दत्त

तुझ्यावाचून

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 27 May, 2019 - 09:43

तुझ्यावाचून
*******:
सरला दिन तुझ्या वाचून
व्यर्थ जगलो जन्मा येऊन ॥

भांडी घासली या जगताची
कचरा पाणी गेले वाहून ॥

तेच हिशोब पुन्हा मांडले
त्याच खर्चात मन सांडून ॥

कळते मजला माझ्यावाचून
जग चालते युगे होऊन ॥

तरीही चाले उठाठेव ही
चक्र कुठले पायी बांधून ॥

नकोस जावू असे सोडून
दत्ता भगवे स्वप्न मोडून ॥

माळावरती पडली काडी
तुझ्या धुनीत जावी जळून ॥

जळता देह या जन्मातून
तुझाच दत्ता जावो होऊन ॥

आस लागली विक्रांतला या
आतूर काया जावी मिटून ॥

का रे उशीर

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 26 May, 2019 - 12:04

का रे उशीर

पायाखालची वाळू तापली
नसे माथ्याला कुठे सावली ॥

कंठ सुकला टाहो आटला
चाल चालूनी उर फुटला ॥

त्राण सुटले गात्र थकले
आणि अवघे यत्न सरले॥

आता केवळ तुझ्या भरोसा
दिगंबरा रे सरो निराशा ॥

दत्त म्हणता उभा ठाकसी
तुझीच ना रे कीर्ती ही ऐसी ॥

मजसाठी मग का उशीर
धाव श्रीपाद करुणाकर ॥

विक्रांतचे या हसे होवू दे
बोल नावा तव न येवू दे ॥

श्री अवधूता धाव कृपाळा
शरणागता प्रभू सांभाळा‍ ॥

दत्ता नको असे

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 24 May, 2019 - 10:53

दत्ता नको असे
*************
दत्ताला नोटांची
नको असे थप्पी
मोजतो तो जपी
तद्रूपता ॥

दत्ता नच दावू
नाणी खुळखुळ
विश्वाला समूळ
कारक जो

दत्ता न पापात
कधी दे आधार
शिक्षेला सादर
होय तिथे

दत्त नच देत
दुर्जनास बळ
धावतो केवळ
भक्तासाठी ॥

दत्त ना लोभी
सोन्याचा कधीही
विरक्त विदेही
सर्वकाळ ॥

दत्ता नच हवी
दानाची ती पेटी
आपुल्या आवडी
भक्त ठेवी

दत्त नच काळ्या
पैशात तो भागी
भक्ति प्रेम मागी
सदोदित ॥

नावडती

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 22 May, 2019 - 12:55

नावडती
*******

काय नावडती
म्हणूनिया दत्त
मज न पाहत
वळूनिया॥

लावूनिया टक
पाहते लोचना
घेईची ना मना
काही केल्या॥

जाता जवळी तो
लागू दे ना वारा
क्षणात भरारा
जाई दूर॥

ऐसिया देहाचे
करू तरी काय
सरता उपाय
भेटायचे॥

व्याकूळ हे मन
जळे कणकण
भिजती नयन
रात्रंदिन॥

जन्मोजन्मी तुझ्या
राहीन दाराला
घेऊन व्यथेला
भक्तीचिया॥

विक्रांत युगाचा
पुतळा तमाचा
श्री दत्त नामाचा
टाहो फोडी ॥

शब्दखुणा: 

दत्ता दत्ता मीत हो रे

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 21 May, 2019 - 13:25

दत्ता दत्ता मीत हो रे
तुझी फक्त प्रीत दे रे
तव गुण गाण्यासाठी
तूच तुझे गीत दे रे

दत्ता दत्ता थेट ये रे
कडकडून भेट दे रे
तन मन हरो माझे
असे काही वेड दे रे

दत्ता दत्ता माझा हो रे
देह तुझ्या काजा घे रे
मी पणे जडावला हा
असह्यसा बोजा ने रे

भजतांना तुज दत्ता
भजणेही सरू दे रे
सारे जिणे माझे तुझ्या
पदी लीन होवू दे रे

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

विषय: 

आलो गिरनारी

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 20 May, 2019 - 09:59

आलो गिरनारी देवा
हाक ऐकून आतली
धाव धावून प्रेमाने
जिवलग म्या पाहिली

आधी भेटलो शिवाला
भवनाथांच्या रूपाला
धूळ संतांच्या वाटेची
मग लावली भाळाला

असे पायथ्याला बळी
बाहू उभारून प्रेमे
उभ्या उभ्याने हसत
भेटे मारुती सुखाने

गात अलख अलख
गेलो गुहेमध्ये खोल
गोपीचंद भृतहरी
देती जीवास या ओल

आई नमिली अंबाजी
शक्ति पीठ ते थोरले
तिचे शक्ती कृपेमुळे
बळ पावुलात आले

जैन सिद्धनाथ थोर
भेटे अरिष्टनेमी ही
तया संनिधी लागली
ज्योत शांतीची ह्रदयी

माय नेम ईज संजू ! एण्ड आय एम नॉट ए टेरेरीस्ट !!

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अपलोड on 21 June, 2018 - 11:19

मै बेवडा हू.. ठर्की हू.. ड्रग एडीक्ट्स हू.. सब हू..

पर टेरेरीस्ट नही हू !!..

असं संजू बोलतो ..

विश्वास ठेवता ??

ठेवत असाल तर तो येतोय...
संजू .. संजय दत्त.. रणबीरच्या रुपात येतोय ..
एका राजकुमाराचे आयुष्य जगणे ज्याच्या नशिबी होते..
त्याला आयुष्यात काय स्ट्रगल करावा लागला याची संघर्षमय कहाणी घेऊन येतोय..
आपला मुन्नाभाय त्याची ओरीजिनल स्टोरी घेऊन येतोय..
तीनशेपेक्षा जास्त मुलींशी असलेले संबंध अत्यंत प्रामाणिकपणे कबूल करत येतोय..
फक्त त्याला टेरीरीस्ट तेवढे म्हणू नका..

विषय: 
शब्दखुणा: 

दत्त खुळी

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 6 January, 2018 - 08:30

अनवाणी पावलांनी
तंद्री लागलेल्या मनानी
ती भटकते पाऊस पांघरुनी
कृष्णेच्या काठावरती
उंच उंच घाटावरती

उभी राहते
पादुकांसमोर ठाण मांडूनी
पाय रोवूनी
ओरडणाऱ्या
सुरक्षा रक्षकांकडे
चक्क दुर्लक्ष करुनी
हट्टी मुलीसारखी
डोळ्यात पाणी आणूनी

आणि बोलत राहते भरभरुनी
महाराजांविषयी
शब्दात जीव ओतूनी
तेव्हा तिच्या त्या शब्दातून
डोळ्यातून
अन स्वरातून
ओसंडत असते
विलक्षण श्रद्धा अन प्रेम
तो कैफ लागताच
आमच्या रुक्ष पणाला
या मनाच्या बाभळीही
जातात चंदनी होऊनी

जगणे दत्तात्रेय

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 22 February, 2016 - 03:03

दत्त माझा देव माझ्या ह्रदयात
मज दिनरात
सांभाळतो ||
सरल्या आयुष्या वर्ष आन देतो
प्रारब्धा ठेवितो
सोडवून ||
लायकी वाचून यश दे भरून
काढे पाण्यातून
बुडतांना ||
सुखाचे तोरण जीवनी बांधून
सांगतो हसून
बघ जिणे ||
आतले ते दार परंतु लोटून
राहीला थांबून
का न कळे ||
सरले खेळणे कळले जळणे
विक्रांता जगणे
दत्तात्रेय ||

विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

दत्त पिसे

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 23 October, 2015 - 11:28

मज लागले रे
गुरुदत्त पिसे
अवधूत पिसे
दिगंबर |
मन विटले रे
संसारा थकले
त्यांनीच दाविले
मृगजळ |
लावूनिया डोळे
तयाचिया वाटे
मोजितो मी बोटे
काळ गणी |
करितो नाटक
जगी जगण्याचे
ध्यानी मनी त्याचे
रूप सजे |
कधी गल्लीतले
श्वान भुंकतात
पाय धावतात
दाराकडे |
वाजे खटखट
वारियाने दार
हृदय अपार
उचंबळे |
चंदनाचा गंध
हीना दरवळ
ऐसे काही खेळ
मना चाले |
कधी एकटाच
असता घरात
विभूती धुपात
नादावतो |
घेवूनी चिमटा
नेसुनी लंगोटी
करुणा त्रिपदी
आळवतो |
असे कसेबसे
निर्लज्य नाचरे
कोंडीतो मी सारे
देहभान |

विक्रांत प्रभाकर

Pages

Subscribe to RSS - दत्त