Submitted by vaiju.jd on 12 January, 2014 - 08:11 ||श्री|| नाती असतात श्वासाची,नाती असतात ध्यासाची.काही नाती कधी कधी होऊन बसतात त्रासाची . नाती असतात रुजलेली,नाती असतात बुजलेली.मनाच्या तळाशी पडून असतात काही नाती विझलेली! नाती असतात जातीची,नाती असतात मातीची.अन काही नाती असतात संभाळायच्या रीतीची. नाती अंतर सांधणारी,नाती मने बांधणारीजगण्याला चैतन्य देतात नाती धुंद करणारी.नाती धीराची असतात,नाती वैराची असतात.जीवन रणांगण मानेल त्यांची नाती वीराची असतात.नाती फुलांसारखी सुकुमार,नाती फुलपाखरासारखी अलवार,दुखऱ्या मनावर फुंकर घालतात काही नाती हळुवार! नाती जगताना जुळतातजगता जगता कळतात,जन्मभर निभावूनही काही अनाकलनियच राहतात जीवनवस्त्राचे धागे नातीजीवनवेलीला आधार नातीजन्माबरोबर हात धरतात , अन मरेपर्यंत येतात सांगाती. विषय: काव्यलेखनसाहित्यशब्दखुणा: नातीGroups audience: गुलमोहर - कविताGroup content visibility: Public - accessible to all site usersशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail