व्हाईट नॉईज काय आहे भाऊ? रात्रपाळी आणि झोप यासाठी उपयोगी.

Submitted by पाषाणभेद on 25 June, 2019 - 19:07

मित्रांनो,

आपणापैकी बरेच जण नाईट शिप्ट करत असतील. नाईट शिप्टमुळे दिवसा आपल्याला झोपणे क्रमपाप्त, आवश्यक आहे. परंतु घरातील व्यक्ती, आजूबाजूचे लोकं हे सुद्धा आपल्याबरोबर नाईट शिप्ट करतात का? तर नाही.

जेव्हा जेव्हा आपण नाईट शिप्ट करुन आल्यानंतर दिवसा झोपतो त्या वेळी घरातील व्यक्ती, लहान मुले, आजूबाजूच्या घरी राहणारे व्यक्ती, कुटूंब हे त्यांचे दिवसाचे दिनक्रम व्यतीत करत असतात. जेव्हा आपण झोपतो, तेव्हा आपल्या आजूबाजूला इतर सारे आवाज येत असतात. कुणी टिव्ही पाहत असतो, वाहने जात असतात, लहान मुले खेळत असतात इत्यादीमुळे आपली झोप विस्कळीत होत असते. अशावेळी हा व्हाईट नॉईज आपल्या कामी येतो.

काय आहे व्हाईट नॉईज?
व्हाईट नॉईज हा असा कमी वारंवारतेचा (लो फ्रिक्वेन्सी) आवाज असतो जो इतर आवाजांना रोखतो (शिल्ड) करतो. तुम्ही हा लेख किंवा ईमेल वाचण्याआधीही तुमच्या घरात व्हाईट नॉईज वापरतच होते. पण त्यालाच व्हाईट नॉईज म्हणतात हे तुम्हाला कदाचित माहीत नसावे. घरातील पंख्याचा आवाज हा व्हाईट नॉईजचे उदाहरण आहे. कमी वारंवारतेचा हमींग साऊंड (लो फ्रिक्वेन्सी) जो सतत येत असतो तो व्हाईट नॉईज असतो.

व्हाईट नॉईजचा उपयोग कसा करायचा?
या फाईल्स जास्त मोठ्या असल्याने ईमेलमध्ये न देता इंटरनेटवर शेअर केल्या आहेत. या लिंकमधील झीप फाईलमध्ये व्हाईट नॉईजच्या फाईल्स आहेत. या फाईल्स डाऊनलोड करून एक्ट्राक्ट करा आणि तुमच्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह करा. जेव्हा तुम्हाला झोपायचे आहे तेव्हा या फाईल्सपैकी कोणतीही एक ऑडीओ फाईल प्ले करा. तुमच्या कानांना सोसवेल इतपत मोबाईलचा आवाज वाढवा. सुरूवातीला एक दोन दिवस थोडेसे वेगळे वाटेल पण नंतर हळूहळू याची सवय होईल. यातील कोणत्याही आवाजाच्या फाईल्स साधारण दहा मिनीटे प्ले होतात. मोबाईलच्या ऑडीओ प्लेअरमध्ये केवळ एकच आवाज सतत प्ले (कन्टिन्यू प्ले) मोडमध्ये प्ले करा. या ऑडीओ फाईल्समध्ये अनेक आवाजांच्या फाईल्स आहेत, जसे - मुळचा व्हाईट नॉईज, फॅनचा आवाज, मोटर, पाऊस इत्यादी. व्यक्तीश: मला तरी 01WhiteNoise.mp3 या फाईलचा आवाज सुट झालेला आहे. व्यक्तीपरत्वे आवड निराळी असू शकते.

लक्षात ठेवा:
व्हाईट नॉईज तुम्ही तुमच्या खाजगी कामासाठी वापरत आहात. घरातील इतर कुणी व्यक्ती तुमच्यासोबत झोपत असतील तर कदाचीत त्यांना हा आवाज आवडणारदेखील नाही. त्यांनी या आवाजाबद्दल नावड दाखवली तर त्यांच्या इच्छेचा सन्मान करा आणि हा आवाज तात्पुरता बंद करा हि नम्र विनंती.

आणखी एक, या आवाजाच्याही खुप आहारी जावू नका. अति तेथे माती हि म्हण लक्षात ठेवा. जेव्हा जेव्हा तुम्हाला झोप घेणे अति आवश्यक आहे तेव्हा किंवा लाईट गेल्यावर पंखे बंद झाले तर या आवाजाचा उपयोग करा.

आपल्याला या माहितीचा कितपत उपयोग झाला ते आवर्जून कळवा.

