आमच्या कोकणातल्या घरा वरचा आणखी एक लेख
पुष्पा, गो, ती मोठी कढई दे जरा पटकन घासून.
पुष्पा, तेवढं अळू दे चिरून आणि आठळ्या ही दे सोलून आळवात घालायला
पुष्पा, ह्या ओढणीचा रंग जातोय तेव्हा वेगळी धु.
पुष्पा , निखिलला घे जरा आणि आगरात फिरवून आण.... किती किरकिरतोय बघ.
तुम्ही ओळखलचं असेल ही पुष्पा कोण ते. हो बरोबर आहे … ही आमची कोकणातल्या घरची कामवाली . पु. लं च्या नारायणा सारखी हसतमुखाने सर्व आघाड्यांवर लढत असते दिवसभर.
कोकणात आमचं खूप मोठं एकत्र कुटुंब आहे. आम्ही कायम जरी तिकडे रहात नसलो तरी कारण परत्वे, मे महिन्यात , नवरात्र, गणपती अशा सणावाराच्या निमित्ताने खुप वेळा तिकडे जाणं होत असत. मी आज जी रेसिपी तुम्हाला सांगणार आहे ती मला वाटत आमच्या घरची खास चीज आहे. दुसऱ्या कोणाकडे ती बनत असेल असं मला तरी वाटत नाही. हीच नाव आहे “सुंठीची कढी”. नावात जरी ‘कढी’ असलं तरी मुख्य जेवणासाठी करायचा हा पदार्थ नाही. ही जनरली न्ह्याहरी झाली की घेतात.
आंबा मोसमाच्या सुरवातीला लिहायला घेतलेला हा लेख काही कारणामुळे आता आंबा सिझन जवळ जवळ संपला आहे तेव्हा पूर्ण झाला आहे.
आंबा हा फळांचा आणि कोकणचा राजा आहे. एप्रिल मे महिना आला की सगळयांनाच आंब्याचे वेध लागतात. आंबा आवडत नाही असा माणूस विरळाच. आमच्याकडे तर सासऱ्यांनी लावलेल्या आंब्याच्या बागा, कळश्या - हांडे डोक्यावर घेऊन आडजागी असलेल्या झाडांना घातलेले पाणी, पोटच्या पोराप्रमाणे त्यांची केलेली निगराणी, जीवाचं रान करून वाढविलेली कलमं आणि आता पुढची पिढी ही त्याच प्रेमाने ही संपदा वाढवतेय, जोपासतेय म्हणून वाटणारा अभिमान ह्यामुळे आंबा ही आमच्या मर्मबंधातली ठेवच बनला आहे .
तीन अँटमबॉंब वाजले तसा पडवीच्या कट्टयावर झोपलेला सोमा दचकला. अंगावर टॉवेल टाकून अंगणात आला आणि कानोसा घेऊ लागला.
"सुसल्या आज कोण गो गचाकला?"
घरातून सुसल्याने ऐकले नसावे. वरच्या आवाटाच्या दिशेने ढोल वाजू लागला तसे कोणीतली गचकलेच असावे हे निश्चित झाले. त्याने घरात येवून फोन फिरवला.
"हालव, मी सोमा गावकार बोलतय, तुमच्या आवाटात कोण वारला काय?" समोरून हो असे उत्तर आले असणार.
"मी आटमबामावरणाच वळाखलय.. शिक हूती काय? तीचे झील इले काय? "असे बरेच प्रश्न विचारू लागला. शेवटी समोरच्याने फोन ठेवला असणार.
मी तुम्हाला आत्तापर्यंत आमचं खळं, आगर, माळा, माजघर सगळं दाखवलं पण कोणत्याही घराचं सैपाकघर हा त्या घराचा आत्मा असतो . आमचं कोकणातलं घर ही याला अपवाद नाही . चला, आज आपण तिथली सैर करू या.
ओटी, पडवी आणि सैपाकघर यांच्या कोंदणात बसवलेलं माजघर म्हणजे कोकणातल्या आमच्या घराचा प्राण आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही .
एका बाजूला सह्याद्रीच्या रांगा आणि दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र यांच्या मध्ये असलेल्या चिंचोळ्या भूप्रदेशावर म्हणजेच कोकणावर निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केली आहे. त्यातल्या त्यात तळकोकण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा तर निसर्ग सौंदर्याची खाणच आहे. या जिल्ह्यातील देवगड तालुक्यात ... हो हो तोच.. हापूस साठी प्रसिद्ध असलेल्या देवगड तालुक्यात नाडण हे अगदी रुक्ष नाव असलेलं एक छोटसं गाव आहे . जगाचा नकाशा बघितला तर हे गाव म्हणजे एक अति सूक्ष्म टिंब . कोणाच्या खिजगणतीतही नसलेलं. अर्थात ते जगासाठी, आमच्या साठी ते सर्वस्व आहे . कारण ते आमचं गाव आहे .
मे महिन्यात आम्ही सगळे जणं गावाला जमलो होतो . दुपारच्या जेवणासाठी आंब्याचा रस काढायचा होता , म्हणून जाउबाईंनी मला माळ्यावर पिकत घातलेले आंबे आणायला सांगितलं . वेचणी घेऊन मी माळ्यावर गेले .
गणपती आणि शिमगा ... होळी नाही, या दोन सणांशी कोकणातल्या लोकांचे अगदी जिवा भावाचे आणि अतूट नाते आहे . हे दोन सण म्हणजे कोकणी माणसाच्या मनातला अगदी हळवा कोपरा आहे. या दोन सणांना जगाच्या पाठीवर पोटासाठी कुठे ही फिरणारा कोकणी माणूस आपल्या कोकणातल्या मूळ घरी येण्यासाठी जीवाचं रान करतो आणि जर नाही शक्य झालं कोकणात येणं तर मनाने तरी या दोन सणांना तो कोकणातच असतो. इथे होळीच्या सणाला शिमगा असं म्हणतात