मायबोलीची १४ वर्षे

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago
Time to
read
1’

मायबोलीने या गणेशचतुर्थीला १४ वर्षे पूर्ण केली. गेल्या एका वर्षात (गेल्या गणेशचतुर्थीपासून या गणेशचतुर्थीपर्यंत) आपण काय केले याचा हा एक मागोवा.

गेल्या एका वर्षात प्रकर्षाने जाणावलेली गोष्ट म्हणजे नवीन निघालेल्या/निघत असलेल्या मराठी वेबसाईटस. या सगळ्या वेबसाईटचं मायबोलीकडून स्वागत ! इतर भाषांच्या तुलनेने, मराठीत अजूनही खूपच कमी वेबसाईट्स आहेत आणि जितक्या जास्त तितक्या मराठी भाषिकांसाठी चांगलेच आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षाचा मुख्य उद्देश नवीन उपक्रम सुरु करण्यापेक्षा आहेत ते जास्त लोकप्रिय करणे, पाया जास्त भक्कम करणे असा होता. त्यामुळे फारसे नवीन उपक्रम सुरु केले नाहीत.

मायबोली.कॉम

लाईव मिंट (वॉल स्ट्रीट जर्नलशी संलग्न) या इंग्रजी दैनिकाने संपूर्ण स्वतंत्र संशोधनावरून असा निष्कर्ष काढला की मायबोली ही फक्त मराठीतलीच नाही तर देवनागरीतली पहिली वेबसाईट आहे. त्याबद्दल त्यांनी मायबोलीवर एक खास लेखही प्रकाशित केला. एका नावाजलेल्या दैनिकाकडून असा उल्लेख झाला ही मायबोली आणि मायबोलीकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

मायबोलीवर आता सर्रास देवनागरीत आयडी दिसतात. आणि ही सोय याच वर्षात (Nov 2009) सुरु झाली.

गणेशोत्सव २००९
पन्ना (सपना पाध्ये) यांच्या नेतृत्वाखाली , गणेशोत्सव समितीने २००९ चा गणेशोत्सव यशस्वीपणे आयोजीत केला.

दिवाळी अंक २००९
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सूवर्णमहोत्सवी वर्षात, स्वाती_आंबोळे यांच्या नेतृत्वाखाली आपण २००९ चा अंक प्रकाशित केला. गेले दहा वर्ष सतत चालू असलेली ही एक सांस्कृतिक चळवळच म्हणता येईल. गेल्या ५० वर्षात , महाराष्ट्राचा, मराठी संस्कृतीचा आढावा घेणारं "प्रिय अमुचा.." हे अभ्यासपूर्ण सदर हे या अंकाचं एक वैशिष्ट म्हणता येईल.

मदत समिती आणि स्वागत समिती
सतत वर्षभर शांतपणे मदत समिती आणि स्वागत समिती काम करत असते. नवीन सभासदांना मायबोली कुटुंबात सामावून घेण्यासाठी या मंडळींचा महत्वाचा वाटा आहे.

स्वयंसेवक व्यवस्थापक
रुपाली महाजन (रुनी पॉटर) यांनी या जबाबदारीचा स्विकार केला आहे. सर्व उपक्रमांच्या स्वयंसेवक व्यवस्थापनाचं काम त्या बघतात.

संयुक्ता
फक्त एका वर्षापूर्वी, वैशाली राजे (लालू) यांच्या नेतृत्वाखाली सुरु केलेल्या "संयुक्ता" ला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. फक्त स्त्रियाच या ग्रूपच्या सभासद असतील याची खात्री करून मगच त्यांना सभासद केलं जात असल्याने, सभासदांमधे एक वेगळा विश्वास निर्माण होतो. संयुक्ताच्या सभासदांनी मराठी भाषा दिवस, महिला दिवस, महिलांसाठी सर्वे, वेगळ्या क्षेत्रातल्या कर्तबगार स्त्रियांशी संवाद आणि इतर कितीतरी फक्त सभासदांसाठी असलेले उपक्रम यशस्वीपणे पार पाडले.

मराठी भाषा दिवस
या वर्षी पहिल्यांदाच आपण मराठी भाषा दिवस साजरा केला. मराठीसाठी आणि मुलांसाठी काहीतरी वेगळं करावं या हेतुने सुरु केलेल्या उपक्रमाला खूपच छान प्रतिसाद मिळाला. हा उपक्रम अगदी थोडा कालावधी असतानाही त्याची जबाबदारी घेतल्याबद्दल संयुक्ता प्रशासनाचे आभार.

