नसेल ठाउक तुला

Submitted by कुणी दिवाणा on 23 September, 2017 - 12:22

मुकेपणाचा जरी जन्मभर आव घेत होतो
नसेल ठाउक तुला,तुझे मी नाव घेत होतो

वळणांवळणांवर विश्रांती उगा बहाने
नसेल ठाउक तुला, पुन्ह्यांदा डाव घेत होतो

कूठे जायचे पुसणार्या वाटांनी वेडे केले
नसेल ठाउक तुला, दिशांचा ठाव घेत होतो

मढ्यापूढे रडणार्यांच्या थव्यात सामिल झालो
नसेल ठाउक तुला, प्रितीचा भाव घेत होतो

बघुन बिंब ओंजळीत माझे असा हरवलेलो नसेल ठाउक तुला,तुझा पेहराव घेत होतो

बाजारु भावाने र्हदये विकणार्या प्रेमाचे
नसेल ठाउक तुला, विकत ते गाव घेत होतो

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

व्वा मस्त गझल.. आवडली. Happy
प्रत्येक शेरानंतर एक ओळ रिकामी सोडावी असं वाटतं, बदल कराल का?