सौर उर्जा

Submitted by दक्षिणा on 1 April, 2019 - 13:00

परवा आमच्या सोसायटीची जनरल मिटिंग झाली. ज्यात काही मुद्दे प्रामुख्याने चर्चिले गेले त्यात सौर उर्जा वापरून सोसायटीसाठीची वीज निर्मिती करणे.
आमची सोसायटी (एकूण) खूप मोठी आहे. सोळा इमारती आहेत. पण प्रत्येक इमारतीची सोसायटी स्वतंत्र आहे. आमच्या एकट्या इमारतीत एकूण ८६ फ्लॅट आहेत. तर त्याबद्दल.
कुणी असा प्रकल्प जवळून पाहिला आहे, अभ्यासला आहे तर मला खालिल माहिती मिळू शकेल का?

* सोसायटीसाठी सौर उर्जा प्रकल्प राबवताना साधारण किती गुंतवणूक असते?
* आमचे कॉमन मिटर आहे त्याचे बिल सध्या एकूण १६ ते १७ हजार महिना येते निदान ते वाचावेत म्हणून हा मुख्य मुद्दा आहे.
* वरचा मुद्दा + ८६ फ्लॅट्स ना पुर्ण पुरेल इतकी वीज निर्मिती करण्यासाठी काय लेव्हलचा सेटप लागू शकतो?
* फक्त कॉमन लाईट साठी हवे असेल तर कसला सेटप असू शकतो?
* सौर उर्जेतून वीज निर्मिती करतो त्यातूनच सोसायटीला गरम पाणी पुरवठा होऊ शकतो का? माझ्या मते त्याचा सेटप अजून निराळा असतो ना?
* त्याची ही गुंतवणूक काय असते?
* कोणताही सौर प्रकल्प राबवायला सध्या सरकार सबसिडी देते म्हणजे नक्की काय?
* या प्रकल्पासाठी कायद्याचे काही नियम आहेत का?

अजूनही शंका असू शकतात, पण आता एकदम सुचत नाहियेत.

या बद्दल आधीच एखादा धागा असेल तर तो कृपया देऊन हा धागा संबंधितांनी उडवावा ही विनंती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या अल्पस्वल्प माहितीनुसार.

१. तुम्ही किती वीज तयार करू शकता ते तुमच्या गच्चीच्या साईझवर अवलंबून आहे.
२. तयार झालेली सौर वीज तुम्ही वापरत नाही, तर ती एमएसईबीच्या ग्रिडला विकता, त्या बदल्यात तुमचे बिल कमी होते. अर्थात, लाईट 'गेले' तर तुम्हाला तुमच्या सौर उर्जेचा काहिच उपयोग नसतो. तात्पर्य, बॅक-अप्/लोड शेडिंगला पर्याय म्हणून हे वापरता येत नाही.
३. बॅकअप हा उद्देश नसेल तर प्रोजेक्ट व्हायेबल होऊ शकतं. खरं तर अशी अनेक सौर पॅनेल्स बसून हळू हळू वीज निर्मीतीच क्राऊड सोर्स्ड करणे हा प्लॅन आहे. सरकारची विद्युतनिर्मिती इन्फ्रा मधील गुंतव्णूक कमी होत जाईल अन तुम्ही स्वतः डायरेक्ट इन्व्हेस्ट करून वीज तयार कराल. सरकारी कंपन्या या विजेच्या डिस्ट्र्रीब्यूशनसाठी तुमच्याकडून पैसे घेत राहतील. (या कारणासाठी मी यात सहभागी व्हायला तयार नाही. कारण सो कॉल्ड सबसिडी व्यतिरिक्त मला कुठेही टॅक्स/तत्सम बेनिफिट नाही)
४. या फोटोव्होल्टिक सेल्स वर पाणी तापत नाही. त्याचा सेटप वेगळा.
५. गुंटवणूक सध्या तरी भरपूर आहे, अन त्यात रिकरिंग खर्चही असतो.
६. फक्त कॉमन लाईटसाठी 'स्ट्रीट लाईट' प्रकारचे पॅनल्स वेगळ्या ठिकाणी लावून बॅटरी चार्जिंग व दिवे लावणे जमू कते. पण त्यात किमान २५ वर्षे लाईट बिला इतकी इन्व्हेस्टमेंट करावी लागते असे माझे इंप्रेशन झाले.

अधिक माहिती इथे पहा : https://www.teriin.org

हे बेसिकली नॉनकन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेसबद्दल आहे, पण सौर उर्जेबद्दलचे मूलभूत संशोधन संस्थेमार्फत चालते.

पुण्यातील आमच्या सोसायटीच्या मीटिंग मधे याची चर्चा झाली होती. तेव्हाच्या हिशेबाप्रमाणे सुरूवातीची गुंतवणूक खूप जास्त आहे असे निष्पन्न होउन ते तेव्हा पुढे ढकलले होते. अजूनही बहुधा झालेले नाही. अर्थात हे ७-८ वर्षांपूर्वीचे आहे. किमतींमधे आता काही बदल होउन इक्वेशन बदलले असू शकते.

सहसा पदाधिकार्‍यांपैकी एकाला पुढचा अभ्यास करण्याची जबाबदारी देतात - कंपन्यांशी बोलून, सरकारी योजनांची माहिती काढून त्याचा एक अंदाज पुढच्या मीटिंग मधे सादर करतात. तसे कोणी करत आहे का?

गुंतवणूक आणि मेन्टेनन्स प्रचंड आहे. सौर पॅनेल्स रोजच्या रोज पुसले तर पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती होते. बॅट-यांचा मेन्टेनन्स ही एक कटकटीची बाब आहे. अलिकडे मोठ्या आकाराच्या लो मेन्टेनन्स बॅट-याही मिळतात.

तुमच्या सोसायटीचा एकूण वीज वापर काढावा लागेल. एका प्लॅटचा वीवापर सरासरी ३०० युनिट धरला तर ९० फ्लॅटचा २७००० युनिट इतका होईल. म्हणजे दर दिवसाला ९००० युनिट्स. या हिशेबाने तुम्हाला एकूण पॅनेल्स सिलेक्ट करावे लागतील. समजा ९ तास वीज वापर असेल तर तासाला ९०० युनिट्स म्हणजे ९०० किलो वॅट्स हा वीजवापर असेल. म्हणजे ९०० किलो वॉट्सचे एकूण पॅनेल्स लागतील. २००३ साली २ लाख रूपये प्रति किलो वॉट असा पूर्ण प्रकल्पाचा खर्च होता. आताचा फक्त पॅनेल्सचा खर्च ५० ते ७० हजार रूपये पर युनिट . एकूण साडेचार कोटी रूपये (किमान)

एक कंट्रोल पॅनेल लागेल. ज्यात एमएसईबी आणि सोलर पॅनेलची वीज यापैकी एक आपोआप सिलेक्ट होईल अशी यंत्रणा असेल ( डिटेल्स हवे असतील तर मेल करीन). बॅटरी बँक, डीसी कन्व्हर्टर, इनव्हर्टर अशी यंत्रणा लागेल. हा खर्च वेगळा. (अनुदान बंद झाले आहे. सॉफ्ट लोन अशी योजना होती पूर्वी, ती पहा).

पावसाळ्यात दोन महीने प्लाण्ट उपयोगाला येत नाही.

वर दिलेलं खर्चिक असेल तर फक्त कॉमन वापरासाठी सोलर एनर्जीचा वापर करू शकता. यात जिने, पार्किंग, सोलर पंप, लिफ्ट्स, सीसीटीव्ही आणि बाहेरच्या लाईट्स एव्हढाच वापर होईल. त्यासाठी साधारण ४० ते ५० किलोवॅटचे पॅनेल्स लागतील. खर्च २० ०० ००० (वीस लाख येईल). पर फ्लॅट जास्त खर्च येत नाही. पण त्यामुळे महिना ५० हजार रूपयांची बचत होईल. मेण्टेनन्स कमी होईल. शिवाय मनपाच्या करात सवलत मिळते.

दक्षिणाजी,

सोसायटीच्या प्रकल्पाला ३०% सरकारी अनुदान मिळते.

सोलर ऊर्जा एकूण खर्च सरकारी अनुदान अनुदानानंतर खर्च मासिक युनिट मासिक बचत गुंतवणुक परतीचा कालवधी
1KW 75,000 20,000 55,000.00 120 960 4.5 Years
2KW 1,40,000 40,000 1,00,000 240 1920 4.5 Years
3KW 2,10,000 60,000 1,50,000.00 360 2880 4.5 Years
4KW-1P 2,50,000 80,000 1,70,000 480 3840 4 Years
5KW-1P 3,20,000 1,00,000 2,50,000 600 4800 4 Years
10KW-3P 5,80,000 1,74,000 4,06,000.00 1440 11,520 3 Years

हायब्रीड यंत्रणा जसे सोलर पॅनल अधिक छोटी पवनचक्की असेही मॉडेल आहेत. आता आमच्या तालुका ठिकाणी सुध्दा अनेक लोक ऑनग्रीड मॉडेल बसवत आहेत. एक किलो वॅट साठी साठ ते सत्तर हजार रुपये खर्च येतो. सोलर वॉटर हिटर खूप फायदेशीर आहे व आमच्या कडे खेडोपाडी शेकडो लोक बसवत आहेत. दिडशे लीटर मॉडेल ला तेरा चौदा हजार रुपये घेतात. एका कुटुंबाला पुरतं.

Solar panel फक्त वीजनिर्मिती करू शकतात, पाणी तापवू शकत नाहीत. पाणी तापवण्यासाठी solar water heaters वेगळे असतात. (solar panel मधून वीज निर्मिती करून त्यावर सध्याचा गिझर चालवू शकतो, पण हा केवळ शु द्ध गा ढ व प णा आहे!)

solar panel मधून वीजनिर्मिती करण्याचेही दोन प्रकार आहेत.
१. Standalone system (with backup) – यात दिवसा वीजनिर्मिती करून ती battery मध्ये साठवली जाते आणि रात्री तीच वीज पुन्हा (इन्व्हर्टरच्या सहाय्याने) वापरली जाते. मात्र मुंबई, पुण्यासारख्या शहरात जेथे अगोदरच ग्रीड पावर (उदा. TATA Power, Adani Electricity, BEST or MSEB) उपलब्ध आहे तेथे हा पर्याय व्यवहार्य नाही. कारण वीज साठवणुकीचा खर्च प्रचंड आहे. battery ची खरेदी आणि देखभाल खर्च (investment & maintenance) खूप आहे. शिवाय शहरातील घरांमध्ये विजेचा वापर खूप असतो त्यामुळे हा खर्च अव्वाच्या सव्वा वाढत जातो. ही पद्धत डोंगर द-यात वसलेल्या आदिवासी पाड्यांवर जेथे अद्याप वीज पोहोचलेली नाही अशा ठिकाणी योग्य आहे. कारण त्यांचा विजेचा वापरही केवळ दिवे व असलाच तर पंखा, रेडीओ व मोबाईल चार्जिंग यापुरताच मर्यादित असतो.
२. दुसरा प्रकार म्हणजे ग्रीड सिस्टीम. ग्रीड म्हणजे सध्याची अस्तित्वात असलेली वीजवहन यंत्रणा. यात अगोदर अस्तित्वात असलेली ग्रीड पावर काढून न टाकता solar panel बसवले जातात व हे solar panel ‘net meter’ च्या सहाय्याने ग्रीडशी जोडले जातात. याची कार्यपद्धती म्हणजे दिवसा वीज तयार करायची, त्यातील हवी तेवढी वापरायची आणि अतिरिक्त वीज ग्रीड मध्ये पाठवायची (आपल्या वीजकंपनीला विकायची) व रात्री अंधार असताना solar panel काम करत नाहीत तेव्हा जी आपल्याला वीज लागते ती पुन्हा ग्रीडमधून (वीज कंपनीकडून) परत घ्यायची. महिन्याच्या अखेरीस जेव्हा बील येते तेव्हा 'आपण वापरलेली वीज – आपण निर्मिती करून कंपनीला विकलेली वीज' यांच्यातील फरकाचे बील आपल्याला भरावे लागते.
उदा. सध्या (solar panel बसवण्यापूर्वी) तुमच्या घरी दिवसाचा (daytime) वीजवापर आहे ३ युनिट व रात्री (night) वीजवापर आहे ५ युनिट. म्हणजे २४ तासात तुम्ही ८ युनिट वीज वापरत आहात.
समजा आता solar panel बसवल्यावर दिवसा (daytime) ५ युनिट विजेची निर्मिती होत आहे. त्यातील ३ युनिट तुम्ही दिवसा वापरत आहात आणि उर्वरित २ युनिट वीज ग्रीडमध्ये पाठवत आहात. आणि रात्री पुन्हा ५ युनिट वीज वापरत आहात. म्हणजे तुमचा वीज वापर ८ युनिटच आहे. परंतु तुम्ही दिवसा २ युनिट वीज ग्रीडमध्ये पाठवत असल्याने तुम्हाला बील मात्र ८-२ = ६ युनीटचेच येणार. (जे पूर्वी ८ युनिटचे येत होते.) या पद्धतीत battary लागत नसल्याने त्याचा खर्च, देखभाल खर्च वाचतो.

