तंदूर
Submitted by अंजली on 17 November, 2021 - 00:38
उन्हाळ्यात किंवा इतर वेळीही स्वच्छ दिवस, चांगले तापमान वगैरे बघून बार्बेक्यू करणं इथं खूप कॉमन आहे. कबाब वगैरे कोळशाच्या बार्बेक्यूवर करता येतात पण कोळशावर भाजलेले नान, रोटी किंवा तत्सम प्रकार करून बघण्यासाठी तंदूर घ्यावा असं वाटत होतं. किंमती बघितल्यावर 'कुठे इतका वापरला जाणार आहे' म्हणून आपसूकच ऑप्शनला टाकलं जात होतं. एकदा यूट्यूबवर कोणीतरी घरी तंदूर केलेलं पाहिलं तेव्हापासून डोक्यात घरीच तंदूर करायचं घोळू लागलं. त्यातच एका क्लायंटनं 'outdoor kitchen' डिझाईन करण्याबद्दल विचारलं. त्याला मोठ्या आकाराचा तंदूरही हवा होता.
विषय:
शब्दखुणा: