मराठी असे आमुची MYबोली?

Submitted by Shilpa१ on 26 June, 2021 - 15:25

#4 मराठी असे आमुची MYबोली ?!?
#मराठी #भाषा #language

.. ट्रिंग ट्रिंग............

" हेलो स्वाती हिअर "

" सुप्रभातम, श्रीया बोलतेय, काय कशी आहेस? "

" आय अम फाईन, तू सांग खुप दिवसांनी फोन केलास, आम्ही तुला परवाच्या किटी पार्टी मध्ये खूप मिस केल यार, खुप वेट केल तुझ्यासाठी "

" अग हो नां जमलेच नाही, आधी जरा डोकं दुखत होतं मग आणि मग जरा उशिराच लक्षात आले लेकीची मराठीची परीक्षा होती हे , नाकी नऊ आले तिला समजावताना, माझा मराठीचा व्यासंग माहिती आहे ना .....हाहाहा... काय करणार आलिया भोगासी असावे सादर.., अजुन काय " इति श्रीया

“आलियाची कोणती मुव्ही आली आता मला तर माहितीच नाही”

“अगं काय हे, मी मराठी व्याकरणाबद्दल बोलतेय”

“ अच्छा अच्छा पण काहीही हं श्री, मराठी ग्रामर इतके इझी दुसरे काही काही नाही "

" पण मला जरा अवघड वाटते ग, ते स्त्रीलिंग-पुल्लिंग-नपुसकलिंग, नाम-सर्वनाम-क्रियापद व्यंजन, एकवचनी तृतीय पुरुषी आणि हे कमी पडले म्हणुन विभक्ती प्रत्यय, समास, सलाते-सलानाते, संयुक्त वाक्य बापरे डोके गरगरून गेले माझे. कालचा दिवस न 'काकुने काकाच्या कामाचे कोरे कागद...' पाठ करण्यातच गेला. आणि अलंकारात मला तर फक्त अतिशयोक्ती अलंकारच थोडाफार व्यवस्थित कळतो बाकीचे तर आठवतही नाहीत" इति श्रीया

" मे बी आमच्याकडे ना मराठीचे जरा जास्तच, काय म्हणतात ते देशस्थ कायस्थ, सॉरी सॉरी, प्रस्थ आहे. एक वर्ड सुद्धा इंग्लिशचा बोलायला अलाऊच करत नाही आम्ही मुळी किड्स ना. श्रीया यु नो, कशाचीही सुरुवात आधी स्वतःपासूनच करावी लागते. आपण एक गुड एक्झाम्पल ठेवले न मुलांसमोर कि मुले क्विकली फॉलो करतात. आमचेच बघ , माझ्या मुलांना सगळ्या राम-द्रोपदी , सीता-अर्जुन सगळ्य़ा सगळ्या जोड्या माहिती आहेत. रोज रात्री मिनिमम एक तरी एपिक स्टोरी रिड करण्याचे रुटीनच आहे त्यांचे. ''

'' अग स्वाती, राम-सीता, अर्जुन-द्रोपदी म्हणायचय का तुला ''

'' तेच ते भावना पोहोचल्या ना, तर मी काय म्हणत होते त्यामुळेच कि काय पण आमची मुले सगळे एटीकेत्ससुद्धा फॉलो करतात, गेस्ट आले न कि न सांगता इंडियन वे ने विश करतात, ओबे करतात. आम्ही गेस्टना पण स्ट्रीक्टली सांगतो मराठीतच बोला. वेल थोडा त्रास होतो आम्हाला सतत मराठी-मराठी म्यानेज करायाला पण एकदा का डिसाईड केल कि मग केल, नाहीतर काय ती कॉन्व्हेंटची मुले एक सेन्टेन्स शुद्ध मराठीत बोलत नाहीत. आपणच तर आपली संस्कृती-भाषा फॉलो करायला पाहिजे.नेक्स्ट जनरेशन ला पास ऑन केली पाहिजे . हो कि नाही ? ''