विक्षिप्त मुलगा, बरोबर.
उदाहरणामध्ये जरा दुरुस्ती हवी. दिवसातील ३ युनिट्स हे आपण निमार्ण केलेल्या ५ युनिट्स मधून वापरत आहोत, वीज कंपनी कडून नाही. तेव्हा आपल्याला बिल ३ युनिटचे येणार.

विक्षिप्त मुलगा, बरोबर.
उदाहरणामध्ये जरा दुरुस्ती हवी. दिवसातील ३ युनिट्स हे आपण निमार्ण केलेल्या ५ युनिट्स मधून वापरत आहोत, वीज कंपनी कडून नाही. तेव्हा आपल्याला बिल ३ युनिटचे येणार.
Submitted by मानव पृथ्वीकर on 2 April, 2019 - 21:12

आणि रात्रीचे ५ युनिट??? ते आपण कंपनीकडूनच घेतलेले आहेत नाही का? कारण रात्री तर आपले solar panels अजिबात वीजनिर्मिती करणार नाहीत.

a) दिवसा वीज निर्मिती = ५ युनिट
b) दिवसा वीज वापर = ३ युनिट
c) दिवसा परत केलेली वीज = ५ - ३ = २ युनिट
d) रात्री वीज निर्मिती = 0 युनिट !
e) रात्री वीज वापर = ५ युनिट
f) रात्री परत केलेली वीज = 0 युनिट
--------------------------
i) २४ तासात वापरलेली एकूण वीज =(b)+(e)= ३+५ = ८ युनिट
ii) २४ तासात निर्माण केलेली एकूण वीज =(a)+(d) = ५ युनिट
iii) २४ तासात परत केलेली एकूण वीज = (c)+(f) = २ युनिट
---------------------------------------------
बील = एकूण वीज वापर - एकूण परत केलेली वीज
बील = (i) - (iii)
बील = ८ - २
बील = ६ युनिट

बिल ३ युनिट
एकूण वापरलेली वीज = ८ युनिट
स्वतः उत्पन्न केलेली वीज = ५ युनिट
अतिरिक्त वापर = ८-५ = ३ युनिट

पवनचक्की साठी रेसिडेन्शियल भाग योग्य नाही. पवनचक्कीची उंची जमिनीपासून किमान २० मीटर हवी. समतल जमीन हवी. उंच सखल जमीन असेल तर पवनचक्की ला ती योग्य नाही. वा-याच्या दिशेत इमारती, झाडं नकोत. तसेच डोंगराच्या टोकावरही नको. हे पाहीलं तर इमारतीवर बसवायची झाली तर आजूबाजूच्या इमारतींमुळे निर्माण झालेला टर्ब्युलन्स मिनिमाईज करायचा असल्यास गच्चीवरही किमान १८ मीटर उंच खांबावर ती असायला हवी. शिवाय ज्या इमारतीवर ती आहे ती उंच इमारत असायला हवी. हे पाहता हायब्रीड प्लाण्ट इथे अशक्य आहे.

आपण निर्माण केली पाच युनिट ती पुर्ण वापरली. दिवसा तीन रात्री दोन. उरलेले एम एस इबी चे तीन युनिट. तर बील तीन युनिट चेच येईल ना भो.

आपण निर्माण केली पाच युनिट ती पुर्ण वापरली. दिवसा तीन रात्री दोन. उरलेले एम एस इबी चे तीन युनिट. तर बील तीन युनिट चेच येईल ना भो.
Submitted by शशिराम on 2 April, 2019 - 21:25

दिवसा तयार केलेली वीज रात्री कशी वापरणार भाऊ??? Grid system (net metering) मध्ये battary वापरली जात नाही, त्यामुळे दिवसा तयार झालेली वीज रात्रीसाठी साठवता येत नाही!

किरणूद्दीन भाय मी छोटी पवनचक्की म्हणत आहे, जी सीलिंग फॅन पेक्षा दुप्पट मोठी असेल कदाचित.

किरणूद्दीन भाय मी छोटी पवनचक्की म्हणत आहे, जी सीलिंग फॅन पेक्षा दुप्पट मोठी असेल कदाचित.
Submitted by शशिराम on 2 April, 2019 - 21:34>>>

मालाड पश्चिमेला स्टेशनजवळ एका इमारतीवर पाहिली आहे. स्लो ट्रेनने प्रवास करताना दिसते.

<<< दिवसा तयार केलेली वीज रात्री कशी वापरणार भाऊ??? Grid system (net metering) मध्ये battary वापरली जात नाही, त्यामुळे दिवसा तयार झालेली वीज रात्रीसाठी साठवता येत नाही! >>>

@विक्षिप्त
दिवसा ५ युनिट वीज तयार केली. त्यापैकी ३ युनिट स्वतःसाठी वापरली (म्हणजे वीज कंपनीकडून घेतली नाही) आणि २ ग्रीडमध्ये दिली. याचा अर्थ २ युनिट क्रेडिट आहेत.

रात्री ५ युनिट वीज वीज कंपनीकडून घेतली म्हणजे ५ युनिट डेबिट.

एकूण: ५ युनिट डेबिट अधिक २ युनिट क्रेडिट = ३ युनिट बिल

विक्षिप्त अरे भो तिच जी msebला जादा दिली ना.
Submitted by शशिराम on 2 April, 2019 - 21:36

आता माझी ट्यूब पेटली. सकाळी तयार झालेल्या ५ पैकी ३ आपण वापरली आणि २ परत दिली. बात खतम.
रात्री ५ विकत घेऊन वापरली, ज्यापैकी २ आधीच prepaid होती (आपणच त्यांना दिलेली होती.) म्हणजे बील ३ युनिटचेच येणार!

ग्रिड सिस्टीममध्ये येणाऱ्या बिलाचा मुद्दा तर निकालात निघाला. पण यात एक मेख आहे.
जर आपली निर्मिती ही वापरापेक्षा जास्त असेल तर आपल्याला कंपनीकडून पैसे मिळत नाहीत.

उदा. वरील उदाहरणात, आपला वीजवापर दिवसा ३ व रात्री ५ युनिट आहे आणि निर्मिती मात्र १० युनिट आहे. तर दिवसा १० पैकी ३ युनिट वापरून ७ परत करणार आणि रात्री ५ युनिट वापरणार. म्हणजे आपण परत केलेल्या विजेपेक्षा आपला वापर कमीच आहे. थोडक्यात आपल्याला कंपनीकडून येणे आहे. अशा परिस्थितीत मात्र कंपनीकडून cashback वगैरे मिळत नाही.

वि मु आपण आपला आय्डी शहाणा मुलगा करून घ्या.
Submitted by शशिराम on 2 April, 2019 - 21:49>>>

नको, असाच आहे मी!!! उलट मी घातलेल्या गोंधळामुळे सुस्त पडलेला धागा कसा काही काळ सतत वर राहिला पहा!!!

अशा परिस्थितीत मात्र कंपनीकडून cashback वगैरे मिळत नाही.>>
माझ्या महितीनुसार आपण जेवढी वीज निर्मिती करतो त्याच्या १०% पर्यंत परत केलेल्या विजेवर कॅश बॅक मिळते. जास्तीच्या नाही.
म्हणजे समजा वर्षातून आपण दहा हजार युनिट्स निर्माण केले त्यातले २००० ग्रीडला दिलेय. तर आपल्याला दहा हजारच्या दहा टक्के म्हणजे १००० युनिटचे कॅश बॅक मिळेल. उर्वरीत १००० कॅरी फॉरवर्डही होत नाही, ते वीज कंपनीला दान होतात. कॅशबॅकचे रेट वीज कंपनी जाहीर करते.

माझ्या महितीनुसार आपण जेवढी वीज निर्मिती करतो त्याच्या १०% पर्यंत परत केलेल्या विजेवर कॅश बॅक मिळते. जास्तीच्या नाही.
.....कॅशबॅकचे रेट वीज कंपनी जाहीर करते.
Submitted by मानव पृथ्वीकर on 2 April, 2019 - 22:31

This is not fair! या असल्या नियमांमुळेच लोक नवीन सुधारणा करण्यास कचरतात. शिवाय रेट वीज कंपनी जाहीर करणार म्हणजे आपल्याला विकताना जास्त दराने विकणार आणि आपल्याकडून घेताना कमी दराने घेणार

Pages