी या धाग्यापासून स्वतःला लांबच ठेवावे. पर्यावरण वाल्यांनी पण थोडा संयम बाळगावा.
इंधन म्हणून कोळसा तर आहेच. पण पुण्यातल्या आरती या संस्थेकडून चावून चोथा झालेल्या उसाच्या चिपाटाचा कोळसा बनवतात. कारखान्यात जो उसाचा फेकून द्यायचा भाग असतो तो ही कोळसा बनवायच्या कामाला येतो. >>> हेडर मधे आहे हे. कोळशाच्या वखारीत कोळशाचं पोतं मिळतं.. ज्यांना ते नको त्यांच्या साठी उसापासून कोळसा. धागा नीट वाचला तर कुणासाठी आहे हे स्पष्ट होईल.

शहरात बाल्कनी किंवा टेरेसवर करणे हा विषय वेगळा आहे. >>> नाही. तो वेगळा विषय नाही. ज्यांना शक्य आहे त्यांच्यासाठीच आहे. बाल्कनी आणि टेरेस असे स्पष्ट म्हटले आहे. ब-याच फ्लॅट्सना मोठी टेरेस असते. कॉमन टेरेसचा उपयोग शक्य असेल तरच. बैठी घरे आहेत त्यांनाही शक्य आहे. रो हाऊस असेल तरा स्वतःचे टेरेस असतेच. ज्यांना शक्य नाही त्यांनी समजून उमजून घ्यावे. किंवा दुसरी कुठली कल्पकता असेल तर लढवून ती आयडिया शेअर करावी इतकेच. आरती मधे मी अनेक वेळा गेलो आहे. त्यांच्याकडे एकच चूल नाही. अनेक डिजाईन्स आहेत. फॅनवाली मी तरी नाही पाहिली. आरतीचीच चूल वापरा असे कुठे म्हटलेले नाही.
फक्त पावसाळ्यात वखारीत कोळसा मिळत नाही. मिळाला तरी तो ओला असतो. त्यामुळे तो जास्तीचा घेऊन ठेवावा लागतो. मी भवानी पेठेतून कोळसा आणायचो. आमच्याकडे चुलीवर पाणी तापवायचो. कधी कधी खूप जणांचा स्वयंपाक असेल तर तो चुलीवर व्हायचा. फ्लॅटमधे पत्र्याचे बार्बेक्यु बनवले होते. त्यासाठी कोळसाच लागतो. त्यावर एक चिमणी बनवून बाहेर धूर काढला आहे. कुठेच पंख्याची गरज लागली नाही. नॅचरल ड्राफ्ट चालतो. दगडी कोळशाच्या भट्टीला फोर्स्ड (पंखा) ड्राफ्ट लागतो. आपल्याला तशी काही गरज पडत नाही.

फ्लॅट मध्ये चूल? आणि मग अग्नी सुरक्षेचे काय? स्वतः बरोबरच इतरांचा जीव धोक्यात घालायची परवानगी तुम्हाला कोणी दिली?

शांत माणुस, बंगला, फार्म हाऊस, खेडेगावातील घर यासाठी तुम्ही दिलेले पर्याय उपयुक्त आहेत. तुम्ही तसं लिहिलं आहेच, पण फ्लॅटचं टेरेस हा पर्याय मात्र योग्य वाटत नाही.
Srd, छान मुद्दे. पोस्ट आवडली.
मोद, मलाही HSE ( health, safety, environment) हेच 3 मुद्दे डोक्यात आले

मोद, तुम्ही धागा नीट वाचलेला असावा , त्यामुळे हा प्रश्न मला उद्देशून नसावा असे वाटते. प्रतिसादावर प्रश्न असेल तर प्रश्न कुणासाठी आहे हे कळवा. किंवा एकदा आरती या संस्थेत जाऊन या.

केरोसीनचा स्टोव्ह, केरोसीनचा डब्बा बंद होऊन फार काळ लोटलेला नाही.
त्याची जागा एलपीजी गॅस सिलिंडर आणि स्टोव्ह ने घेतली आहे. आता पाईप्ड गॅस आला आहे.

यात अग्नीसुरक्षा आहे आणि चुलीत नाही हे कसे काय हे जाणून घ्यायला खूप आवडेल.

केवळ व्हिडिओज च्या लिंक्स देण्याऐवजी त्या त्या मॉडेलविषयी दोनचार वाक्यात माहिती, एखादे चित्र आणि एखाद दोन फायदे तोटे असे दिले असते तर अधिक उपयुक्त आणि वाचनीय लेख झाला असता असे मावैम.
पुढील मजकूर पर्यावरणाची अवांतरे या धाग्यावर हलवला आहे.

छान आहे धागा.
जिज्ञासा , दिलेली लिंक छान . बरीच नवीन माहिती मिळाली.

या धाग्याचा हेतू फक्त चूल बनवण्याची कला. क्रिएटिव्हिटी आहे. व्हिडीओमधे अगदी साग्रसंगीत तो विषय दिलेला असल्याने ते पुन्हा लिहीणे हा वेळेचा अपव्यय होईल असे वाटते. लेख वाचनीय झालेला नसेल तर तो माझा दोष आहे. मुळात हा लेखच नाही. संकलन आहे. ज्यांना अजून रस आहे ते व्हिडीओवर क्लिक केल्यानंतर दिसणा-या इतर लिंक्स वर जाऊ शकतात.

बायोगॅसचं युनिट हा खूपच कल्पक असा उपाय आहे. आरती संस्थेत उत्साहाने शिकवतात ते. घरी येऊन मदतही करतात. आता कदाचित पैसे घेत असावेत.
या प्रकारच्या शंका अजूनही असतील तर हा संवाद उपयोगी पडावा.

मोकळ्या जागेत जर चूल बनवली तर तिला ( जळत राहण्यासाठी) धुराड्याचीही गरज नसते. धुराडे धूर जाण्यासाठीच असते.
आजवर खेड्यात चुलीवरच स्वयंपाक व्हायचा. आमच्या गावातल्या घरात बंद खोलीत चूल आहे. त्याच्या वर खिडकी आहे. गावात बहुतेक घरात हीच पद्धत आहे. बैठ्या पद्धतीने जेवण बनवले जाते. तोटा म्हणजे भिंती काळवंडलेल्या असतात.

केरळ मधे एक किचन आधुनिक असते आणि एक किचन परंपरागत असते. परंपरागत किचनचे त्यांच्या संस्कृतीत महत्व आहे. त्यात अलिकडे धुराडे वापरले जाते.
मी दिलेले व्हिडीओज फिलिपिनी, इंडोनेशियन लोकांचे आहेत. त्यांच्याकडे धुराडे वापरतात. आपल्याकडे अद्याप वापरले जात नाही.
अजून पर्यंत चुलीमुळे आगी लागल्याचे किमान माझ्या तरी ऐकीवात नाही.

आग ही हवेत पसरणा-या इंधनाने लागते.
केरोसीन, एलपीजी, डिझेल, पेट्रोल, सीएनजी ही ज्वालाग्रही इंधने आहेत. त्यापासून जो वायू तयार होतो तो ही ज्वालाग्रही असतो. तो पेट घेतो. कोळसा हे घन इंधन आहे. ते हवेत पसरत नाही. त्यामुळे कार्बन डाय ऑक्साईड बनतो. मात्र गावाकडची घरे खूप उंच असल्याने आणि वरच्या बाजूला व्हेंटिलेटर्स असल्याने धूर बाहेर जातो.

भारतात अजून तरी इलेक्ट्रीक ओव्हन वर पूर्ण स्वयंपाक बनत नाही. काही देशात धूर चालत नाही. घरात अलार्म असतो. ती पद्धत आपल्याकडे अद्याप नाही. तेव्हढी वीज उपलब्ध नाही. असे कायदे आले तर सर्वत्र २४ तास वीज उपलब्ध करून द्यावी लागेल.

पर्यावरण हा विषय इथे नको ही विनंती धाग्यात केली आहे. नाहीतर वेगळी चर्चा सुरू होईल.
चुलीसाठी लागणा-या काटक्यांपेक्षा विकासाने जास्त जंगलतोड केली आहे. आता तर दोन लाख झाडे तोडून मध्यप्रदेशात हि-याच्या खाणी सुरू होणार आहेत. त्यामुळे इथे तो विषय नकोच.

