दुबई

गुणा

Submitted by Theurbannomad on 8 March, 2020 - 17:10

मलेशिया हा देश बघायचा योग्य आयुष्यात कधी ना कधी यावा, अशी माझी मनापासून इच्छा होती. या देशाबद्दल मी बरंच काही ऐकलं होतं, पण माझ्यासाठी या देशाची महत्वाची ओळख म्हणजे या देशाच्या राजधानीत क्वालालंपूरला जगातल्या सर्वात उंच इमारतींमधली एक असलेली पेट्रोनॉस टॉवर ही इमारत. खरं तर या जुळ्या इमारती आहेत, ज्या एकमेकांशी 'skybridge' ने जोडलेल्या आहेत.वास्तुविशारद असल्यामुळे अशा जागा माझ्यासाठी तीर्थस्थळांसारख्या, परंतु बरोबर मुलगी आणि बायको असल्यामुळे माझ्यातल्या वास्तुविशारदाला मला काबूत ठेवणं भाग होतं.

प्रांत/गाव: 

शाकाहारी ड्रॅगन

Submitted by Theurbannomad on 8 March, 2020 - 17:08

चीन या देशाबद्दल मला खूप पूर्वीपासून एक सुप्त आकर्षण आहे. हजारो वर्षांची संस्कृती, जगापासून वर्षानुवर्ष जपून ठेवलेलं स्वतःचं खास असं जग आणि अतिशय क्लिष्ट आणि तरीही नेत्रसुखद लिपी अख्या अनेक गोष्टींमुळे हा देश कधीतरी बघावं अशी मनात दडवून ठेवलेली इच्छा २००७ साली पूर्ण झाली आणि चीनच्या बैजिंग आणि शांघाय या दोन शहरांना मला भेट देता आली.

प्रांत/गाव: 

लेबनीज रोमिओ

Submitted by Theurbannomad on 8 March, 2020 - 06:51

काही माणसं जन्माला येताना चिरतरुण म्हणूनच जन्माला येत असतात. त्यांचं पान पिकलं तरी देठ हिरवाच राहतो आणि काहीही झालं तरी त्यांच्यातला ' स्वप्नाळू रोमँटिक' तरुण शिळा होतं नाही. ही माणसं जातील तिथे 'प्रेमाचा वर्षाव' करण्यात मग्न असतात. माझ्या आयुष्यात मी पाहिलेला असा एकमेव महाभाग म्हणजे माझ्याबरोबर माझ्याच ऑफिस मध्ये काम करणारा इमाद.

प्रांत/गाव: 

पाकिस्तानी मराठा

Submitted by Theurbannomad on 8 March, 2020 - 06:49

ओमान हा देश तसा अघळपघळ आणि अवाढव्य असूनही तुलनेने कमी लोकवस्तीचा. या देशाचे सुलतान अतिशय शांतताप्रिय असल्यामुळे युद्धांमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय कुरघोड्यांमध्ये सहसा या देशाचा उल्लेख आढळत नाही. यूएई आणि ओमान सक्खे शेजारी असल्यामुळे आणि अगदी सहज व्हिसा मिळू शकत असल्यामुळे या देशात अनेकदा जाणंयेणं झालं आणि अशाच एका प्रवासात मला नासीर खान भेटला आणि केवळ ५ तासाच्या कालावधीत या माणसाने मला मंत्रमुग्ध करून सोडलं.

प्रांत/गाव: 

श्रीमंत पेशवे

Submitted by Theurbannomad on 8 March, 2020 - 06:47

दुबईमध्ये येऊन २-३ वर्ष झाल्यावर आणि बऱ्यापैकी मित्रमंडळी जोडल्यावर जवळ जवळ प्रत्येक सुटीच्या दिवशी काही ना काही बेत आखायची आणि त्यानुसार कुठेतरी जाऊन गप्पांचा अड्डा जमवायची मला सवय लागली होती. कधी कधी अबू धाबी, शारजा अश्या इतर अमिरातींमधून सुद्धा काही मित्रमंडळी येत आणि गप्पांचा फड आणखी रंगात येई.अशाच एके दिवशी गप्प्पा मारायला जमलेल्या आमच्या टोळक्यात माझ्या एका अबू धाबीच्या मित्राबरोबर गोरापान, निळे डोळे असलेला आणि पाहताक्षणी ब्रिटिश वाटेल असा कोणीतरी आलेला दिसला आणि मी त्याची इंग्रजीत विचारपूस करायला लागल्यावर ' अरे काय हे....मी ना, मी मराठी आहे' असं लडिवाळपणे तो बोलला.