'' स्वाती, मला वाटत माझे डोक परत गरगरायला लागलाय.... ''

''अग श्रीया तुला सांगते, परवाच 'परवचा' रिड केल्याबद्दल सॅमला, आमच्या समीरला किनई...... समीरपेक्षा सॅमच आवडते त्याला, आम्ही पण रिस्पेक्ट करतो त्याच्या इंडीव्हीज्युआलीटीचा......... हा तर काय सांगत होते आमच्या सॅमला गिफ्ट मिळाले बर काआणि चीफगेस्टनी इतके अप्रीसीएट केले म्हणशील, आख्या आम्स्तरदाम मधील 'मराठीतुनच संवादाचा आग्रह धरणारे एकमेव आयडीयल मराठी Parents म्हणुन आम्हालाही फेलीसिटेट केले. इतके प्राऊड फिल केले ना.….तू पण ना जरा......इंग्लिश दूर ठेव , हवे तर माझ्याकडे पाठव ट्युशन ला, मग बघ कशी फाडफाड मराठी बोलतील तुझी मुलेपण आमच्यासारखीच. बाय द वे, महाराष्ट्र मंडळ नेदरलॅंड्च्या एस्से रायटिंग मध्ये पार्टिसीपेट करते आहेस कि नाही ? उफ काय पण विचारतेय मी, आय नो मराठीत लिहिणे जरा डीफीकल्टच आहे तुझ्यासाठी, डोंट वरी नेक्स्ट टाईम आपण सांगु त्यांना तुझ्यासारख्या मराठी मध्ये विक असणार्यांसाठी जरा इझी-पिझी सब्जेक्ट ठेवायला. चल बाई ठेवते फोन व्हालनटाईन डे च्या आधी सबमिट करायचीय माझी कविता, लेट नको व्हायला. बाकी ठीक आहेस नं……हेलो.......हेलो….....

"फोन ठेवला वाटतं. ह्म्म्म भलाईका जमाना हि नही रहा ! दीज पीपल यु नो..एनी वे, लिव्ह इट, मी करते माझ्या कवितेची तयारी, काय बर विषय आहे….हा…. मराठी असे आमुची MYबोली ?...एका तासात कविता पाडतेच कशी....आहे काय अन नाही काय !

शिल्पा
Photo credit: internet
edited फोटो क्रेडिट पुलं आणि सायली. पण धागा भरकटायला नको म्हणून तो काढून टाकला आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

फोटो क्रेडिट तुम्ही इंटरनेट अस लिहिलेय पण पण लेखातील इमेज ही सायली भगली दामले यांची आहे. इमेजवरही कॉपीराईट मार्क आहे तसा. तेव्हा तस बदलून लिहा. इमेज वापरताना सायलीची परवानगी घेतली असेल ही अपेक्षा Happy

इमेज वापरताना सायलीची परवानगी घेतली असेल ही अपेक्षा >> सहमत. परवानगी घेतली नसल्यास अथवा त्या चित्राच्या प्रताधिकार मसुद्यात 'मुक्त वापर' करण्याचा उल्लेख नसल्यास कृपया चित्र काढून टाकावे.

पण चित्रात नाव आहेच मग शेयर करताना प्रॉब्लेम काय.. सिरियसली विचारतोय... हा काही पर्सनल अथवा प्रायवेट फोटो नाहीय...

काही प्रताधिकार हे श्रेय नामासकट एखादी गोष्ट मुक्त वापरायची परवानगी देतात. आंतरजालावर सर्वच चित्रे काही मुक्त वापरासाठी खुली असतात असे नाही. त्यामुळे आपण पाहतो ती चित्रे कुठल्या प्रताधिकाराच्या अंतर्गत आहेत, त्यांना पुनर्वापर करण्याबाबत कुठले नियम लागू आहेत ह्याची माहिती काढून तशी सोय त्या प्रताधिकारात असेल तरच पुनर्वापर करावा. उदा. विकी ने त्यांची चित्रे क्रिएटिव्ह कॉमन्स द्वारे मुक्त वापरासाठी उपलब्ध केली आहेत. प्रताधिकार आहे किंवा नाही ह्याची कल्पना नसल्यास मूळ चित्रकाराची/चित्र मालकाची परवानगी घ्यायला हवी.

काही मुक्त परवाने हे मुक्त असले तरी 'ठराविक पद्धतीने श्रेय लिहावे' ह्याची मागणी करतात. तशा प्रकारे श्रेय न दिल्यासही प्रताधिकाराचा भंग होतो.

लेखिका स्वतः उत्तम चित्रकार आहेत असे लक्षात आले. त्यामुळे त्यांना कदाचित वरील मुद्द्याची कल्पना असावी. त्यांनी माहिती काढून आणि परवानगी असल्याची खात्री करूनच ते टाकले असल्यास काही हरकत नाही. अन्यथा त्यांनी स्वतः एखादे असे चित्र काढले तरी आम्हाला बघायला आवडेल Happy

जाओ पहले उस आदमीका साईन ले कर आओ शैलीत - मूळात सायली भगली दामले यांनी पुलं ची परवानगी घेतली होती का? कारण हे वाक्य पुलंच्या कॉपीराईट पुस्तकातले असावे. Wink
(अर्थात लेखिकेला "एकाने गाय मारली म्हणून दुसर्‍याने वासरू मारू नये" ही विनंती. चांगला मजेदार लेख आहे तर उगाच प्रताधिकारावरून विषयांतर नको. छान जमला आहे.)

पुलंच्या संपूर्ण लेखातील एक वाक्य कोट करणे हे वाङ्मयचौर्य नाही. संपूर्ण लेख विना परवानगी पोस्ट करणे हे मात्र आहे.

पुलंच्या नावावर काहीही खपवलं जातं हे खरं आहे. पण हे वाक्य नक्कीच पुलंचं आहे. अघळपघळ पुस्तकात "आमचे भाषाविषयक धोरण" प्रकरणात आहे (सोन्या बागलाणकर बरोबर संवादात हे वाक्य येतं).

बादवे एक वाक्य की दोन वाक्य की एक परिच्छेद याबद्धल नियम आहेत का? >> हो. ह्या बाबत नियम त्या त्या प्रताधिकार मसुद्यात दिलेले असतात.

पहिला प्रतिसाद मी दिलेला. आता ईतके प्रतिसाद बघून काय राडा झाला म्हटले तर लक्षात आले की लेखाआधी एक फोटो आहे जो मी पाहिलाच नव्हता. त्यात काहीतरी वाक्य आहे जे वाचायचे होते आणि त्यातली व्यक्ती बहुधा पु.ल. आहेत हे काहीच लक्षात आले नव्हते. मी आलो, लेख वाचला. प्रतिसाद दिला आणि निघालो Happy

मॉरल - आयुष्य किती गंमतीशीर आहे. एखादी गोष्ट काही लोकांच्या ध्यानीमनीही नसते. तर त्याच गोष्टीवरून काही लोकं मूळ लेखापेक्षा जास्त चर्चा करत असतात Happy
(ती लोकं चुकीचे करत आहेत असे यात म्हणायचे नाहीये)

मला ते इंस्टावर एकीने पाठवले होते. सायलीचे नाव मला रात्री दिसले नाही. त्यामुळे क्रेडिट देताना तसे लिहिले नाही, इंटरनेट असं लिहिले. मी स्वतः पेंटिंग्स करते त्यामुळे ज्याचं क्रेडिट हे त्याचंच आहे हे नक्कीच माहिती आहे.