अक्षरवार्ता
चिन्मय दामले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेला हा उपक्रम या वर्षीही तितक्याच सातत्याने चालू राहिला आहे.

वर्षाविहार २०१०
विनय भिडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजीत केलेल्या वार्षिक वर्षाविहार मेळाव्याला आजपर्यंतची सर्वाधिक उपस्थिती मायबोलीकरांनी लावली.

टीशर्ट २०१०
विनय भिडे यांच्या नेतृत्वाखाली टीशर्ट समितीने तयार केलेले टिशर्ट मायबोलीकरांना खूप आवडले. पल्ली (पल्लवी देशपांडे) यांनी टिशर्टसाठी सुलेखन तयार करून दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद.

जीटीजी (GTG)
वर्षभरात वेगवेगळ्या ठिकाणी मायबोलीकरांची संमेलने होत असतात. मुंबई-पुण्याबरोबरच बंगळूरू, न्यूजर्सी, अटलांटा इथेही सातत्याने संमेलने होऊ लागली आहेत. मध्यपूर्वेत गेल्या वर्षात पहिल्यांदाच संमेलन झाले.
वॉशिंग्टन डीसी इथे झालेल्या पहिल्या मोठ्या संमेलनात अमेरिकेतल्या १२ राज्यातून मायबोलीकर उपस्थित होते.

मराठी उद्योजक
ज्याना स्वत:चा उद्योग सुरु करायचा आहे, व्यावसायिक नेटवर्किंग करायचे आहे त्या मायबोलीकरांसाठी आपण "मराठी उद्योजक" ग्रूप या वर्षात सुरु केला आहे.

खरेदी विभाग

नवीन प्रकाशक/भागीदार (partners/providers)
या वर्षात मेनका प्रकाशन, प्रशांत देगावकर, दिपाली देशपांडे, Eterne Gold, माईंड अँड मिडिया, समीर आगटे या नवीन भागीदारानी मायबोली खरेदी विभागात त्यांच्या वस्तू विक्रिस ठेवल्या. मायबोलीवर विक्रिसाठी वस्तू ठेवणारे भागिदार एकूण २१ झाले आहेत. मायबोलीचे एक व्यावसायिक भागिदार "विहंग प्रकाशन" यांनी मायबोलीवर पुस्तके विक्रीला ठेवल्यावर त्यांना आलेल्या चांगल्या अनुभवावर आधारित एक प्रशस्तीपत्रही दिले आहे.

खरेदी विभागात या वर्षी आपण भारतातही पुस्तके विकायला सुरुवात केली आहे आणि भारतातल्या मायबोलीकरांकडून त्याला चांगला प्रतिसादही मिळतो आहे.

खरेदी विभागाचे काम पाहणार्‍या सौ. विद्या जोशी यांचे आभार.


जाहिराती विभाग

जाहिराती विभागात (मायबोलीवर इतरत्र होत असलेल्या बदलांच्या तुलनेत) फारसे बदल गेल्या वर्षात झाले नाही. या उपक्रमासाठी मदत केल्याबद्दल श्री दिपक ठाकरे (साजिरा) यांचे आभार.

कानोकानी.कॉम
कानोकानी ही संकल्पना अजून रुजतेय. बर्‍याचा जणांना अजून कानोकानीचा फायदा कसा करून घ्यावा हे पुरेसे समजले नाहीये हे लक्षात आल्यावर कानोकानी समितीने नियमितपणे तिथे बदल करायला सुरुवात केले आहेत. कानोकानीवर येणारा वाचकवर्ग हळूहळू वाढतो आहे. जे वाचक नेहमी मायबोलीवर इतरत्र येत नाहीत ते तिथे येत असतात. एक उदाहरण द्यायचं झालं तर गेल्या वर्षीच्या मायबोलीच्या दिवाळी अंकाला पहिल्यांदाच भेट देणारे २१७ नवीन वाचक हे कानोकानीवरच्या लिंकवरून आले होते. म्हणजे कानोकानी नसते तर मायबोलीचा दिवाळी अंक असतो हे कदाचित त्यांना माहिती झाले नसते.


इतर प्रशासकीय आणि कार्यालयीन कामे

या शिवाय हार्डवेअर्/सॉफ्टवेअरची डागडुजी, सर्वरचे संरक्षण, बॅकप, लेखांची हलवाहलवी, साफसफाई आणि वर्गिकरण, हितगुजवरच्या गरमागरम चर्चेला थंड करणे, एखाद्याला डच्चू देणे ही कामे चालूच असतात. मार्चमधे मायबोलीचा सर्वर बंद पडला तेंव्हा सुदैवाने कुठलाही मजकूर वाया न जाता त्याला पुन्हा जिवंत करता आले.

