IE6 (इंटरनेट एक्सप्लोरर ६) ला रामराम
मायबोलीवरची नवीन सुधारणा असो, गणेशोत्सव, दिवाळी अंकासारखे उपक्रम असो या सगळ्या कामातला एक भाग म्हणजे वेगवेगळ्या Browsers वर कसं दिसतंय हे तपासून पाहणं. त्यात एक Browser नेहमीच वैताग देतं ते म्हणजे IE 6 (Internet explorer version 6). जुनं तंत्रज्ञान असल्याने इतर कुठल्याही Browser पेक्षा IE 6 कडे जरा जास्तच लक्ष द्यावं लागतं. तुमच्यापैकी जे वेब तंत्रज्ञानाशी निगडीत व्यवसाय करत असतील त्यांना याची चांगली कल्पना असेल.
येत्या २७ ऑगस्टला, IE 6 ला ९ वर्षे पूर्ण होतील. पण अजूनही नेटवरच्या (आणि मायबोलीवरच्याही )बहुसंख्य मंडळींकडे अजून IE 6 आहे. गेल्या एक वर्षापासून Microsoft, Google, Yahoo, Facebook यासारख्या मोठ्या कंपन्यानी IE6 पासून upgrade करा अशी प्रचार मोहीम राबवली आहे. IE6 असेल तर या मोठ्या वेबसाईटचे काही भाग चालत नाहीत. काही वेबसाईट तर IE6 ला पूर्ण Block करतात.
आजपासून मायबोलीही यात सामील होत आहे. यापुढे IE6 वर मायबोलीचे सगळे विभाग चालतीलच असं नाही. इतकंच नाही तर तुम्ही IE6 वापरत असाल तर कुठलीही मदत करायला आम्ही असमर्थ असू. आपण IE6 ला ब्लॉक करणार नाही. पण यापुढचे मायबोलीचे उपक्रम, दिवाळी अंक कदाचित IE6 वर नीट दिसणार नाही.
तुम्ही IE6 वापरत असाल तर शक्य तेंव्हा पण लवकरात लवकर IE नवीन आवृत्ती (Version) किंवा इतर Browser ला बदलून घ्या.
जुने जाऊद्या मरणालागुनी.......
अगदी उत्तम कल्पना! आय ई ला
अगदी उत्तम कल्पना! आय ई ला रामराम करणेच योग्य ठरते.
(मला एक उलटा प्रश्न उमटला आहे पण. बहुतेक अस्थानी होतोय..
जुन्या मायबोलीवरील शिवाजी फॉन्ट्स फक्त आय ई वरच वाचता येतात. त्यात काहीच बदल नाही का होणार? सद्ध्या मी फायरफॉक्सचे आयईटॅब अॅडॉन वापरून वाचते. पण उबंटूवर तेही नाही चालत. त्याला काही पर्याय माहीत आहे का?)
रामराम फक्त IE 6 ला केले
रामराम फक्त IE 6 ला केले आहे. IE 7 किंवा IE 8 ला नाही.
शिवाजी फॉन्ट्स जर तुमच्या मशीनवर Download केलेले असतील तर FF वर ही दिसायला हवं.
(संपादित)
अहो ते सगळ ठिके, पण
अहो ते सगळ ठिके, पण कॉम्प्युटर बाबत माझ्यासारख्या अक्षरशत्रून्ना हे कस कळाव की IE6 आहे की अजुन कसे! इडीपीला जाऊन विचारा म्हणाल तर तेच विचारतील उलटे मला की तुला कशाला हवय हे!
तेव्हा जरा विस्कटून सान्गा की राव, आहे ते व्हर्जन कसे समजावे, नविन कुठून डाऊनलोड करुन घ्यावे वगैरे वगैरे!
सहावरून आठ केला. काही ठिकाणी
सहावरून आठ केला.
काही ठिकाणी चौकोन दिसताहेत.
उदा. -
निवडक १० त नोंदवा
लहान होतो...बरं होतं! नवीन निंबुडा
यात शेवटी चौकोन दिसत आहेत. यासाठी काय करायचे?
आय ई व्हर्जन कळण्यासाठी
आय ई व्हर्जन कळण्यासाठी :
आय.ई. मध्ये हेल्प वरती टिचकी मारा आणि 'about internet explorer' हा ऑप्शन निवडा.
मग येणार्या नविन खिडकीत व्हर्जन दिसेल.
आय.ई ८ येथून उतरवून घेता येईल.
तुमच्या Browser च्या Help
तुमच्या Browser च्या Help मेनूत जा. तिथे About Internet explorer वर जा. तिथे version दिसेल.
IE8 मधल्या चौकानाबद्दल उपाय शोधतो आहोत. फक्त काहि ठिकाणीच देवनागरीतले स्पेस अक्षर आहे तिथे हे दिसते आहे. पण सगळीकडेच स्पेस साठी हे येत नसल्याने अजून शोध चालू आहे.
नन्द्या आणि अॅडमिन टीम,
नन्द्या आणि अॅडमिन टीम, धन्यवाद
माझ्याकडे IE7 आहे
वरील ८ चे प्रोब्लेम लक्षात घेता सध्या सातच ठेवावे असा विचार आहे
गुगल क्रोम हे काय आहे? ब्राऊझरच आहे ना? त्यात दिसते का मायबोली?