वाक्य पुलंच असेल तर त्यांचं, सायलीचं असेल तर त्यांचं क्रेडिट. मी पुलंच पुस्तक वाचलं नाही त्यामुळे क्रेडिट नक्की कुणाचं ते सांगू शकत नाही. वाक्य पुलंच असेल तर कार्टून बनवण्याचं क्रेडिट सायलीचं असणार. आणि ते लेखात माझं म्हणून जोडलं नाहीये. त्याला साजेसं आहे त्यामुळे टाकलंय इतकंच. लेख खूप पूर्वी लिहिला आहे. (सायलीने कार्टून बनवताना: क्रेडिट पुलं, फोटो inspiration पुलं असं काही लिहिलं असेल का, उगाच आपली शंका)

आपण जोपर्यंत दुसऱ्याचं काम आपलं म्हणून खपवत नाहीये फक्त share करत आहोत तोपर्यँत हरकत नसावी.
(उलट बघा, इथे माझ्या लिहिण्यापेक्षा त्या चित्रालाच प्रसिद्धी मिळतेय, मीही देतेय.)
आणि हो खऱ्या आर्टिस्टला आपलं काम सगळयांनी पाहावं असंच वाटतं.
माझं पेंटिंग कुणी copyright न काढता (टाकला असेल तर:) शिल्पाचंकाम म्हणून कुणालाही पाठवू शकतो.

हा विषय संपला कि माझं लिहिलं आवडलं असेल / नसेल त्याबद्दलही नक्की सांगाल.
धन्यवाद.
शिल्पा

@ऋन्मेष
आपलं असंच असतं, तिला जाऊन किती छान केलंस ग कार्टून असं कुणी म्हणणार नाही पण दुसऱ्यांसाठी moral police बनायला तयार असतो आपण.
मीही चूक-बरोबर काही काही म्हणणार नाही Happy

@ हरचंद पालव:
माझे काही पेंटिंग्स टाकेन इथे. त्यातले कुठलेच या लेखाला साजेसे नव्हते. त्या कार्टूनमधल्या कार्टूनपेक्षा वाक्य लेखाला साजेसे वाटले होते म्हणून टाकले आणि तुम्ही म्हणताच आहात कि ते पुलंच्या पुस्तकातले आहे.
(किती किती explain करणार आहेस शिल्पा)

@सीमंतिनी
you said it !
खरं आहे. आभार :))

चप्रस , तुम्ही मायबोलीवर झालेल्या कॉपीराईटसंबंधित चर्चा वाचून पाहा. लक्षात येईल मुद्दा.

बाकी सायलीची चित्रे इतक्या ठिकाणी विना क्रेडिट शेयर झालीत की तिला आता ते अंगवळणी पडलेय.

@जाई
दिलं आहे ना क्रेडिट अजून काय करायला हवं आहे?
वाक्याचं पुलंना, त्यांचं असेल तर
कार्टून बनवण्याचं सायलीला
लेखाचं मला
कंमेंट्सचं तुम्हा सगळ्यांना Happy

शिल्पाजी, अजूनही मला फोटो क्रेडिट : इंटरनेट दिसतेय. तुम्ही धागा एडिट करून सायलीच नाव ददिलेत तर मुद्दाच निकालात निघेल . तुम्हाला रात्री दिसलं नसेलम्हणून गडबड झाली असेल हा मुद्दा मान्य.

मुद्दा फक्त सायलीच नाव येऊ देत एवढाच होता. त्याला
मोरल पोलीस , सायलीने परवानगी घेतलेली काय वगैरे फाटे फोडणे ही इथली खासियत आहे Wink आणि तुम्ही इथल्या तापलेल्या तव्यावर पोळी भाजण्याऱ्याकडे लक्ष देऊ नका. त्यांना सवय असते हात धुवून घ्यायची. तुम्ही नवीन आहात इथे. आपण चिल मारू. Happy

खूप छान लेख आणि सद्य परिस्थितीवर नेमकेपणाने मार्मिक भाष्य करणारा. आता तर महाराष्ट्रातच अनेक शाळांमध्ये मराठी द्वितीय भाषा केली आहे. त्यामुळे मुलांच्या तोंडी हिंदी इंग्रजी शब्द सर्रास असतात. पूर्वी आम्ही लहानपणी विचारायचो "याला इंग्लिशमध्ये/हिंदीमध्ये काय म्हणतात?' आता मुले विचारात "याला मराठीत काय म्हणतात?" काळाचा महिमा Happy असो. सतत ज्यावर चर्चा घडत असते असा हा मोठा विषय आहे पण लेखामध्ये खुमासदार शैलीत मर्मावर बोट ठेवलेय.