हा विषय कारागिरीपुरताच राहू द्यात ही विनंती.

सॉरी, माझी पोस्ट पर्यावरणाची अवांतरे या धाग्यावर हलवली आहे.
तरीही जर कारागिरी/डिझाईन हा धाग्याचा फोकस असेल तर त्या विषयी देखील काहीच माहिती मिळत नाही असे मला वाटले. केवळ युट्यूब व्हिडिओज च्या लिंक्स चे संकलन एवढाच उद्देश असेल तर हेडरमधला मजकूर पुरेसा आहे.

तुमची पोस्ट हलवण्याची काही आवश्यकता नव्हती. तुम्हाला उद्देशून नव्हते. बायोगॅस च्या चुली बदल विचार करता येऊ शकेल.

युट्यूबच्या लिंक्स वर कोणती माहिती असायला हवी होती हे कळवले तर इथे भर टाकता येईल.

बाल्कनी ,टेरेस इथे चूल बनवणे किंवा अगदी तयार चूलच आणून ठेवणे हे शक्य आहे का नाही हा मुद्दा आहे. तर शक्य आहे हे मान्य.
पण तसे करण्याचे हेतू काय?
केवळ चुलीवरचाच शिजवलेला पदार्थ हवा हा अट्टहास असेल तर.
पण काही इमारतीत धुराचे साइरन लावलेले असतात. धूर झाला की भोंगा वाजणार. पण नेहमीच भोंगा झाला तुमच्या चुलीमुळे तर खऱ्या प्रसंगी दुर्लक्ष होईलच आणि भोंग्यांचा खर्च वाया. चूलवाले भोंगा म्यूट करतीलच.

---------------
बाकी तुमच्या DIY projectला सलाम घेऊन टाका. चांगला झाला आहे.
----------------
अवांतर
लोक ब्लॉकमध्ये छानछान किचन सजवूनही बाहेरच गिळायला जातात. तर आता चुलीवर करा ही ओर्डर घेतील का?

तुम्हारी समस्या क्या हय?
मेरा नाम शाम है
ये तुम्हारी समस्या हय? तो इसमे मय क्या कर सकता हू?
नही बाबूराव
ये तो मेरा नाम हय रे. तुम तुम्हारी समस्या नक्की कर लो रे बाबा, मुझे भौत काम हय.

अहो तुम्ही पर्यावरण विषय नको असे इतके स्पष्ट लिहिल्यावर पोस्ट हलवावी असे वाटले. कारण माझ्या पोस्टच्या अनुषंगाने ज्या पुढच्या पोस्ट्स येतील त्यातून पर्यावरण हा विषय निघणे अपरिहार्य आहे.
इथे चूल आणि चुलींची डिझाइन्स यावर चर्चा होऊ देत.

शांत माणूस, अतिशय आवडली ही कल्पना. बार्बेक्यू पार्टीजसाठी किती आयडियल गोष्ट आहे ही. वा! माझ्या घराला मागे अंगण पण आहे आणि वर गच्ची पण आहे. पाहू या..

मी परवाच कुम्भाराकडुन १५० रु ला चुल विकत आणली. विडिओ बघुन चुली करायच्या कल्पना शहरात असताना डोक्यात घोळत राहायच्या, एक छोटी शेगडी होती घरात, ती कधीतरी वापरायचे. आता इथे लाकुडफाटा व चुल दोन्हीही आहे. नवी चुल अजुन वापरली नाहिय.

घरच्या घरी छोटेसे तन्दुर बनवायला आवडेल. यु ट्युबवर शोधायला हवे.

बार्बेक्यू पार्टीजसाठी किती आयडियल गोष्ट आहे ही. वा! >>> चूल म्हटले की मलाही पहिले बार्बेक्यू पार्टीच आठवलेली. माझी एक मैत्रीण आहे जिचा टेरेस फ्लॅट आहे आणि जी उत्तम सुगरण सुद्धा आहे, तिच्याकडे होत राहतात आमच्या अश्या पार्ट्या.