उठाव

उठाव

Submitted by @गजानन बाठे on 10 October, 2019 - 09:31

उठाव
झोपडीत माझ्या नव्हता दिवा,
गर्द अंधारी खचलो नाही.l

लाख होती छिद्रे छताला,
ज्योत तेवती विझली नाही.

भय,संशय,भूत येवूनी गेले,
माणसास मी डरलो नाही.

झालेत उठाव बंडखोर मनाचे,
तहास कधी मी झुकलो नाही

गमावण्यास ही नव्हते काही
म्हणून कदाचित हरलो नाही.

कटात काजवे सामील काही,
वार झेलले पण मिटलो नाही.

©गजानन बाठे

शब्दखुणा: 

एक उठाव करायला काय लागतं?

Submitted by नानाकळा on 20 September, 2017 - 10:00

एक उठाव करायला काय लागतं?

एक उठाव करायला
किती माणसं लागतात?
एक हजार, दहा हजार
पंचवीस की एक लाख?
पंधरा-वीस किंवा दोन चार माणसंही
उठाव करु शकतात ना?

एक उठाव करायला
किती बंदुका लागतील..?
आणि काडतुसं किती पुरतील?
दारुगोळा कसा मोजायचा, पण
हिशोब ठेवायचा का उठावाचा?

धमन्यांतले रक्त किती घट्ट लागेल,
एक उठाव करायला किती वक्त लागेल?
चिडून पेटून करायचा की
शांतपणे तंबाखू मळत करायचा...?
एक उठाव करायचा असेल तर कसा करायचा?

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - उठाव