प्रथम तुज पाहता क्षणी
काळजाचा ठोका चुकला
प्रीतीच्या रंगात रंगूनी
जीव माझा भुलला
न दिसता तू
जीव होई कासावीस
दिसता क्षणी तू
फिरे अंगावरी मोरपीस
टाकावा तू प्रेमळ कटाक्ष
लाभावा तुझा सहवास
रहावीस तू मजसमीप
हीच या मनीची आस
जवळी असता तुला
एकटक पहावस वाटत
डोळ्यात माझ्या तुला
साठवून घ्यावस वाटत
मोहक तुझ्या हास्यान
***************************
*काव्यांजली
*विषय - अवकाळी*
*********************
घामाच्या धारांनी
फुलविले शेत हिरवेगार
पाऊस मुसळधार
अवकाळी
मातीमोल झाले
स्वप्न उद्याचे पाहिलेले
रक्त आटलेले
कष्टात
कर्जाचा डोंगर
वाढत गेला डोईवर
कोसळे भुईवर
शेतकरी
कालवली माती
भरल्या ताटात साऱ्या
हाती शेतकऱ्यां
धत्तूराच

कॉलेजातील मस्ती नि यारों की फुलवारी
नव्हतीच ती स्वस्ती तरी पण फुलवली भारी
कट्टा नि कटिंग चाय भी होता था शेरिंग
नडला आम्हाला की झालाच साऱ्यांना बोरिंग
नुसत्या एका नजरेने आंखोसे मार डालना
कुठूनस मनात धकधक तर हार्टबीट बढना
इशारो इशारो में ही पुरा पिरेड ऑफ जाना
घायाळ होतांना लाईफ के ख्वाबो में खो जाना
मावळतीचा गंध त्यात
प्रकाशाचा अंधुक दिवा
जगणे जीवन समग्र हे
सावरून साऱ्या जीवा
उगवतीचे रंग सुन्न
त्यात कोळशाची छटा
टिपूसाची झाली वाफ
सावरून साऱ्या बटा
आडोशाचा काजवा मंद
नभोनिळे आवाहन मग
बुबुळी तरंगे उत्कर्ष की
सावरून जळे हीमनग
श्वेत बोचरी केतकी
थांबे शिवालयाच्या पायथी
सुगंधावा जीव सारा
सावरून संसार माथी
कविता: मुन्नी
माणसाच्या मनातून निघणा-या ज्वालामुखीचा तिरस्कारमय लोळ
तुला अजून स्पर्शायचाय, मुन्नी!
शुभ्र सूर्यप्रकाशाप्रमाणे जीवनात सरपटताना भेटणारी सगळीच
जेव्हा ओकत होती विश्वासघाताची नागेरी गरळ
आणि
माझ्या श्रद्धेच्या समुद्राला रक्तरंजित करणारा कालवा
फसवणुकीच्या तीव्र आसुडांमुळे जेव्हा ओसंडून जात होता
तेव्हा रखरखत्या उन्हात अनवाणी जळालेल्या तळव्यांना
दुधाच्या सायीइतक्या मऊ बर्फाचा थंडावा
मुन्नी, तू कुठून बरे आणलास?
गद्दारीच्या भीषण डंखानी करपण्याची भिती वाटत नाही का ग?
आला श्रावण संख्यांनो,
चला जाऊ बाजाराला,
साज शृंगार करूया,
मास सणांचा हा आला.
भरू बांगड्या सयांनो,
गर्द हिरव्या रंगात,
सौभाग्याचे हे लक्षण,
किणकिणते हातात.
बांधू कंकण मोतीये,
मन खुलेलं क्षणात.
वाटे आकाश चांदणे,
मी बांधले हातात.
या बांगड्या लाखेच्या,
मज घेऊ वाटतात,
फुलतील इंद्रज्योती,
तिच्या साऱ्या आरश्यांत.
भळभळणार्या जखमांची फिर्याद आज होती
टोकरणारी नखे कुणाची दगाबाज होती
फुलाफुलांचे पलंग सजले इथेच तारुण्याचे
चितेतली लाकडे कुठे ती घरंदाज होती
आम्हांस अंधारात ठेवले म्हणणार्या माझ्यांनो
व्यथा नागडी तिजला सार्यांचीच लाज होती
कधी न माझ्यावरी बरसल्या श्रावणधारा जरी
तहानूली आसवेच माझा ऋतुराज होती
उठ आता तु 'प्रविण' बाकी बरेच अंतर आहे
गळुन गेली नयनांमधुनी ती रिवाज होती
मुकेपणाचा जरी जन्मभर आव घेत होतो
नसेल ठाउक तुला,तुझे मी नाव घेत होतो
वळणांवळणांवर विश्रांती उगा बहाने
नसेल ठाउक तुला, पुन्ह्यांदा डाव घेत होतो
कूठे जायचे पुसणार्या वाटांनी वेडे केले
नसेल ठाउक तुला, दिशांचा ठाव घेत होतो
मढ्यापूढे रडणार्यांच्या थव्यात सामिल झालो
नसेल ठाउक तुला, प्रितीचा भाव घेत होतो
बघुन बिंब ओंजळीत माझे असा हरवलेलो नसेल ठाउक तुला,तुझा पेहराव घेत होतो
बाजारु भावाने र्हदये विकणार्या प्रेमाचे
नसेल ठाउक तुला, विकत ते गाव घेत होतो
एक उठाव करायला काय लागतं?
एक उठाव करायला
किती माणसं लागतात?
एक हजार, दहा हजार
पंचवीस की एक लाख?
पंधरा-वीस किंवा दोन चार माणसंही
उठाव करु शकतात ना?
एक उठाव करायला
किती बंदुका लागतील..?
आणि काडतुसं किती पुरतील?
दारुगोळा कसा मोजायचा, पण
हिशोब ठेवायचा का उठावाचा?
धमन्यांतले रक्त किती घट्ट लागेल,
एक उठाव करायला किती वक्त लागेल?
चिडून पेटून करायचा की
शांतपणे तंबाखू मळत करायचा...?
एक उठाव करायचा असेल तर कसा करायचा?
श्री गणरायाला वंदन करुन सादर करत आहोत खास सोशल मिडीया सॅव्ही मंडळीसाठी आमचे एक खास प्रॉडक्ट.
स दा पडीक ऑन सोशल मीडिया सर्व्हिस एजेंसी चे "द ग्रेट वॉल ऑफ पोस्ट्स "फेसबुक स्टेट्स पॅकेज!! एकदा अनुभव घ्या आणि कायमचे गिर्हाईक व्हा !

आमची खास पॅकेजेस पुढीलप्रमाणे

आणि हे