काव्यांजली

Submitted by santosh bongale on 8 November, 2017 - 01:15

***************************
*काव्यांजली
*विषय - अवकाळी*
*********************
घामाच्या धारांनी
फुलविले शेत हिरवेगार
पाऊस मुसळधार
अवकाळी

मातीमोल झाले
स्वप्न उद्याचे पाहिलेले
रक्त आटलेले
कष्टात

कर्जाचा डोंगर
वाढत गेला डोईवर
कोसळे भुईवर
शेतकरी

कालवली माती
भरल्या ताटात साऱ्या
हाती शेतकऱ्यां
धत्तूराच

पिऊन ज़हर
बाभळीला घेई फास
संपवी आस
जगण्याची
******************
संतोष बोंगाळे,
पिंपळखूंटे , सोलापूर
*********************

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults