घोषणा
मायबोलीची १४ वर्षे
मायबोलीने या गणेशचतुर्थीला १४ वर्षे पूर्ण केली. गेल्या एका वर्षात (गेल्या गणेशचतुर्थीपासून या गणेशचतुर्थीपर्यंत) आपण काय केले याचा हा एक मागोवा.
गेल्या एका वर्षात प्रकर्षाने जाणावलेली गोष्ट म्हणजे नवीन निघालेल्या/निघत असलेल्या मराठी वेबसाईटस. या सगळ्या वेबसाईटचं मायबोलीकडून स्वागत ! इतर भाषांच्या तुलनेने, मराठीत अजूनही खूपच कमी वेबसाईट्स आहेत आणि जितक्या जास्त तितक्या मराठी भाषिकांसाठी चांगलेच आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षाचा मुख्य उद्देश नवीन उपक्रम सुरु करण्यापेक्षा आहेत ते जास्त लोकप्रिय करणे, पाया जास्त भक्कम करणे असा होता. त्यामुळे फारसे नवीन उपक्रम सुरु केले नाहीत.
मायबोली स्वयंसेवक व्यवस्थापक
मायबोलीवर विविध उपक्रम गेली अनेक वर्षे सातत्याने चालु आहेत. हे सर्व मायबोलीकरांनी आपला वेळ देउन केल्यामुळेच शक्य आहे. बर्याच स्वयंसेवकानी ह्या समित्यात काम केलं आहे. अनेक जणांना यांत भाग घेण्याची इच्छा आहे. ह्या सर्वांचं व्यवस्थापन करणं हेच एक मोठं काम आहे.
मला सांगायला आनंद होत आहे की रुपाली महाजन (रुनी पॉटर) यांनी या जबाबदारीचा स्विकार केला आहे. आजपासून सर्व उपक्रमांच्या स्वयंसेवक व्यवस्थापनाचं काम त्या बघतील. त्यांनी याआधी गणेशोत्सवाच्या मुख्य संयोजकपदाची जबाबदारी सांभाळली आहे. तसेच मदत समितीतही त्या सहभागी आहेत.
त्यांना या नवीन जबाबदारीसाठी अनेक शुभेच्छा!!
थोडी डागडुजी मायबोलीची
मायबोलीवर काही थोडे बदल केले आहेत.
१) एखादे फक्त ग्रूपपुरते असलेले पान जर ग्रूपबाहेरच्या सदस्याने वाचायचा प्रयत्न केला तर त्या सदस्याला
फक्त "या पानावरच जायची परवानगी नाही" असा संदेश येत असे. पण ते कुठल्या ग्रूपमधे आहे हे न कळल्यामुळे पुढे काहीच करता येणे अवघड होते.
आता त्यात थोडा बदल केला आहे. पूर्वीच्या संदेशाबरोबरच आता, ते पान कुठल्या ग्रूपमधे आहे आणि त्या ग्रूपच्या मुख्य पानाची लिंक दिसते. ती लिंक वापरून, ग्रूपच्या मुख्य पानावर जाऊन त्या त्या ग्रूपमधे सामील होण्यासाठी लागणार्या पायर्यांमधून जाता येईल.
IE6 (इंटरनेट एक्सप्लोरर ६) ला रामराम
मायबोलीवरची नवीन सुधारणा असो, गणेशोत्सव, दिवाळी अंकासारखे उपक्रम असो या सगळ्या कामातला एक भाग म्हणजे वेगवेगळ्या Browsers वर कसं दिसतंय हे तपासून पाहणं. त्यात एक Browser नेहमीच वैताग देतं ते म्हणजे IE 6 (Internet explorer version 6). जुनं तंत्रज्ञान असल्याने इतर कुठल्याही Browser पेक्षा IE 6 कडे जरा जास्तच लक्ष द्यावं लागतं. तुमच्यापैकी जे वेब तंत्रज्ञानाशी निगडीत व्यवसाय करत असतील त्यांना याची चांगली कल्पना असेल.
विचारपूस साफसफाई
"पाऊलखुणा" पुन्हा दिसू लागल्या आहेत.
काही चाचण्या घेण्यासाठी, सभासदांच्या खात्यात असलेली "पाऊलखुणा" ही सोय , ८-१० दिवसांसाठी बंद ठेवण्यात येईल. हि सोय बंद असेपर्यंत "प्रतिसाद्+लेखन" (सभासदांनी कुठे कुठे प्रतिसाद दिले+लेखन केले) ही टॅब वापरता येणार नाही. "फक्त लेखन" ही टॅब स्वतंत्रपणे सुरु राहील आणि "माझे सदस्यत्व" वर जाऊन पाहता येईल.
-------------------------------------------------------------------
पाऊलखुणा पुन्हा सुरु केल्या आहेत.
यात एक छोटासा बदल आहे.
पूर्वी:
पाऊलखुणा-> १) लेखन+ प्रतिक्रिया (एकत्र) २) फक्त लेखन
आता:
पाऊलखुणा-> १) फक्त प्रतिक्रिया २) फक्त लेखन
डीसी महागटग वृत्तांत - नविन अचूक किनार्यावरून
बाळकृष्ण ज्ञान केंद्र
बाळकृष्ण ज्ञान केंद्र
बरेच दिवसापासुन मनात होते. व्यक्तीगत पातळीवर अनेकांना माहीती, मदत, सल्ला देणे ह्या कामाला संस्थात्मक अन व्यापक रुप देण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. बघु कितपत यश येतेय.....!
सध्या नेवासा तालुक्यातील १०० पेक्षा जास्त युवकांशी नियमित संपर्कात आहे. जुन २०११ पर्यंत (मी भारतात परत जाईपर्यंत) ते प्रमाण किमाण १००० वर नेणे हे प्राथमिक उद्दिष्ठ आहे.
' बाळकृष्ण ज्ञान केंद्र' (बाळकृष्ण नॉलेज सेंटर, करडकवाडी) ह्या उपक्रमाचे ऑर्कुट वरील प्रोफाईल ...
नेवासा तालुक्यातील (नेवासा तालुका हे एक प्राथमिक युनिट मानुन)
डीसी जीटीजी १०,११ एप्रिल २०१० (वसंता आला!!)
ऐन वसंतात एका वेळी...
कार्यक्रमाची रुपरेषा साधारण अशी-
१. शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत सगळे आमच्या घरी या. दुपारचे जेवण, गप्पा करुन मग डीसीमध्ये जाता येईल.
२. डीसीत भटकून झाल्यावर रात्रीची खादाडी restaurant मध्ये बुकिन्ग करुन करता येईल, तिथेही गप्पा मारता येतील. वेगळ्या हॉलची गरज नाही.
३. शनिवारी मुक्काम करणार्यांना हॉटेलमध्ये रहायचे असेल त्यांना मध्यवर्ती ठिकाण सुचवता येईल. ज्यायोगे त्यांना दुसर्या दिवशीही डीसीत जाता येईल. तसे कळवा.
४. ज्यांना शनिवारीच परत जायचे आहे त्यांना जाता येईल.
Pages