आपला,
पाषाणभेद

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्हाईट नॉईज पहिल्यांदा ऐकले. पण त्यापेक्षा संगीतातले काही विशिष्ट राग उत्तम परिणाम साधतात.
मला स्वत:ला राग देस, राग काफी आणि भैरवीचा शांत झोप येण्यासाठी फायदा होतो. अर्थात याचा उपयोग झोप येत नसेल तर होतो. तुम्ही कोलाहलात कसे शांत झोपायचे ते सांगत आहात हा फरक आहे.

पक्ष्यांचे आवाज वगैरे एमपी3 फाईल्स आहेत. ईअरफोनने ऐकता येतात. स्टॉप टाईम द्यायचा. आठदहा तासांच्या क्लिप्सही आहेत.

मला माझ्या लहान बाळाला झोपवण्यासाठी व्हाईट नॉईज वापरायला doctor नी सुचवले होते. तेव्हा पहिल्यान्दाच ही कन्सेप्ट कळली होती.
पंख्याचा आवाज, वॉशिंग मशीनचा, व्हॅक्यूम क्लीनरचा सतत येणारा मंद आवाज हि व्हाईट नॉईजची क्लासिक उदाहरणे आहेत.
BTW अंगाई गीत ऐकून झोप येत असल्याने हा पण एक प्रकारचा व्हाईट नॉईजच

आपण झोपेसाठी कुठल्या न् कुठल्या आवाजाच्या आधीन झालेलो असतो.पण त्यालाच व्हाईट नॉईज म्हणतात.हे ठाऊक नव्हते.

उपयुक्त माहिती.गोंधळात शांत झोपणं खरंच कठीण.
आमचं रत्न लहान होतं तेव्हा आमहो फिशरप्राईज चे बुडबुडे आणि शांत संगीत झोप यायला वापरायचो.पण इतके दमलेले असायचो की बाळ जागं आणि आम्ही पलंगावर आडवे तिडवे घोरतोय आणि लाईट आणि ते बुडबुडे चालू असं व्हायचं.

याला हेल्दी नॉईज असं नाव देऊ या. बाळाला अंगाई गीत गाताना जूनी लोकं अं.., हूम्.... सारखा स्वर त्यात अॅड करत असत. झोके घेता घेता आपोआप डोळे मिटून बाळ थोडा वेळ हं हं करत झोपी जात असे.

हेही एक प्रकारच माणवी मेंदुला व्यसनच बनून जाईल की काय याची भिती वाटते.
तुनळी वरुन पाण्याच्या बुडबुड्यांचा व्हाईट नाँईस डाऊनलोड केला आहे. पाच मिनीटांत झोप लागते.

मी घरी असली की एक्सोस्ट फ्यान लावते दुपारी त्यामुळे बाकीचे आवाज येत नाही. मला वाट्ल कि मलाच अशी विचित्र सवय आहे याला व्हाईट नॉईज म्हणतात आज पहिल्यादा कळाले खुप सारे धन्यवाद माहिती बद्द्ल...

याला व्हाईट नॉईज म्हणतात.हे ठाऊक नव्हते >>> +१
लेख आणि प्रतिक्रिया छान आहेत..
पुष्पक सिनेमातला पंचतारांकित हॉटेल मधल्या शांततेमुळे झोपू न शकणारा कमल हसन आठवला. Happy

साराभाई मधल्या मधू फुफाची भतीजी देखील रेल्वे प्लॅटफॉर्मवरची अनाऊन्समेंट आणी ट्रेन्सची धडधड ऐकल्याशिवाय झोपू शकत नाही असे दाखविले होते.

गूगल प्ले store मध्ये एक app आहे त्यामध्ये निरनिराळे आवाज आहेत ते ऐकता येतात जसे नदीच्या वाहण्याचा आवाज समुद्राच्या लाटांचा आवाज बासरीचा आवाज पावसाचा आवाज पक्ष्यांचा आवाज रातकिड्यानचा आवाज वादळाचा आवाज . झोप येते का नाही माहिती नाही पण खुप छान वाटते ते आवाजऐकून. White noise ऑप्शन ही आहे त्यात.

छान माहिती. कदाचित सगळ्यांना आठवत असेल तर, पूर्वी जेव्हा टेलिव्हिजन वर दूरदर्शन वितिरिक्त बघायला काहीही नव्हते तेव्हा प्रक्षेपण बंद झाल्यावर जो प्रकार बघायला मिळायचा तो white noise चाच प्रकार होता. त्याला बरेच लोक मुंग्या म्हणाचे :). असे मोबाईल फोन साठी application s सुध्दा उपलब्ध आहेत.

मला रेडिओ ट्युन करताना टून्, टों, पिं... असे आवाज ऐकायला आवडायचे. ते वेगळ्या फ्रिक्वेन्सीतील जहाजांचे संदेश असतात हे नंतर कळले.