>>त्यात दिसते का मायबोली? तू
>>त्यात दिसते का मायबोली?
तू सांग बरं बघून
मै तो बचपनसे फायरफॉक्स ही युज
मै तो बचपनसे फायरफॉक्स ही युज करती हूं.
गुगल क्रोम मी वापरतोय. दिस्त
गुगल क्रोम मी वापरतोय. दिस्त सगळं त्यात.
मामि किसके बचपनसे ? आपके के फाय्रफाक्षके ?
गुगलक्रोमाची एक वाईट खोड आहे.
गुगलक्रोमाची एक वाईट खोड आहे. लिहिताना काही चुकलं आणि ते दुरुस्त करायला गेलं की तो अगम्य भाषेत शिव्या द्यायला लागतो.
खरय देवा, खाडाखोड करायची
खरय देवा, खाडाखोड करायची नाही, आधी हव ते सगळ लिहायच आणि मग नको ते स्पेस देउन देउन खोडायचं....
शाळेत तरी वेगळ काय शिकवायचे म्हणा...
क्रोम्यात अनुस्वारालाही त्रास
क्रोम्यात अनुस्वारालाही त्रास होतो कॅपिटाल एम वापरावा लागतो. दुरुस्त करताना फार त्रास होतो. टाइप केले पाण्यात जाते. मग मी आय ई चालू करतो
फायर फॉक्स वापरा.. सध्या तरी
फायर फॉक्स वापरा.. सध्या तरी काही प्रॉब्लेम नाहीयेत.. पूर्वी कधीतरी यायचा प्रॉब्लेम पण आता तोही नाहीये.. आणि फुकट पण आहे... सो नो कटकट...
आमच्या कंपणीत आयई ६ च असल्याने पर्याय नाही... चुकून माकून आयई ७ झालेच तर मग वापरु आयई ७..
IE 8 मधे काही ठिकाणी चौकोन
IE 8 मधे काही ठिकाणी चौकोन दिसायचे ते प्रश्न सोडवला आहे.
जुन्या मायबोलीतले लेखन युनिकोडात आणण्यासाठि वर काही कल्पना दिल्या होत्या. पण त्यात अजून काही अडचणी आहेत त्यामुळे त्या अमलात आणता येत नाही आहेत. त्यावरून अजून गोंधळ होऊ नये म्हणून त्या विषयाशी लिहलेल्या प्रतिक्रिया आणि आमची मूळ प्रतिक्रिया अप्रकाशित करतो आहोत.
अॅडमिन-टीम, धन्यवाद.
अॅडमिन-टीम, धन्यवाद.
http://www.maayboli.com/new4me_all या सूचीत चौकोन दिसायचे ते आता गेले.
'निवडक १० त नोंदवा ' वगैरे ठिकाणी मात्र अजून दिसतात.
हिम्सकूल ना अनूमोदन... फाफॉ
हिम्सकूल ना अनूमोदन... फाफॉ वापरा.. काहीही प्रोब्लेम येत नाही त्यात.
माझ्या मशीनवर आधी IE 6 होता.
माझ्या मशीनवर आधी IE 6 होता. हल्ली हल्लीच IE ८ install करून दिलंय इथल्या नेटवर्किंग टीम ने. लास्ट वीक पर्यंत बरं चालं होतं. पण काल पासून मला कुठल्याही बीबी वर काहीही पोस्टताना अध्ये मध्ये "reply to comment" असे हेडींग येते आणि पुढे कितीही क्लिक केले कुठेही क्लिक केले तरिही ती पोस्ट पडतच नाहीये. काय प्रॉब्लेम असू शकेल?
खालील इमेज बघणे. 
कंप्यूटर रीस्टार्ट करून झाला. कॅश, कुकीज वै. उडवूनही झाल्या. भरपूर वेळा लॉगिन -लॉगआऊट ही करून पाहिले. कधीतरी पोस्ट सबमिट होते. पण अधुन मधुन हा प्रॉब्लेम येतोच आहे. स्पेशली जेव्हा एखाद्या बीबी वर "नवीन १०" अशा लिंक वर क्लिक करून आपण जातो तेव्हा त्या बीबी वर एखादी पोस्ट टाकू गेल्यास हमखास असा प्रॉब्लेम येतोय हे मी मार्क केलंय. अॅडमिन कृपया जरा बघतील का? आता ही पोस्ट पण मी टाकू शकेन की नाही अशी शंका आहे. सेम प्रॉब्लेम विथ विपू. कुणाला विपू करू गेल्यास अधून मधून हाच प्रॉब्लेम! IE ८ चा काही issue असेल का?
Chrome is fast, Chrome is
Chrome is fast, Chrome is future.
क्रोम हा IE (Any version) दुप्पट वेगाने चालतो. मी रिलीज झाल्यापासुन वापरतोय मायबोलिवर काही त्रास नाही
खोडाय साठी space-del-del असे करा
लोक अजुन IE6 वापरतात