घरच्या संगणकाचा मॉनिटर अचानक बंद पडतोय

Submitted by मंदार-जोशी on 15 July, 2011 - 05:35

लोक्स PC संदर्भात मार्गदर्शन हवं आहे.

माझ्या घरच्या कॉम्पुटरचा मॉनिटर अचानक मधेच बंद होतो. म्हणजे ठराविक वेळ झाल्यावर नाही - कधीही आणि फक्त मॉनिटरच बंद होतो. CPU व्यवस्थित सुरु असतो. काही वेळाने अचानक सुरु होतो. मग परत काही वेळाने बंद. हा "काही वेळ" ५ मिनिटं पण असू शकतो आणि अर्धा-पाऊण तास पण.

मॉनिटर तपासून झालाय आमच्या कॉम्प्वाल्याकडून आणि तो त्यांच्याकडे ओक्के चालतोय - असं त्याचं म्हणणं आहे. त्याने फार वेळ चालवून पाहिला नसावा.

आता तो बहुतेक CPU घेऊन जाईल. मी सगळे सेटिंग बघितले. मॉनिटर अचानक बंद पडेल असं काहीही नाहीये.

सगळे स्विचेस, वायरी लूज कनेक्शनसाठी तपासून झाल्या आहेत.

तुमच्या मते काय समस्या असावी आणि त्याचे निराकरण कसे करावे?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुसरा मॉनिटर नाही लाऊन पाहिला. पण माझा मॉनिटर दुसरीकडे (कॉम्पवाल्याकडे) व्यवस्थित चालतोय.
म्हणजे लोचा सिपियु मधेच आहे.

सी मॉस बॅटरीचा काही संबंध असावा का?

सी मॉस बॅटरीचा काही संबंध असावा का?>>> असू शकतो. माझ्या कॉम्पला असा प्रॉब्लेम झाला होता. सीमॉस बॅटरी बदलल्यावर आता ठीक चालतो.

मॉनिटर बंद होतो म्हणजे त्याची पॉवर जाते की डिस्प्ले जातो???? पॉवर जात असेल तर मॉनिटरचाच प्रॉब्लेम आहे. ड्राय सॉल्डर असेल कुठेतरी म्हणुन तसं होत असावं.

मॉनिटरला पॉवर वेगळ्या पॉइंटमधुन येते की सिपियुच्या पॉवरसप्लायमधील पॉइंट मधुन???? तो पॉवर पोइंट बदलुन पाहिला कां??? एक लक्षात घ्या की मॉनिटरला पॉवर सिपियु देत नाही, तो फक्त डिस्प्ले सिग्नल पाठवतो. पॉवर परत आल्यावर तुमची विंडोज आधिच्याच स्थितीत असेल तर हा पॉवरचा प्रॉब्लेम आहे.

खरं तर तुम्ही स्वतः एखादा मॉनिटर लावुन चेक करता आलं तर बघा. नाहीतर सिपियु मधेच प्रॉब्लेम आहे असं सांगुन फोडणी पडेल.

खरं तर तुम्ही स्वतः एखादा मॉनिटर लावुन चेक करता आलं तर बघा. नाहीतर सिपियु मधेच प्रॉब्लेम आहे असं सांगुन फोडणी पडेल. >>> १००% अनुमोदन.

अरे माठ्या तो प्रॉब्लेम एक तर तुझ्या डिस्प्ले कार्डचा आहे किंवा मेमरी कार्डचा किंवा सिमॉस बॅटरीचा तिन्ही एकदा काढून परत लाव. डोक्यात जशी धूळ साठलेली झटकतोस ना उशीरा का होईना तसा तो कॉम्प एकदा व्यवस्थित साफ कर. मॉनिटर प्लग-इन वायर्स मधे बर्‍याचदा घोळ असतो. तु मॉनीटर वायरचे मेल फिमेल कनेक्टर्स पिन्स चेक कर. एक जरी मिसिंग असेल तरी तुला हा प्रॉब्लेम येतो.

आणि नाहीच जमलं तर. असं कर.

monitor.jpg

प्रॉब्लेम एक तर तुझ्या डिस्प्ले कार्डचा आहे किंवा मेमरी कार्डचा किंवा सिमॉस बॅटरीचा >>> त्याने पॉवर जाणार नाही. Happy

भ्रमा, पावर जाऊ शकते ती मेल-फिमेल कनेक्टर मधे पिन्स मिसिंग असेल तर. युपीसवर कनेक्ट करून बघ पीसी तुझ्याकडे तो इलेकट्रॉनिक्स व्होल्ट्-अ‍ॅम्पिअर मिटर असेल तर त्याने चेक करून घे एकदा.

मंदार.. मॉनिटरला सप्लाय डायरेक्ट आहे की सीपीयु मधून... सीपीयु मधून असेल तर SMPS चेक कर एकदा..

विकून टाक तो मॉनिटर आणि मस्त नवा सेकंडहँड घे तीनेक हज्जारचा म्हागडा. एवड्या तेवड्यासाठी कुठे नको त्या गोष्टीला झोमकाळत बसतोस..

फक्त अडीच वर्ष झालीत घेऊन. >>> बाळा, आडिच वर्षात संसार जुना होतो, दोन पोरं होतात, गबरू जवान गडी निम्मा म्हातारा होतो, तीन वेळा इन्क्रिमेंट होते, तीन वेळा बोनस मिळतो, पाच कंपन्या बदलून होतात, एमबीए पुर्ण होतं, आणि काय काय होतं... आणि एवढ सगळं होत असताना तुझा मॉनिटर कसा काय तोच राहील बे?

रच्याकने,
मला हाच प्रॉब्लेम आलेला पण तेव्हा पावर केबल बदलली की लगेच नीट सुरू झाला.

Pages