माय नेम ईज संजू ! एण्ड आय एम नॉट ए टेरेरीस्ट !!

Submitted by भन्नाट भास्कर on 21 June, 2018 - 11:19

मै बेवडा हू.. ठर्की हू.. ड्रग एडीक्ट्स हू.. सब हू..

पर टेरेरीस्ट नही हू !!..

असं संजू बोलतो ..

विश्वास ठेवता ??

ठेवत असाल तर तो येतोय...
संजू .. संजय दत्त.. रणबीरच्या रुपात येतोय ..
एका राजकुमाराचे आयुष्य जगणे ज्याच्या नशिबी होते..
त्याला आयुष्यात काय स्ट्रगल करावा लागला याची संघर्षमय कहाणी घेऊन येतोय..
आपला मुन्नाभाय त्याची ओरीजिनल स्टोरी घेऊन येतोय..
तीनशेपेक्षा जास्त मुलींशी असलेले संबंध अत्यंत प्रामाणिकपणे कबूल करत येतोय..
फक्त त्याला टेरीरीस्ट तेवढे म्हणू नका..

कधी कधी मनात सहज विचार येतो,
आपल्या संजूचे आडनाव दत्त नसून खान असते तर....

पण हा विचार करायची ही वेळ नाही..

आपले आदर्श मेले ह्यांव नी त्यांव या गप्पा मारायची ही वेळ नाही..

आता आपल्या सर्वांचा लाडका बाबा येतोय...

मला विचाराल तर 200 कोटी कुठे गेले नाहीत..
काय बोलता ?

घ्या ट्रेलर बघा ...
रणवीर बोले तो डिट्टो संजू दिसतोय !

https://m.youtube.com/watch?v=1J76wN0TPI4

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@मधुरांबे हा चित्रपट पाहू नये कृपया......>>>>>>>>>>> संदर्भा सहित कारणे द्या......
का बघावा :::
१. वाईट माणसात फासलेल्याना काय काय भोगावे लागते ते कळण्या करता..
२. समृद्ध घरातील मुले कशी बिघडतात (ड्रुग्स, अनेक महिलांशी संबंध ),ते कळण्या करता
३. एक बाप आपल्या मुलाला कश्या प्रकारे सांभाळून घेतो....
४. जेल, बेल, ड्रुग्स, १-२ तलाक, नेगिटिव्ह पब्लिसिटी, टेररिस्ट चा कलंक, त्या नंतर हि तो स्वतः परत खंबीर पणे उभा राहतो आणि अजूनही कॅरियर चालू आहे.....
महत्वाचे म्हणजे संजू बाबा बोले हिरो है,बाबा का फ्लॉप मूवी भी आपुन इग्नोर नाही करता ये तो हिट वाली है........

By: rashmi puranik

अतिशय प्रतिभावान कलाकारांना झालेलं एकमेव पुत्ररत्न... जो त्यांच्या घराण्याची Legacy पुढे नेईल... तोंडात हिऱ्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या मुलाला काय मिळालं नाही... पैसे, अडका, ग्लॅमर... कोणत्याही व्यक्तीला आयुष्यात काय हवं? चांगले आई वडील,रहायला घर... दोन वेळेचं जेवण... पायावर उभे राहण्यासाठी शिक्षण... प्रोत्साहन, प्रेम... हे minimum आहे... पण यापेक्षा आणि याहून अधिक मिळालं... तर त्या मुलाने काय करावं??? ड्रग्स, तीनशेहून अधिक मुलींबरोबर झोपण्याचा रेकॉर्ड, दहशतवादी लोकांबरोबर मैत्री, AK 47 सारखी शस्त्र बाळगणं, या देशाचे कायदे तोडणं!!?! आणि इतकं केल्यावर काय अपेक्षित आहे??ज्या समाजात आई वडिलांनी नाव कमावलं.. त्याच समाजात त्यांनाच मान खाली घालावी लागली ही कशामुळे?? स्वतःच्या चुकांमुळे तुरुंगात जावं लागलं... मार खावा लागला... खडतर आयुष्य जगावं लागलं ही कोणाची चूक?? 'टाडा' सारख्या कायद्यातून पोराची सुटका व्हावी म्हणून खंगलेल्या बापाने आपला स्वाभिमान बाजूला ठेवून कोणा कोणाचे उंबरठे झिजवले नाही, तरी परिवर्तन आलं का त्याच्या मनात?? 29 जुलै वाढदिवस साजरा केल्यावर 31 जुलैला कोर्टात न्यायाधीशांनी शिक्षा सुनावल्यावर 'मॅचो मॅन' म्हणून मिरवणारा हा हिरो ढसाढसा रडला... "मला घरी जाऊ दे.. मला दोन दिवस द्या... माझं काम, सगळे व्यवहार, घरचे... " किती वेळ न्यायाधीश समजवत होते..असं नाही होऊ शकत...या हिरोने स्वतःला वाचवण्यासाठी... कोर्टात मी बदललो.. स्वतःची प्रतिमा बनवण्यासाठी महात्मा गांधी यांना वापरून 'जादू की झप्पी' देत चित्रपट बनवले... पेरॉल वर बाहेर येऊन लग्न केलं.. मुलं होऊ दिली.. NGO माध्यमातून पैसे डोनेट केले... हे फक्त आणि फक्त सुप्रीम कोर्टात शिक्षा कमी व्हावी म्हणून argument करण्यासाठी केलं... मी एक पती आहे, पिता आहे... समाजासाठी काम करतो.. ह्यातून एक वर्ष शिक्षा कमी करून घेतली... आणि ह्याच्या या so called संघर्षावर आता चित्रपट येणार... जस्टीस काटजू जसे म्हणाले होते 90% भारतीय हे मूर्ख आहेत.. त्याचा प्रत्यय आपण पाहतो... की या टुकार माणसाचे चित्रपट आपण wow... How good... oh my god.. what a struggle.. म्हणून कौतुक सुरुये...याच स्वार्थी माणसाने
स्वतःची राजकारणाची खाज भागवून घेण्यासाठी सख्ख्या बहिणीला आठवण करून दिली तुझं लग्न झालं.. तू 'दत्त' आडनाव कशी वापरू शकते?? आणि आपण या अशा माणसाच्या 'Image building' च्या प्रयोगाला बळी पडणार... म्हणजे हॉलिवूड मध्ये नोबेल पुरस्कार विजेते Scientist..Olympic मध्ये संघर्ष करून येणारे खेळाडू... उपाशी पोटी आपल्या मुलांना शिक्षण देणारा बाप.. देशासाठी जीव देणारे सैनिक... Intelligence agency मध्ये काम करणारे गुप्तहेर, 9/11 मध्ये जीव गमावून पण लोकांना वाचवणारे अग्निशामक दलाचे कर्मचारी... कृष्णवर्णीय लोकांना न्याय मिळवून देणारा राष्ट्रपती , कृष्णवर्णीय मुलाला दत्तक घेऊन त्याला समाजात सामान्य आयुष्य जगायला मिळावं म्हणून झगडणारी आई दाखवली जाते... आणि बॉलिवूड काय करतंय?? भारतात असे आदर्श नाहीत... सामान्य घरातून संघर्ष करून मोठ्या पदावर पोहचलेले महनीय व्यक्ती नाहीत?? रिकाम्या पोटी संघर्ष करून काहीतरी घडवून आणणारा माणूस नाही?? की काहीही टाकाऊ दिल तरी Awesome म्हणणारे बिनडोक गल्लेभरू भारतीय जनता जास्त झालीये.. स्वतःची 'Image build' करून पुढच्या निवडणुकीला मत मागायला ही लोक आली तर आश्चर्य वाटून घेऊ नका... सत्य तर हेच आहे 'जसा राजा तशी प्रजा' तुम्ही जसे तसाच निवडून आलेला प्रतिनिधी आहे... तसेच तुमचे चित्रपट आहेत.. तशीच तुमची भ्रष्ट व्यवस्था आहे... काहीही बदलणार नाही... 100 कोटींचा चित्रपट म्हणून पार्टी होईल... नागरिक म्हणून आपणही तितकेच 100 कोटींमध्ये दान देऊ!!
#टुकारमाणूस #टुकारबॉलिवूड #टुकारजनता

रश्मी पुराणिक

Submitted by anamika_दे on 22 June, 2018 - 21:13>*१११+११११११
एक निरिक्षण
डी गॅंगशी संबंधित गुंडांवर बरेच चित्रपट येतात. उदा काही दिवसांपुर्वीच येऊन गेलेला दाऊदच्या बहिणी वरचा हसीना पारकर. अश्या चित्रपटांना प्रसिद्धी आणि त्यातील कॅरेक्टरला सहानुभुती मिळते. कारण हल्ली गल्लीबोळातल्या पोस्टरवर टोपणनावे दिसतात ( माया भाई, मन्याभाई टाईप ) लोक ह्यांचा आदर्श् घेत आहेत.
बाकी चित्रपटामुळे संजुबाबांचे प्रताप नव्याने कळतील. Happy

त्या नंतर हि तो स्वतः परत खंबीर पणे उभा राहतो
>>>

अश्या लोकांचे गॉडफादर असतात. जेव्हा ते म्हणजे गॉडफादर सुद्धा काही करायच्या परिस्थितीत नसतात तेव्हा हे लोकं लटकतात. पण परीस्थिती बदलताच पुन्हा हे उड्या मारायला लागतात. तर अश्याँना बिकट परीस्थितीत फक्त टिकून राहायचे असते. पुन्हा उभारी घ्यायला संघर्ष तितका नसतो.

बाकी एक कलाकार म्हणून संजय दत्तमध्ये जबरदस्त टॅलेंट आहे यात जराही शंका नाही..

@@anamika_ दत्त' आडनाव कशी वापरू शकते?? >>>>

जसे फिरोज खान शी लग्न करून हि इंदिरा खान न होता गांधीच राहिली तस......

राव ००७ तुम्ही भन्नाट भास्कर यांच्याप्रमाणेच एक विचारी आणि उमदे मनुष्य आहात हे माहीत आहे. पण तुमच्या विचारांशी मी सहमत नाही. कारणे इतर प्रतिसादात आलेली आहेत.

हिरोने स्वतःला वाचवण्यासाठी... कोर्टात मी बदललो.. स्वतःची प्रतिमा बनवण्यासाठी महात्मा गांधी यांना वापरून 'जादू की झप्पी' देत चित्रपट बनवले
>>> काहीही पुड्या सोडायच्या का. राजकुमार हिराणी ने चित्रपट बनवला आणि आधी आमिर ला विचारले होते, नंतर भूमिका संजू ला मिळलि.

राजकुमार हिराणी ने चित्रपट बनवला आणि आधी आमिर ला विचारले होते, नंतर भूमिका संजू ला मिळलि. >>> उन्नाभाईच्या पहिल्या भागात आमीर खान होता का ?

जसे फिरोज खान शी लग्न करून हि इंदिरा खान न होता गांधीच राहिली तस...... >>>> तो फिरोज खान वेगळा हो. इन्दिरा गांधीने फिरोज गांधीशी लग्न केले होते.

वाचा हे.

Indira frequently met her future husband Feroze Gandhi (no relation to Mahatma Gandhi), whom she knew from Allahabad, and who was studying at the London School of Economics. The marriage took place in Allahabad according to Adi Dharm rituals though Feroze belonged to a Zoroastrian Parsi family of Gujarat.[23] The couple had two sons, Rajiv Gandhi (born 1944) and Sanjay Gandhi (born 1946).

राजकुमार हिराणी ने चित्रपट बनवला आणि आधी आमिर ला विचारले होते, नंतर भूमिका संजू ला मिळलि. >>> उन्नाभाईच्या पहिल्या भागात आमीर खान होता का ? >>>> नाही, मधुराम्बे. फक्त आमिरला विचारले होते त्या भुमिकेसाठी.

मधुरंबे आणि पुराणिक.. तुम्हाला अस म्हणायचं आहे का की संजू ने स्वतः कथा लिहिली आणि हिराणी ला दिली की ज्यामुळे त्याची प्रतिमा बदलेल?

मग हे अकलेचे तारे तोडले आहेत की पुराणिक वरच्या कंमेंट्स मध्ये -

या हिरोने स्वतःला वाचवण्यासाठी... कोर्टात मी बदललो.. स्वतःची प्रतिमा बनवण्यासाठी महात्मा गांधी यांना वापरून 'जादू की झप्पी' देत चित्रपट बनवले...

मित्रानो तुमच्या लक्षात येत नाहीय का. जो प्रतिसाद ऋन्मेष यांच्या धाग्याला यायचा तो भास्कर च्या धाग्याला येत नाहीय. सरळ दिसत आहे की लोकांनी इग्नोर केले आहे, प्रतिसाद वाढावे म्हणून मधु हा आयडी वापरून मुद्दाम वाद घातले जात आहेत. तुम्ही कशाला उत्तरे देताय त्यांना?

मधू म्हणजे ऋन्मेष नसेल कारण ते 'ग्रहण' ची पुस्तकातील कथा अपडेट करतात रोज पलिकडे. ऋन्मेष एव्हढा त्रास नाही घेणार Proud

कटप्पा बोलले आणि त्यांचं कौतुक केलं ते आपटले तोंडावर. मी नव्याने प्रवेश घेतला तेव्हां इथल्या कुणाची ड्युप्लिकेट आयडेंटिटी आहे म्हणून संशय आणि आता थोडे दिवस काय झाले माझी ड्युप्लिकेट आयडेंटिटी कोण यावर चर्चा. अजून एक नामसाधर्म्य घेऊन आले होते त्यांच्याशीपण नाव जोडले. सुरूवातीला गंमत ठीक आहे. आता बस की. एक वेगळा आयडी म्हणून बघा. म्हणजे सक्ती नाही अजिबात.

भास्करने माझ्याप्रमाणे तिखट प्रतिसाद दिलेले मी अद्याप तरी नाही पाहीलेले. तो आयडी खूपच शांत आहे. तेव्हां त्याचा आणि माझा संबंध जोडण्यात अर्थच नाही.

मधुर,
डुप्लिकेट id घेऊन ओरिजिनल id प्रमाणे वागायचे असेल तर लोक डुप्लिकेट id का घेतील?

हा तुमच्यावर कसलाही आरोप नाहीये, तुमच्या लॉजिक मधली त्रुटी दाखवतो आहे.

काहीही पुड्या सोडायच्या का. राजकुमार हिराणी ने चित्रपट बनवला आणि आधी आमिर ला विचारले होते, नंतर भूमिका संजू ला मिळलि.
>>>>>>>

आमीर नाही शाहरूख.
हवे असल्यास लिंकही शोधू शकतो या पुष्टी देणारी..

मधू म्हणजे ऋन्मेष नसेल कारण ते 'ग्रहण' ची पुस्तकातील कथा अपडेट करतात रोज पलिकडे. ऋन्मेष एव्हढा त्रास नाही घेणार Proud
>>>>>>>
कुठे पलीकडे? आणि ग्रहण काय आहे?

@ ईमेज बिल्डींग मुन्नाभाई गांधीगिरी जादू की झप्पी वगैरे...
संजय दत्तचे वास्तव, मुसाफिर, कांटे..ईत्यादी बरेच भाईगिरीचे चित्रपट आहेत. ते त्याच्या या प्रकरणाच्या नंतरचे की आधीचे?
त्याने जाणुन बुझून इमेज बिल्ड करायचा त्रास घेतला असे वाटत नाही.. त्याला ते अंडरवर्ल्ड डॉन, किंचित भाईगिरी, निगेटीव्ह रोल वगैरे भुमिका छान शोभतात. आणि तो ते करत राहतोय आजही

एकंदरीत भास्कर च्या या आवतारात असे जाणवते आहे की ते त्यांच्या नवीन इमेज बिल्डिंग च्या प्रयत्नात आहेत.
नवीन अवताराचे कारण विचारल्यावरही त्यांनी वाट बघायचा सल्ला दिला.

भास्कर तुम्ही प्रकाश टाकावा. (धागा अवांतर होतो आहे. तुमचा धागा वापरा.)

मग हे अकलेचे तारे तोडले आहेत की पुराणिक वरच्या कंमेंट्स मध्ये >> त्यांनी काय केले यासाठी मला जबाबदार धरलेय का तुम्ही चपर च्पर्स

संजुचा ट्रेलर इफेक्टीव्ह आहे.
संजय दत्त आणि रण्बीर दोघांचेही फॅन नक्कीच बघतील चित्रपट.

बाकी अवांतर : हा त्याचा ड्यु आयडी तो त्याचा हा खेळ सतत खेळण्याचा काही आयडींनी प्रत्येकच धाग्यावर अजेंडाच चालवलेला आहे की काय अशी शंका येते. धाग्याचा विषय भरकटवण्यात इतर कुणापेक्षाही हे लोक हातभार लावतात.

Pages