प्रांत/गाव: 

' ताप ' गंधर्व

Submitted by Theurbannomad on 8 March, 2020 - 03:38

संगीत आणि त्यातही शास्त्रीय संगीत हा माझा जिव्हाळ्याचा विषय. आजच्या पंजाबी वळणाच्या आणि केवळ ठेक्यावर जोर देत गायला जाणाऱ्या गाण्यांचा मला प्रचंड तिटकारा आहे. किंबहुना ही गाणी ' तयार' करावी लागतात हे मला पटत नाही आणि म्हणूनच हे सगळं मला बरंचसं सपक वाटतं. कवितेचे शब्द, भाव, त्यात अभिप्रेत असलेला अर्थ याचा सखोल विचार करून सुरांना त्या शब्दांमध्ये अलगद गुंफायची कला प्रचंड तपस्या करून मिळते, म्हणूनच असेल कदाचित, पण आजच्या ' फास्ट फूड' च्या जमान्यात फार कमी वेळा अशी गाणी ऐकायला मिळतात.

प्रांत/गाव: 

ओसाडगावचा पाटील

Submitted by Theurbannomad on 8 March, 2020 - 03:37

जगाच्या पाठीवर आज अनेक देशांतून राजे-राजवाडे नामशेष झालेले असले, तरी लोकांच्या मनात आपल्या जुन्या राजांबद्दलचा आदर आणि भीतीयुक्त दरारा कायम आहे। अनेक देशात आज सुद्धा असे नामधारी राहिलेले राजे आपल्या जुन्या वैभवाच्या स्मृती उगाळत आणि स्वतःच्या कुळाचा राजेशाही इतिहास जोंबाळत आयुष्य जगायची धडपड करताना दिसतात। आरशासमोर उभा राहिल्यावर स्वतःच्या डोक्यावर अदृश्य मुकुट बघायची आणि साध्या लाकडी खुर्चीवर बसतांना २४ कॅरेट सोन्याच्या सिंहासनावर बसायच्या ऐटीत बूड टेकवायची सवय जरी पिढ्यानपिढ्या चालत आलेली असली, तरी वस्तुस्थितीत दोन वेळच्या जेवणाची ददात असलेली ही राजे मंडळी अनेकांच्या थट्टेचा विषय झालेली अ

प्रांत/गाव: 

उंटावरचा शहाणा

Submitted by Theurbannomad on 8 March, 2020 - 03:35

वाळवंटात केवळ ३०-४० वर्षांमध्ये स्वर्ग उभारला जाऊ शकतो, यावर विश्वास ठेवणं जरा कठीणच...पण दुबईमध्ये या चमत्काराची प्रचिती पावलोपावली येते. 1971-72 साली शेख झाएद नावाच्या द्रष्ट्या आणि नेमस्त वृत्तीच्या मनुष्याने आजूबाजूच्या टोळ्यांना एकत्र आणून यूएई नावाचा देश जन्माला घातला आणि बघता बघता या देशातल्या सात अमिरातींनी जगाच्या नकाशावर आपला नाव कोरलं. या देशाच्या जगात सर्वाधिक चर्चिल्या जाणाऱ्या शहरामध्ये - दुबई मध्ये - पर्यटकांसाठी खास तयार केलेल्या स्थानिक आकर्षणांपैकी एक म्हणजे वाळवंटातली ' सफारी'.

प्रांत/गाव: 

' आमच्या काळात' असं नव्हतं

Submitted by Theurbannomad on 8 March, 2020 - 03:33

' आमच्या काळात' असं नव्हतं हे चाळीशी यायच्या आत बोलावं लागेल असं मला कधीही वाटलं नव्हतं , पण माझ्या मुलीला शाळेत घातल्यावर त्या शाळेचे जे जे अनुभव मला येत होते ,ते वारंवार अशा पद्धतीची तुलना करायला मला भाग पाडत होते. जग अतिशय वेगाने बदलत आहे , याचं हे एक उत्तम उदाहरण होऊ शकेल. आमच्या वेळी धीम्या वेगाने प्रगती होत असल्यामुळे आमच्या शाळा ८-१० वर्षांनी एकदा रंगरंगोटी होऊन कात टाकायच्या. पण आता तर शाळांमध्ये २-३ वर्षातच पुनर्जन्म झाल्याइतका बदल जाणवायला लागतो, ही प्रगती खरोखर थक्क करणारी आहे.

प्रांत/गाव: 

रक्तसमंध

Submitted by Theurbannomad on 8 March, 2020 - 01:16

" हे घे, माझ्या शरीरातून बाहेर पडणारं उष्ण रक्त तुझी तहान भागवायला पुरेसं असेल, तर हे घे..." हाशिम आपल्या हातावर धारदार सुरीच्या पात्याने जखमा करत ओरडला. त्या भयाण स्मशानात आजूबाजूला काहीही दिसत नसलं, तरी अदृश्य रूपात का होईना, ते रक्तसंमंध आहे आणि त्याची तहान मनुष्याच्या रक्ताशिवाय कशानेच भागात नाही हे त्याला माहित होत. प्रत्येक अमावास्येच्या रात्री तो असाच गावाबाहेरच्या त्या कब्रिस्तानात यायचा. इथे लोक दिवसासुद्धा पाऊल ठेवायला घाबरायचे. कोणी गावात गेलं तरच गावातली इतर मंडळी इथे यायची. लहान मुलं, स्त्रिया आणि जनावरांना तर इथे आणायला सक्त मनाई होती.

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - दुबई