"पाऊलखुणा" पुन्हा दिसू लागल्या आहेत.

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago
Time to
read
1’

काही चाचण्या घेण्यासाठी, सभासदांच्या खात्यात असलेली "पाऊलखुणा" ही सोय , ८-१० दिवसांसाठी बंद ठेवण्यात येईल. हि सोय बंद असेपर्यंत "प्रतिसाद्+लेखन" (सभासदांनी कुठे कुठे प्रतिसाद दिले+लेखन केले) ही टॅब वापरता येणार नाही. "फक्त लेखन" ही टॅब स्वतंत्रपणे सुरु राहील आणि "माझे सदस्यत्व" वर जाऊन पाहता येईल.
-------------------------------------------------------------------

पाऊलखुणा पुन्हा सुरु केल्या आहेत.

यात एक छोटासा बदल आहे.
पूर्वी:
पाऊलखुणा-> १) लेखन+ प्रतिक्रिया (एकत्र) २) फक्त लेखन

आता:
पाऊलखुणा-> १) फक्त प्रतिक्रिया २) फक्त लेखन

विषय: 
प्रकार: 

पाऊलखुणा का दिसत नाहीत हेच विचारण्यासाठी आलो होतो. (हे जिथे विचारायचे तो धागा शोधायलाही पाऊलखुणा शोधायला लागलो. )

खुलाशाबद्दल धन्यवाद.

>नक्की कसल्या चाचण्या घेताय?<
पावलांचे छप्पे नीट उमटत नसतील. शाई संपली असेल. नवीन शाई भरून स्वतःच्या पावलांच्या खुणा नीट उमटत आहेत ना याची चाचणी घेणार असतील. Uhoh

>>कोणीतरी यती माबोजंगलात आलाय म्हणे ! त्याला शोधून काढत आहेत.

Rofl टू मच!

ह्या पानाचा मला पत्ताच नव्हता. त्यामुळे अ‍ॅडमिनना मेल लिहिण्याचा गाढवपणा केलाच Sad सॉरी हं अ‍ॅडमिन.

निंबुडा, किरण, केदार.. Lol किती तो जाच अ‍ॅडमिनना!

नीरजा, ए जिनियस कन्व्हर्ट्स अ प्रोब्लेम इंटू अ‍ॅन आपोर्च्युनिटी! चान्स मार, चान्स!! Proud

श्श्याऽऽऽ....
जुन्या माबोवर कस? त्यावेळेस ह्या पाऊलखूणा वैगरे फ्याडं नसली तरी एखाद्या आयडीला "टीच्चून" फॉलो करता यायच ट्री डिस्प्लेमधे! Happy
हल्लीच सगळच अनोख!
असो! होईल सगळ ठाकठीक

पाऊलखुणांशी संबंधित एक बदल हावरट आगाऊपणे सुचवतोय. काही websites चर एखादे पान किती लोकांनी पाहिले/वाचले याची नोंद होते, तसे मायबोलीवर करता येईल का?

इमेल न्युजलेटर काय प्रकार आहे? अन त्याचा वापर कसा करायचा?

मी पण सध्या न्युजलेटर वर काम करतो हे....मल असविस्तर सांगा! Happy

चंपक : मायबोली पत्रकाबद्दल खालील धाग्यावर माहिती मिळेल.

>>http://www.maayboli.com/node/15860

स्वप्ना_राज्/डुआय - चाचण्या संपल्या की अ‍ॅडमिन येऊन सांगतीलच.
तोवर थोडा धीर धरा.

पाउलखुणा लवकर सुरु करा राव,आपल्या घरातून उठून धर्माशाळेत येउन राह्यल्यासारखं वाटतयं Wink

नकाच सुरु करू पाऊलखूणा
लोकांना कशाला नसत्या पंचायती कोण कुठे गेलं आणी काय केलं त्याच्याशी? Wink

नकाच सुरु करू पाऊलखूणा
लोकांना कशाला नसत्या पंचायती कोण कुठे गेलं आणी काय केलं त्याच्याशी?
>> चालेल, पण किमान निवडक १० ऐवजी निवडक ५० ची तरी सोय द्या.

Pages