एक उठाव करायला काय लागतं?

Submitted by नानाकळा on 20 September, 2017 - 10:00

एक उठाव करायला काय लागतं?

एक उठाव करायला
किती माणसं लागतात?
एक हजार, दहा हजार
पंचवीस की एक लाख?
पंधरा-वीस किंवा दोन चार माणसंही
उठाव करु शकतात ना?

एक उठाव करायला
किती बंदुका लागतील..?
आणि काडतुसं किती पुरतील?
दारुगोळा कसा मोजायचा, पण
हिशोब ठेवायचा का उठावाचा?

धमन्यांतले रक्त किती घट्ट लागेल,
एक उठाव करायला किती वक्त लागेल?
चिडून पेटून करायचा की
शांतपणे तंबाखू मळत करायचा...?
एक उठाव करायचा असेल तर कसा करायचा?

माणसं नव्हे, अंगार पाहिजे
त्यांच्या मेंदूत झंकार पाहिजे
काडतुसं संपली, बंदुकी मोडल्या तरी
ध्येयाकडे नजर कशी धारदार पाहिजे

एक उठाव करायला....
वक्त कशाला पाहिजे....?

मनात चीड पाहिजे
श्वासात हुंकार पाहिजे

-संदीप डांगे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा!
माणसं नव्हे, अंगार पाहिजे
त्यांच्या मेंदूत झंकार पाहिजे
काडतुसं संपली, बंदुकी मोडल्या तरी
ध्येयाकडे नजर कशी धारदार पाहिजे
मनात चीड पाहिजे
श्वासांत हुंकार पाहिजे
+१११

मायबोलीवरील कवितांच्या जगात नाना आपलं स्वागत!
( मला वाटतं, ही कविता बनवली हा ही एक उठावच आहे. मघाशी कट्ट्यावर झालेल्या संवादानंतर केलेला! Lol )
अभिनंदन! Happy

माणसं नव्हे, अंगार पाहिजे
त्यांच्या मेंदूत झंकार पाहिजे
काडतुसं संपली, बंदुकी मोडल्या तरी
ध्येयाकडे नजर कशी धारदार पाहिजे >>> जबरी लिहिलय मस्त आवडली कविता

वाह !