मधूनच काही वाचकांना " Server Not available due to Technical reason" अशा अर्थाचा संदेश गेल्या काही महिन्यात यायला लागला आहे. मायबोली वरच्या वाढत्या वावराचा हा एक परिणाम आहे. सर्वरची क्षमता वाढवण्याचे प्रयत्न चालू आहेत.

मायबोलीचे कॉर्पोरेटायझेशन झाल्यापासून सगळ्या खर्चाचा ताळेबंद ठेवणे, प्राप्तिकर आणि विक्रिकर यांचा परतावा सादर करणे यासारखी महत्वाची कामे (अमेरिका आणि भारत दोन्ही देशांत) वेळच्या वेळी पार पाडली.

भविष्यातले उपक्रमः
मायबोलीने अगदी सुरुवातीपासून "आधी केले, मग सांगितले" हे धोरण ठरवून घेतले आहे. त्यामुळे नवीन उपक्रमांबद्दल आधी सांगणे योग्य होणार नाही. साधने, वेळ यांच्या अभावामुळे संयोजन केलेले अर्धेच प्रकल्प पुढे जातात किंवा जे जातात त्याना वाटते त्यापेक्षा कितीतरी जास्त वेळ लागतो. एका अर्थाने हे त्या उपक्रमांसाठी आणि संस्थेच्या वाटचालीसाठी योग्य असते कारण अशा अवघड वाटचालीतून पार पडणारे प्रकल्प यशस्वी होण्याची शक्यता ही वाढते.

आम्ही कोण मधे म्हटल्याप्रमाणे "सर्वात मोठी, सगळ्यात उत्कृष्ट,सर्वसमावेषक" मराठी वेबसाईट करण्याचा आमचा मानस नाही. जितकं शक्य आहे तितकं करायचं पण मनापासून करायचं इतकंच.

-----------------------------------------------------------------------------
विविध समित्यांवर काम केलेले मायबोलीकरः

मदत समिती: रुनी पॉटर, नंद्या

मराठी उद्योजकः
मिलिंद माईणकर (भ्रमर), दीपक कुलकर्णी (डुआय),मयूरेश कंटक (मयूरेश),गोविंद सोवळे (जीएस), अल्पना खंदारे (अल्पना),अश्विनि खाडिलकर (अश्विनीमामी),नवीन केळकर (शुभंकरोति), अनिलभाई सांगोडकर(अनिलभाई), रूपाली महाजन(रूनी पॉटर),अजय गल्लेवाले (अजय), भाग्यश्री कुलकर्णी-करकमकर (बस्के), समीर सरवटे (समीर), वैशाली कालेकर (आशि), भारत करडक (चंपक), कामिनी फडणिस केंभावी (श्यामली)

गणेशोत्सव २००९ - (पन्ना) -सपना पाध्ये , (पराग) - पराग सहस्रबुद्धे, (अल्पना) - अल्पना खंदारे, (बस्के) - भाग्यश्री कुलकर्णी-करकमकर, (चंपक) - भारत करडक, (सिंडरेला) - तृप्ती आवटी, (राहुल) - राहुल जोग

दिवाळी अंक २००९
स्वाती आंबोळे (स्वाती_आंबोळे), गजानन देसाई (गजानन), कौतुक शिरोडकर (कौतुक शिरोडकर), मंजुषा वैद्य (मृण्मयी), परागकण, ट्युलिप गोखले(ट्युलिप), विनय देसाई (परदेसाई)

अक्षरवार्ता
अश्विनी के, नंद्या, साजिरा, श्रद्धा, अनीशा, आशूडी, rar, अंशुमान सोवनी

संयुक्ता व्यवस्थापनः
लालू, शैलजा, स्वाती_दांडेकर, स्वाती_आंबोळे,रूनी पॉटर,anudon,अदिती,मैत्रेयी,रैना,सीमा

संयुक्ता सभासदत्व स्वयंसेवकः
रैना, नंदिनी, नीधप, शर्मिला फडके, अनिता, सशल, पूर्णा, भाग्य, शर्मिला, रुनी पॉटर, संपदा, भाग्यश्री

मराठी दिवस २०१०
अमृता, बस्के, चिन्नु, रैना, सायलीमी, सायो, सिंडरेला, सीमा, संयुक्ता व्यवस्थापन, स्वाती आंबोळे

महिला दिन २०१०
अल्पना , रैना , anudon, पौर्णिमा , अनिता, नंदिनी, मृण्मयी, मृदुला, रूनी पॉटर, वर्षा, सखीप्रिया, स्वाती_आंबोळे, सुनिधी, मीन्वा, रमा, क्षिप्रा, अश्विनीमामी आणि केदार

वर्षाविहार २०१०
MallinathK, sameer_ranade, अश्विनी के, असुदे, कविता नवरे, डुआय, दक्षिणा, नील वेद, प्रणव कवळे, मधुरा भिडे, मनिषा लिमये, राज्या, ललिता-प्रीति, विशाल कुलकर्णी, सचिन_साचि

टीशर्ट २०१०
मंजूडी, दक्षीणा, परेश लिमये, मेधा२००२, anandsuju,

कानोकानी
अश्विनीमामी, आऊटडोअर्स, चंपक, डॅफोडिल्स, नात्या, मन-कवडा, महागुरु, विनायक, सायो

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

सुरेख आढावा Happy

पुढील यशस्वी वाटचालीसाठी मायबोलीला आणि सर्व मायबोलीकरांना मनःपूर्वक शुभेच्छा.

मायबोलीचे १५ व्या वर्षात पदार्पणाबद्दल हार्दिक अभिनंदन... आणि पुढील वाटचालींसाठी हार्दिक शुभेच्छा...

शुभेच्छा! आणि फार फार आभार मायबोली प्रशासनाचे इतक्या भारी साईटसाठी Happy
स्वयंसेवकांचेही आभार्स!!!
माबो चिरायु होवो!!!

मायबोलीची यशस्वी वाटचाली बद्दल काही दिवसांपुर्वीच कळालं. अशीच वाटचाल एक दिवस सुवर्ण सोहळा घडवेल समस्त मायबोलीकरांचा. एखादं सम्मेलन व्हावं देश विदेशातल्या मायबोलीकरांचं हि इच्छा.

एखादा उपक्रम १४ वर्षे सातत्याने सुरु आणि यशस्वीपणाने सुरू ठेवणे किती कठिण आहे याची कल्पना आहे. त्यामुळे तुमच्या सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन! यात तुम्हाला उदंड सुयश लाभो आणि मराठी साहित्याची ही एक चळवळ ठरो ही सदभावना. जसे 'सत्यकथा' किंवा ललित!
तुम्ही कानोकानी अजून पोचली नाही हे म्हटलेय ते खरं आहे. मलाही ते फारसे कळलेले नाही. असो.
प्रयत्न करेन म्हणतोय.
दुसरे म्हणजे मायबोलीची प्रसिध्दी. इतर भाषीकांना देखील ही चळवळ माहीती व्हावी अशी नम्र विनंती कारण साहित्य अकादमीत लॉबी नाही म्हणून ग्.दि. ना पुरस्कार नाही. त्यासाठीच अगदी अनएथिकल असले तरी ही पॉवरफुल लाँबी इतरांच्या मदतीने उभी करावी लागेल आणि म्हणून प्रसिध्दी हवीच.

हि साईट नाहि आहे हे माझे घर आहे आनि ह्या माझ्ह्या कुटुम्बाला उद्न्ड आयुश्य लाभो हि ईश्वर चरणि प्रारथ्र्‍ना

मायबोली परीवाराच अभिनंदन... हा उपक्रम इतक्या स्वस्थ पध्दतीन चालवला जातोय ते अवर्णनीय आहे.

मायबोली चालवणार्‍या सगळ्या मित्रांच कौतुक अन अभिनंदन!!!

समस्त मायबोलीकरांना मायबोलीच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
मायबोलीच्या १४ वर्षांच्या यशस्वी वाटचालीत योगदान देणार्‍या सर्व संयोजक-स्वयंसेवक यांचे आभार आणि कौतुक !
हितगुजवरच्या गरमागरम चर्चेला थंड करणे, एखाद्याला डच्चू देणे ही कामे चालूच असतात >>> हे बाकी भारी काम आहे Lol

मायबोलीतील प्रत्येकाचं अभिनंदन !

सातत्य ही सर्वात कठिण गोष्ट ज्या प्रकारे आपण साध्य केली आहे त्याला तोड नाही. <<<
रैनाच्या या प्रतिक्रियेला शब्दशः आणि अक्षरशः अनुमोदन.

Pages