बरेचदा आजूबाजूच्या परिस्थितीमूळे आपली भाषा बदलते. लेखात परदेशातला संदर्भ आहे. तिकडे शक्यतो असे होते. अगदी ग्रामीण मराठी बोलणारी एक व्यक्ती जिला इंग्लिशचा गंधही नव्हता, ती परदेशात स्थायिक झालेली. आता पंधरा की जास्तच वर्षे झाली. दोन तीन वर्षांपूर्वी भारतात आल्यानंतर बोलताना लक्षात आले मराठी मनातून पूर्णपणे गेली होती. आणि दुसरे उदाहरण सुद्धा बघितलेय. इतकी वर्ष बाहेर राहूनही जसाच्या तसा होता मनुष्य Happy तर असे बरेच कंगोरे आहेत ह्या विषयाला.

असो. पण तितक्या खोलवर न जाता जो मुद्दा धरून लेख व ज्या शैलीत लिहिलंय ते खूपच छान. आवडले.

>> आयुष्य किती गंमतीशीर आहे. एखादी गोष्ट काही लोकांच्या ध्यानीमनीही नसते. तर त्याच गोष्टीवरून
+१११

>> खऱ्या आर्टिस्टला आपलं काम सगळयांनी पाहावं असंच वाटतं. माझं पेंटिंग कुणी copyright न काढता (टाकला असेल तर:) शिल्पाचंकाम म्हणून कुणालाही पाठवू शकतो.

हा कॉपीराइटचाच एक प्रकार आहे ज्यामध्ये लेखकाला/कलाकाराला आपली कृती नावानिशी अन्य कुणी प्रसिद्ध करण्यास हरकत नसते. मला सुद्धा माझे लिखाण माझ्या नावासहीत कुणी प्रसिद्ध केले तर हरकत नसते. पण सर्वांचेच असे असेल असे नाही. काही वर्षांपूर्वी अन्य सोमिवरील एक विनोदी लिखाण त्या लेखकांच्या नावासहीत मी माबोवर प्रसिद्ध केले. मला वाटले की त्यांच्याही नावाची प्रसिद्धी होतेय तर त्यांना आक्षेप असणार नाही. पण प्रत्यक्ष तसे नव्हते. माबोवर कुणीतरी त्यांना तक्रार वजा विचारणा केली. त्यांनीही सांगितले की मी अशी परवानगी दिलेली नाही. झालं. ते त्यांचं लिखाण माबो आणि माझ्या हार्डडिस्क दोन्हीवरून कायमचं उडवलं. खाजगी संग्रहात जतन करायला तशी हरकत नसते (नसावी बहुतेक). पण काय सांगावे? नकळत कुठे वापरले जाईल असे वाटले. जे आवडले होते ती कटकट वाटू लागली. नकोच ती कटकट म्हणून सगळीकडूनच डिलीट केले. तात्पर्य: त्या त्या लेखक/कलाकाराची परवानगी घरतलेली बरी असते Happy

@अमितव
stereotype कसं काय ? आम्ही याला अतिशयोक्ती अलंकार म्हणतो आणि हि लेखनाची एक पद्धत आहे आहे..

इतके नाही पण थोड्या फार प्रमाणात आपण सगळेच असे असतोच आजकाल, त्याला इलाज नाही कारण त्याबरोबरच वेगवेगळ्या भाषा आत्मसात करत असतोच.