चांगल्या स्पिडचे नवीन इंटरनेट कनेक्शन कुठले घ्यावे?

Submitted by मेधावि on 4 February, 2019 - 19:14

पुण्यात, कोथरुडात, स्काईपद्वारे (व्यवस्थित, सलग, वारंवार डिस्कनेक्ट न होता, कमीत कमी लॅग असावा) संभाषण करणे (आठवड्यातून एक किंवा दोन तास) ही गरज आहे.
BSNL च्या सेवेला कंटाळून काही महिन्यांपूर्वीच त्यांची सर्विस बंद केलीये व आता एअरटेल व आयड्याच्या डेटा पॅकवर बाकी सर्व कामकाज व करमणूक उत्तम चालू आहे. पण स्काईपसाठी मात्र त्यात अडचण येते आहे. संभाषणात लॅग येणे, वारंवार डिस्कनेक्ट होणे असं वरचेवर होतं.

हॅथवे हे एक दुसरं ऑप्शन आहे पण ते भिंतीला भोक पाडून केबल आत आणतात आणि नुकतेच इंटीरिअरचे काम केलेले असल्यामुळे परत ठोकठोक, लोंबणार्या वायरी नको वाटतात.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोथरूड मधे जॉयस्टर आहे का ?
नाही तर जिओ गिगाफायबर होतंय सुरू लवकरच. गिगाबाईट्स मधे स्पीड असेल. बीएसएनएल देखील ऑप्टीकल फायबर गिगाबाईट्स सर्व्हिस सुरू करतंय.

तुमच्या bsnl च्या कनेक्शनची वायर जिथून आली आहे तिथून नाही का येऊ शकणार हॅथवे ची वायर?. चांगल्या अनइंटरप्टेड स्पीड साठी वायर्ड ब्रॉडबँड हाच चांगला ऑप्शन आहे.
दुसरं म्हणजे जिओफाय 4G पोर्टेबल डाँगल. याची किंमत २००० आणि सेलफोन सारखेच त्यात 398 / 84 days असं (किंवा अजून दुसरे प्लॅन्स) रिचार्ज करता येतं. याचा आधी डेमो घेऊन बघा, तुमच्या घरात.

Hathway.

Joister महाग वाटतेय.
माझे एअरटेल आहे, ४४९मध्ये १६ Mbps , unlimited आणि ३ महिन्याचे नेटफलिक्स आणि १ वर्षाचे ऍमेझॉन प्राईम फ्री सबस्क्रिप्शन + landline connection free voice calls.

हॅथवे माझा चॉइस. मी परवाच पूर्ण वर्शाचे पैसे भरले. पण एकदम हॅपी. अगदी अन इंटरप्टेड सर्विस. इथे मुंबईत साउथ बाँबे साइडला ते हाय स्पीड व एकदम भारी नेट सर्विस ऑफर करतात. तुम्हाला ती हवी आहे का विचारल्यावर मी लगेच हो म्हटले व त्यानी ती दिली पण. ते तुम्हाला जास्ती चा एक राउटर पण देतात.( पैसे भरावे लागतात) , डिसेंबर एंड ला त्यांचे क्वार्टर एंड होते बहुतेक एक ऑफर फारच प्लग करत होते. बिच्यार्‍यांचे टार्गेट असावे. पण तेव्हा मी भरू शकत नव्हते. जानेवारीत भरले पैसे. तर १२ महिन्यांच्या कॉस्ट मध्ये दोन महिन्यांचे फ्री अशी काहीत्री ऑफर आहे. मला डेटा प्लॅन वगिअरे वाचायला ऐकायला फार बोअर होते.

शिवाय घर बदलले तेव्हा मी नेट अ‍ॅड्रेस चेंज साठी हार्ड कॉपी ऑफिसात जा रेंट अ‍ॅग्रिमेंट द्या वगिअरे कर णार होते. उगीच चाळा म्हणून हॉल मधील एक वायर मोडेम मध्ये जोडली तर नेट येउनच गेले. आधीचा भाडेकरू पण हॅथवे वाला होता बहुतेक. पैशे चुकवून गेला असावा. एकदा
कलेक्षन वाला येउन गेला.

मी आता नवे पेमेंट केले तेव्हा पण फोनवाला तरूण मुलगा म्हणे आत्ता ऑनलाइन पेमेंट करा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाइड करतो. तेव्हा मला एकदा करू वाटले पण काय जाणे फ्रॉड असला तर म्हणून त्याला म्हटले चेक कलेक्षन ला माणूस पाठव. त्याप्रमानॅ त्यांनी माणूस पाठवला व मी हार्ड कॉपी पेमेंट केले.

केबल नेट स्वस्त पडते असे ऐकले आहे . केबल नेटला इंटररप्शनची भानगड नाही. फक्त लाईन तुटली की प्रॉब्लेम येणार.

आमच्याकडे खालच्या मजल्यावर हॅथवे केबल आहे पण वरच्या घरात रेंज येत नाही म्हणून हॅथवे फक्त खालीच वापरता येते. बूस्टर वगैरे वापरून रेंज वाढवता येऊ शकते का?

>>जिओफाय 4G पोर्टेबल डाँगल. >>
१००० ला मिळते, ३०००एमएएच ब्याटरी, ५-२०एमबीपीएस स्पीड.
भारी चालते. कमी वापरासाठी ३९८ पुरेसे(८४ दिवस)।

मेधा कंपनीने मला एअरटेल चा ४जी चा हॉटस्पॉट दिला आहे.
रोज २ जीबी डेटा वापरायला मिळतो. स्पीड पण चांगला आहे. स्काय्प चालेल की नाही माहिती नाही.

YOU broadband बरं आहे, स्पीड वगैरे. अर्थात या क्षणापर्यंत तरी आहे. (जरा कौतुक केलं कशाचं की पुढच्या क्षणी तोंडावर आपटायला होतं).

एकाला दुसरा बॅकअप हा पर्याय सगळ्यात उत्तम. माझं मत वायर्ड कनेक्षन ला पहिले. लोकल ब्रॉडबँड चांगले प्लॅन्स देताहेत सध्या (माझा ऑपरेटर- याचं बॅकएंड व्होडफोन फायबर आहे- १२००/- ला ४०० जिबी १०० एमबीपीएस नी देतो. हे ४०० जिबी जर संपवलेच तर ५ एमबीपीएस नी पुढे मंथली सायकल संपेपर्यंत अनलिमिटेड)
बॅकअप म्हणून व्होडाफोन चा सेल्यूलर डेटा.

जिओ गिगा फायबर अजून यायचं आहे. आणि ते ही घरात फ्लोर वर वायर्स चं जंजाळ करतीलच. त्यांचा ऐकीव बेसिक प्लॅन (जिओ ४जी सारखाच पहिले ३ महिने फुकट असणार आहे. ४५००/- वन टाईम पे असेल. यात ओएनटी वगैरे ची आणि फायबर ची कॉस्ट असेल.) १०० जिबी १०० एमबीपीएस ने, नंतर १ एम्बीपीएस नी अनलिमिटेड असा असेल.

तुमच्या इथे एअरटेल चे FTTH ब्रॉडबँड असेल तर ते घ्यावे , साधारण १००० रुपयांना ४० mbps चे स्पीड आणि अनलिमिटेड डाउनलोड (साधारण महिन्याला ३००० गिगाबाईट्स डेटा मिळतो, आमच्या इथे नांदेड सिटी ला नेटफ्लिक्स, ऍमेझॉन प्राईम अगदी फुल्ल हाय डेफिनेशन मध्ये दिसते , सोबत एका वर्षासाठी ऍमेझॉन प्राईम , ३ महिन्यासाठी नेटफ्लिक्स, आणि एअरटेल TV , आणि एक लँड लाईन सुद्धा मोफत मिळतो, फ्री कॉलिंग सकट ..

दिड वर्ष झाले टिकोना वापरत आहे. आजुन पर्यन्त काय प्रॉबलेम आला नाही . सर्विस उत्तम आहे. कर धरुन वर्षाला ९०००.
शेजार्याला एअरटेलला प्रोबलेम होता म्हणुन टिकोना घेतला होता.

आमच्याकडे खालच्या मजल्यावर हॅथवे केबल आहे पण वरच्या घरात रेंज येत नाही म्हणून हॅथवे फक्त खालीच वापरता येते. बूस्टर वगैरे वापरून रेंज वाढवता येऊ शकते का? >> हो . आम्ही tp-link चा range extender लावला आहे. किती लांब आहे . स्पीड आणि अंतर ह्यानुसार वेगवेगळे डिव्हाईस आहेत.

कोणतेही वायरलेस डोंगल घेऊ नका त्यात स्पीड फक्त तुम्ही त्याच्या टॉवर खाली बसलेले असाल तरच मिळते. कोंक्रीट बिल्डिंग मधल्या सळया मधील एडी करंट मुळे कोणत्याही वायरलेस वेव्ह्ज ना अडथळा येतो. वायर्ड कनेक्शन उत्तम .

साहील शहा, तुम्ही सुचवल्यानुसार बूस्टर लावला व आता उत्तम रेंज सगळीकडे मिळते आहे. नवं कनेक्शन म्हणजे परत भिंतीला ड्रील मारणं आणि नवं वायरिंग. त्यापासून सुटका झाल्याचा आनंद आहे.

साहील शहा, तुम्ही सुचवल्यानुसार बूस्टर लावला व आता उत्तम रेंज सगळीकडे मिळते आहे. नवं कनेक्शन म्हणजे परत भिंतीला ड्रील मारणं आणि नवं वायरिंग. त्यापासून सुटका झाल्याचा आनंद आहे. > धन्यवाद

पुण्यात चांगले अपलोड स्पीड असलेल्या इंटरनेट च्या शोधात आहे. सध्या टिकोना ५० Mbps डाऊन लोड / १ Mbps अपलोड चे नेट आहे. नेट सर्फिंग , नेटफ्लिक्क्स, प्राईम , ला काही ईशु नाही, पण कॉन कॉल मध्ये घरुन स्क्रीन शेअर केली किंवा व्हिडियो कॉल केला तर प्रॉबलेम येतो.

टाटा स्काय ब्रॉडबँड.
उत्तम चालल आहे. फायबर वर आहे. ५० एम बी पी एस अनलिमिटेड डेटा प्रतीमहिना. ४९९५/- मध्ये ड्युअल बँड राउटर, फायबर पॅचिंग, इन्स्टालेशन + ७ महिन्यांची फी. हे सगळं दिलंय. इफेक्टिव्ह कॉस्ट ७५०/- प्रतीमहिन्यापेक्षा कमी येते.
जिओला फायबर ले आउट करायला बर्‍यापैकी वेळ लागे असं दिसतं आहे. आणि हो त्यांचा १ जिबिपीएस चा प्लॅन १५००/- प्रतिमहिन्यांपेक्षा जास्त आहे.