कोकण

कोकणवारी..

Submitted by डीडी on 21 April, 2013 - 02:17

दर वर्षी भारतात येणं होतं, पण ह्या वर्षी मार्च-एप्रिल मध्ये घरी जाण्याचा योग आला. कोकणांत ह्या दिवसांत म्हणजे नुसती धम्माल. ह्या वेळी बाहेर खूप फिरणं नाही झालं, बहुतेक वेळ घरीच गेला. त्यातूनही घरी आणि आजूबाजूला काढलेली काही छायाचित्रं टाकत आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

"मे महिना - एक आठवण"

Submitted by अनुराधा म्हापणकर on 17 April, 2013 - 08:33

तुळशीमागला औदुंबर,
ते कौलारु मायेचं घर

कवठीचाफा.. सोनचाफा..
कर्दळ नी पिवळा चाफा
गावठी गुलाब.. लाल जास्वंद
टप्पोरं जांभूळ, चिकाची करवंदं

ते कोप-यातलं रायआवळ्याचं झाड
लाड करणारे ते हिरवे हिरवे माड

विहिरीत सोडलेला पोहरा
किंचित कुरकुरणारा रहाट
प्राजक्ताच्या सड्यांनी
तेव्हा उगवायची ती पहाट

पिकलेला आंबा,
झाडावरुन अवचित पडलेला..
रसाळ फणस,
आजोबांनी समोर बसून फोडलेला

आंब्याच्या रसाचे
कपड्यावर डाग पिवळे
गोड गोड पाण्याचे
शुभ्र मलईदार शहाळे

चूलीकडली धग, शेणाचं सारवण
वर्षाच्या बेगमीचं लाकडाचं सरपण
आजीच्या हातचं माश्याचं कालवण
रसातले शिरवाळे, आंबोळ्या नी घावण

निसर्गमय मालवण

Submitted by राहुल७ on 23 March, 2013 - 11:47

गगनबावडा घाट
IMG_0648.jpgIMG_0735.jpgIMG_0738.jpg

मालवण मासोळी बाजार
IMG_0750.jpg

मालवण मासोळी बाजार
IMG_0754.jpg

मालवण मासोळी बाजार
IMG_0755.jpg

शब्दखुणा: 

कोकण - पावस परीसर

Submitted by स्वरुप on 27 January, 2013 - 13:33

पावसला तसे दरवर्षीच जाणे होते.... यंदाच्या ट्रीपमध्ये काढलेले हे काही फोटो:

प्रचि १:
IMG_2600.JPG

प्रचि २: सोलकढी, ताक आणि मसाला पापड (Odd Combination)
IMG_2626.JPG

प्रचि ३: गणेशगुळेच्या मंदीरातील बाप्पांसमोरील उंदीरमामा
IMG_2656.JPG

प्रचि ४:
IMG_2668.JPG

प्रचि ५:

शब्दखुणा: 

निवांत कोकण......

Submitted by अतरंगी on 8 December, 2012 - 08:06

तसा मी मायबोली चा गेले ५ वर्षे सभासद आहे. पण कायम रोमात असतो ( Read Only mode ) शक्यतो कधी लिखाणाच्या फंदात पडत नाही. मला ते तितके जमतही नाही म्हणा.....

पण यावेळेस वाटले काय हरकत आहे प्रयत्न करायला.... आत्ताच कोकणात जाउन आलो म्हणलं चला एक वृत्तांत लिहुन बघूया..... सोबत भरपुर फोटोज पण होतेच.......

भरपुर दिवस झाले कोकणात जायचं ठरवत होतो पण योगच जुळून येत नव्हते. आत्ता सगळं जुळून आलं तर वरचा कोकण कि तळकोकण हेच ठरत नव्हते. शेवटी गाडी चालविणारा मी एकटाच, हातात चारच दिवस म्हणून मग वरचा कोकणच करावे असे ठरविले.....

आमी कोकणी

Submitted by इंद्रधनुष्य on 10 October, 2012 - 03:36

Yo Rocks च्या 'मु.पो.तेर्से बांबार्डे' ला झब्बू देण्याची फार इच्छा होत होती. जल्ला तेच ते झब्बू देऊन माबोकरांना बोर करण्यापेक्षा आमची कोकण भेट सत्कारणी लावणारे काही इरसाल नमुने तुमच्या साठी देत आहे.

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

नाते समुद्राशी -भाग २

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

पप्पानी जेव्हा भारती जॉइन केली तेव्हा ती खूप लहान कंपनी होती. तेव्हा कंपनी टगच्याच ऑर्डर जास्त घ्यायची. भारतीला तेव्हा टगमास्टर म्हणत असत. तरीदेखील उत्कृष्ट कामामुळे कंपनीला मोठ्यामोठ्या ऑर्डरी मिळत गेल्या. या लेखामधे जहाजबांधणी यावर थोडेसे लिहिणार आहे. तांत्रिक बाबी कमीतकमी ठेवायचा मी प्रयत्न केला आहे. त्यातही मी इंजीनीअर नसल्याने जर काही तांत्रिक चुका आढळल्या तर जरूर सांगा. Happy

विषय: 
प्रकार: 

प्राचीन कोकण संग्रहालय

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

गणपतीपुळ्यापासून अवघ्या एक किमीवर प्राचीन कोकण हे संग्रहालय वसवलेले आहे. ओपन एअर आहे आणि इथे गेल्या काही शतकांतील कोकणी जीवनशैलीची माहिती इथे देण्यात आलेली आहे. लाईफसाईझ मूर्तीमधून हा सर्व इतिहास आपल्या नजरेसमोर उभा राहतो. खास वैशिष्ट्य म्हणजे आसपासच्या गावातील मुलीना प्रशिक्षण देऊन इथे गाईड म्हणून रोजगार दिलेला आहे.

या संग्रहालयाच्या सुरूवातीलाच आपले स्वागत या मामाकडून केले जाते.

विषय: 

कोळिसरे-गणपतीपुळे-प्राचीन कोकण (भाग १)

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

रत्नागिरीच्या ट्रिपला गेलं की एकदा तरी गणपतीपुळे वगैरे फिरायची ट्रिप होतेच होते. पूर्वी कॉलेजचा अख्खा ग्रूप असे मिळून जायचो. आता एक गावात असेल तेव्हा दुसरा जगाच्या दुसर्‍या टोकाला. त्यामुळे गेल्या तीनचार वर्षात कुटुंबासोबतच फिरावं लागतय. त्यात कुटुंबसदस्य वाढत असल्याने बाईकऐवजी कारनेच फिरावे लागणे Sad

विषय: 

Pages

Subscribe to RSS - कोकण