हायब्रीड वाहने

Submitted by शक्तीवान on 3 May, 2019 - 12:35

बऱ्याच वर्षांपासून काही वैज्ञानिक कल्पना माझ्या डोक्यात घोळत आहेत. त्यातील पहिला किडा.
बहुतेक छोट्या कारना ट्रान्समिशन हे पुढच्या चाकांशी जोडलेले असते.‌ मागची चाके फक्त फिरण्याचे, वजन पेलण्याचे कार्य करतात. आता या चाकांना डिफरंशीयल मेक्यानिझमने एका डायनॅमो/जनरेटरला जोडायचे. तयार होणारी वीज बॅटरी मध्ये साठवायची. मागील चाकं इलेक्ट्रीक मोटार वर चालणारी असतील.‌जेव्हा रस्ता सपाट असेल तेव्हा इंजिन बंद करून गाडी न्युट्रल गिअर मध्ये बॅटरीत साठवलेल्या विद्युत उर्जेवर चालवायची. मोठ्या वाहनांना अशी यंत्रणा जोडून बॅटऱ्या चार्ज करायच्या व वाहन थांबल्यावर इनव्हर्टर वापरून वीज वेगवेगळ्या कामांसाठी वापरायची.
असे प्रयोग झाले आहेत का आणि फिजीबल/वर्क होण्यासारखे आहेत काय?
( इंग्रजी शब्दांचा वापर केल्याबद्दल क्षमस्व)

Group content visibility: 
Use group defaults

शक्तिवान अश्या प्रकारच्या गाड्या आधीच जागतिक मार्केट मध्ये आहेत, त्याला हायब्रीड वाहन म्हणतात , भारतात टोयोटा, फोर्ड, बिमडब्लू सारख्या कंपन्या ह्या गाड्या बनवतात पण त्या खूप महाग आहेत, अश्या गाड्यांचा एक प्रॉब्लेम असतो कि खूप मोठ्या साईझ च्या बॅटरी लागतात (६-१२) अश्या बॅटरी साधारण ५ वर्षाने रिप्लेस करायला लागतात , ज्याचा खर्च पण जास्त आहे , त्यामुळे आपल्या इथे त्याला मागणी नाही आहे . पण ह्या गाड्यांचा मायलेज हे पेट्रोल किंव्हा डिझेल पेक्षा नक्कीच जास्त असते..महिंद्रा सेमी हायब्रीड कॅटेगरी मधली वाहने विकतात ज्या मध्ये ब्रेकिंग मधल्या घर्षणातून निर्माण झालेली ऊर्जा तात्काळ वापरली जाते, त्या मुळे पेट्रोल ची बचत होते पण ह्या मध्ये बॅटरीज नसतात त्यामुळे त्याला पूर्ण हायब्रीड वाहन म्हणत नाहीत.

धन्यवाद Nmate भाई. कमी बॅटरीज वापरून इंजीन/विद्युत उर्जा आलटुन पालटुन अॅटोमॅटिक सिस्टिम ने अशी वाहनं चालवली तर किंमत कमी होऊ शकेल का. प्लस सौर ऊर्जा सुध्दा सरळ जोडता आली तर?

मोटार बस वाहनातील इंजिनांचे फ्लाय व्हिल कमी वस्तुमानाचे असते. त्याची जाडी व व्यास वाढवला तर आउटपुट मध्ये फरक पडेल काय?

कमी बॅटरीज वापरून इंजीन/विद्युत उर्जा आलटुन पालटुन अॅटोमॅटिक सिस्टिम ने अशी वाहनं चालवली तर किंमत कमी होऊ शकेल का- किंमत हायब्रीड वाहन पेक्षा नकीच कमी असेल पण मूळ पेट्रोल किंव्हा डिझेल वाहन पेक्षा थोडी जास्त असेल, सध्या जागतिक मार्केट हे हायब्रीड कडे ना जाता पूर्ण इलेक्ट्रिक कडे चालले आहे , भारत पण २०३० पर्यंत पूर्ण इलेक्ट्रिक कडे जाईल अशी शक्यता आहे , अमेरिकेत जीएम , फोर्ड , होंडा, टोयोटा ह्यांनी २०२३-२५ नंतर पूर्ण इलेक्ट्रिक आणि त्याच सोबत ऑटोनॉमस ( ड्राइवर ची गरज नसलेली ) वाहने मार्केट मध्ये आणण्यासाठी काम सुरु केले आहे , टेस्ला नामक कंपनी आधीच अश्या गाड्या बनवत आहेत पण त्या खूप महाग आहेत , पण २०२० नंतर थोड्या कमी किंमती मध्ये दुसऱ्या कंपन्याच्या गाड्या येऊ शकतात , भारत सरकारने इलेक्ट्रिक वाहने मार्केट मध्ये वाढावा म्हणून खूप पावले उचली आहेत उदाहरणार्थ सबसिडी देणे, वाहन कर माफ करणे , सरकारी वाहने इलेक्ट्रिक घेणे , आणि त्याच सोबत चार्जिंग स्टेशन्स बनवणे , त्याचा फरक येत्या काही वर्षात जाणवू शकेल. पण भारत सरकारने ऑटोनॉमस वाहनावर बंदी घातली आहे कारण त्याने आपल्या देशात जिथे लाखो लोकांचा रोजगार गाड्या चालवून मिळतो तो नष्ट होऊ शकतो .. पण पुढे काही प्रमाणात ते शिथिल होऊ शकते उधाहनरार्थ उच्च किमतीच्या गाड्या साठी फक्त असू शकतील ..मुळात इलेक्ट्रिक , हायब्रीड असू किंव्हा सोलर असू ह्या मध्ये सगळ्यात जास्त खर्च हा बॅटरीज चा आहे , आणि दुसरा त्या चार्ज करण्यासाठी लागणाऱ्या चार्जिंग स्टेशन्स सोयी कारण जास्त अंतरासाठी घेऊन जायला सध्या या भारतात सोयी उपलब्ध नाही आहेत , मध्ये मी बातमी ऐकली होती कि महाराष्ट्र सरकार काही ठराविक अंतरावर चार्जिंग स्टेशन्स बनवणार आहे जर तसे काही झाले तर नक्कीच त्याचा फायदा अश्या गाड्या विकत घेणाऱ्यांना होऊ शकतो. ..

Mahindra & Mahindra has introduced new mild-hybrid technology – Intelli-Hybrid on its Scorpio SUV, With the help of the new Intelli-Hybrid, the SUV consumes lesser fuel, by up to 7%. This has been achieved by assisting the 1.99 L engine with electric power during acceleration and the engine automatically switches off within 3 seconds as soon as the vehicle is stationary. The braking energy is reused, which helps in charging the battery... तुम्ही जे म्हणत आहेत त्याला सेमी हायब्रीड किंव्हा मिड हायब्रीड म्हणतात ..

अजून एक सायकल मध्ये गतिज उर्जा साठवणारे एक.... व्हिल आहे तसं मोठ्या गाड्यांना वापरता येईल का. नाव आठवत नाही.

टेस्ला विषयी वाचलंय की पेट्रोल डिझेल वाहनांपेक्षा जास्त कार्बन डायऑक्साइड वातावरणात सोडला जाईल म्हणून.

टेस्ला हि कंपनी पूर्ण पने इलेक्ट्रिक वाहने बनवते त्या मुळे त्यातून कुठलाही वायू बाहेर सोडला जात नाही, ज्याला नो एमिशन व्हेहिकल पण म्हणतात , त्यामुळे कार्बन डायऑक्साइड वातावरणात सोडला जाण्याचा प्रश्न नाही आहे , पण काही लोक असा समज पसरवत आहेत कि शेवटी इलेक्ट्रिसिटी निर्माण करताना सुद्धा प्रदूषण होते आणि त्या मुळे जर गाड्या सगळ्या इलेक्ट्रिक झाल्या तर प्रदूषण वाढणारच , हे काही अंशी खरे आणि बऱ्या अंशी खोटे आहे , जर आपण आपल्या देशाची वीज निर्मिती नॉन कॉन्व्हेंशनल मार्गाने (सोलर, विंड, अनु ऊर्जा ) वाढवली तर प्रदूषण वाढणार नाही , कारण आपण सगळयात जास्त ऊर्जा हि एकतर पाणी आणि कोळसा वापरून बनवत आहे, नशीब सध्याच्या सरकारने काळाची पावले ओळखून सोलर आणि विंड ची क्षमता चांगल्या प्रमाणात वाढवली आहे (२०१४ साली २५०० मेगा वॅट आणि २०१९ साली २० गिगा वॅट) आणि अजूनही त्यावर खूप काम चालू आहे , ज्यामुळे आपण इलेक्ट्रिक गाड्या वापरल्या तरी प्रदूषण नियंत्रित करू शकतो.

उर्जेची बचत करणारे अनेक साधे साधे उपाय करता येण्यासारखे आहेत. सर्वात मोठा धोका तापमान वाढीचा आहे, नंतर हवेचं प्रदुषण. पाणी तर प्रदुषित झालेलंच आहे. पुण्यातल्या मुळा मुठा नद्या आपण पाहतोच. माझ्या मनात रेल्वेमार्ग, रस्ते कंटुर लेव्हलने थोडा थोडा स्लोप देत तयार केले तर? असा विचार येत असतो. म्हणजे एका बाजूने प्रवास अतिशय कमी इंधनात होईल कारण गुरुत्वाकर्षणाने गती मिळाली की इंजिन रेस करावं लागणार नाही.

आता सौरऊर्जेचा वापर करून चालणारी वाहनं येत आहेत. पावसाळ्यात सूर्यप्रकाश नसला तरी वातावरणात असलेली सूर्याची एनर्जी वापरून ही वाहनं चालतील. कॉलेजला असताना या विषयावर ऐकलं होतं.

Nmate,
जर गाड्या सगळ्या इलेक्ट्रिक झाल्या तर प्रदूषण वाढणारच , हे काही अंशी खरे आणि बऱ्या अंशी खोटे आहे >> हे पटलं नाही. सध्या तरी जगात होणार्‍या एकूण वीजनिर्मितीपैकी >६५% वीज ही कोळसा, तेल आणि वायू यांपासून होते. हे प्रमाण कमी होऊन अपारंपरिक ऊर्जा स्रोत वाढत आहेत, ही चांगलीच गोष्ट आहे, पण निदान सध्या आणि शिवाय नजिकच्या भविष्यात तरी सर्वात जास्त प्रमाण ह्या पारंपरिक स्रोतांचे राहणार आहे आणि त्यांपासून प्रचंड प्रमाणात प्रदूषण निर्माण होते ह्यात काही वाद नाही. तेल/वायू जाळून लगेचच मिळणारी ऊर्जा तशीच्या तशी न वापरता जितक्या जास्त वेळा रूपांतरित आणि संक्रमित होत राहील तितके त्यातील लॉसेस वाढतात आणि गरजेच्या तितक्या पट जास्त प्रमाणात त्या वस्तू जाळाव्या लागतात. त्यामुळे प्रदूषण वाढते - असं ते लॉजिक आहे.

शक्तिवान,
कंटूर लेव्हल मागची कल्पना अनाकलनीय आहे. तुमचं म्हणणं असं आहे का की गाड्या केवळ उताराच्या दिशेनेच प्रवास करतील? तसं असेल तर प्रवास हा केवळ समुद्रसपाटीपासून उंच जागांपासून कमी उंचीच्या जागांकडेच व्हायला हवा. गाड्यांना चढ चढण्यावर बंदी घालावी लागेल, नाहीतर उतारावर जाण्याने जेवढी इंधन-बचत होईल, तेवढे जास्त इंधन चढ चढताना वापरले जाईल आणि सरासरी शेवटी आत्ता एवढीच राहील!

शेनेच प्रवास करतील? तसं असेल तर प्रवास हा केवळ समुद्रसपाटीपासून उंच जागांपासून कमी उंचीच्या जागांकडेच व्हायला हवा. गाड्यांना चढ चढण्यावर बंदी घालावी लागेल, नाहीतर उतारावर जाण्याने जेवढी
>> शंतनु सर मी एका बाजूने म्हटले आहे. कल्पना मांडली फक्त. दुसऱ्या बाजूने नेहमीचे चढाचे मार्ग तसेच ठेवायचे असे मला म्हणायचे आहे. दुरच्या ठिकाणांमधील इलेव्हेशन वेगवेगळे असते. काही किलोमीटर अंतरावरील ठिकाणे जोडता येतील का असं मला म्हणायचं होतं.

किरण भाई कोड्यात कावून बोलून रायले बरं? मांडा की तुमचे विचार. की तुम्हाला असे म्हणायचं आहे मी गुगलवरून कल्पना उचलली आहे?

गोबर गॅस गोमूत्र वगैरे कितीतरी मुद्दे अजुन बाकीच आहेत की इकडे .
>> टोमणा समजायचा का हा. कृपया आपल्या कल्पना शेअर करा.

टोमणा काय त्यात
Uhoh माबोवर रेकॉर्ड ब्रेक धागे आहेत की ह्या विषयावर

शक्तीवान - तुमची मर्जी. नसेल वापरायचे तर नका वापरू. एखादा शब्द दिल्यानंतर गुगल सर्च करण्यासाठीही दुस-याने आपल्यासाठी झटावे ही तुमची अपेक्षा लै नाही हे समजायला मी कमी पडलो साहेब. एक डाव माफी असावी.

ब्ल्यू मोशन टेक्नॉलॉजी ?
>> प्रश्नचिन्हाऐवजी या विषयावर गुगलवर अधिक माहिती मिळेल असे लिहीले असते तर आवडलं असतं.

पुन्हा एकदा माफ करा साहेब. साधारणपणे एखादा शब्द आढळला की गुगल केले जाते. त्यामुळे आपल्याशी संवाद साधताना कोणकोणत्या काळज्या घ्याव्यात याची यादी देऊन ठेवली तर पामराकडून अशा चुका होणार नाहीत साहेब.
उदा. पाककृती दिली तर ती खाल्ली तरी चालेल हे पण सांगायचे का वगैरे... धन्यवाद आपले.

Pages