विचारपूस साफसफाई

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago
Time to
read
1’

या शनिवारी (२९ मे) सगळ्यांच्या विचारपूशीची साफसफाई करण्यात येईल. तुमच्या विचारपूशीत असलेले १ जानेवारी २०१० अगोदरचे सगळे संदेश काढून टाकले जातील.

यात काही अडचण येणार असेल तर कृपया इथे लिहा.

विषय: 
प्रकार: 

>>> बाकी काही अडचण नाही Lol
हो हो, काहीच अडचण नाही Happy
फक्त एक रिक्वेस्ट आहे, पूर्वी एखादी पोस्ट किन्वा सम्पुर्ण धागा प्रिन्ट कमाण्डने वा सिलेक्ट करुन पीडीएफ बनवता यायची.
तसेच काहीसे विपु बाबत करता येईल का?

बॅकप घेता येईल का, पीडीएफ करता येईल का आणि तत्सम प्रश्न अ‍ॅडमिनटीमला का विचारताय? घेऊन/ करून बघा की स्वतःच. नाही जमलं तर मदतपुस्तिकेत/ इतरत्र विचारा.

बी अरे विपू काढत नाहीयेत कोणी.
>>तुमच्या विचारपूशीत असलेले १ जानेवारी २०१० अगोदरचे सगळे संदेश काढून टाकले जातील.

पूनम, करुन बघितलेत, एकेक पान सिलेक्ट करायचे दिव्य प्रयास इथे ऑफिसमधुन शक्य नाहीत! Sad
त्यातुनही, प्रिन्ट येताना उजवीकडील भाग (पेजवरील टेबलचा कॉलम असेल तो) तसाच मोकळा येतो ते वेगळेच Sad
आता इथे विषय निघालाच आहे तर इथेच विचारणार ना? की ब्याकअप घेणे वा पीडीएफ करायला देखिल त्रासाचे आहे, तर उपाय काय? अ‍ॅडमिनटिमला प्रश्न भावले, तर २२चि डेडलाईन थोडी लाम्बवतीलही, कुणी सान्गावे?

हे हे...................मला काहीच फरक पडत नाहिये............मी नवीनच आहे माबो वर्.............

ज्या mails आपण परत वाच्णार नसू त्या स्वतःच लगेच किंवा ठरावीक कालावधीत नियमितपणे डिलिट केल्या पाहिजेत. अडगळ सामानाचीच नाही तर इन्फो/मेल यांची ही असते.

माझ्या विपूचे टी आर पी फार कमी आहे असे मी समजते, तरी ४५ पानं आहेत. मायबोलीवरचा टी पी सांभाळून ही ४५ पानं कशी सेव्ह करू मी दोन दिवसात ? थोडी मुदतवाढ द्या ना प्लीज .

एकंदरीत आपल्या विपुची साइझ किती आहे हे शोधता येईल का ? त्यावर लिमिट ठेवून प्रत्येक सदस्यालाच वि पु त्या साईझच्या आत ठेवावी लागेल असे करता येईल का ?

१) साफसफाई २२ मे ऐवजी २९ मे या दिवशी करण्यात येईल.
२) आजपासून २९ मे पर्यंत प्रत्येक पानावर आता २० ऐवजी १०० संदेश दिसतील. त्यामुळे ज्यांना साठवून ठेवायचे त्याना सोपे जाईल. उदा. वर मेधा यांनी लिहिलेली पाने आता ४५ वरून ९ वर आली आहेत. अनेकांची पाने आता एकदम १-२ च दिसायला लागतील त्याचे कारण आताच आम्ही साफसफाई केली नसून एका पानावर जास्त संदेश केले त्याचा हा परिणाम आहे.
३) याचाच एक परिणाम म्हणून २९ पर्यंत, विचारपूशी हळू उघडण्याची शक्यता आहे.
४) बॅकपची वेगळी सोय नाही. तुम्ही ब्राऊझरमधली सुविधा वापरून पान साठवून ठेवू शकता. पानांची संख्या आता कमी झाल्यामुळे साठवणे सोपे व्हावे.

विपुत मेसेज आला की ईमेल ने कळवण्याची सोय आहे. ही सोय घेतली असेल तर सगळ्या विपू ईमेल्-बॉक्स मधे असतिलच.

विपु काढू नका प्लीsssssssssssssssssssज........ आपली इतक्या जिव्हाळ्याने कोणी विचारपूस केली असेल तर ती अशी सहजासहजी काढून टाकणं फार जड जातं हो! Sad

मंजिरी, जिव्हाळ्याचं भांडण्सुद्धा बर का Wink २९ मे अन १०० विपु हे बाकी लय भारी हा काय अ‍ॅडमन भॉ!

सफाई करा पण ते नवीन आलेली विपु परत पयल्या पानावर गेल्याशिवाय दिसत नाही ते दुरूस्त कराआणि विचारपूस चा वेगळा टॅब (उजवीकडच्या तीनही लिंकांच्याबरोबरीने) द्या हो प्लीज.

अशी सहजासहजी काढून टाकणं फार जड जातं हो! <<
इतक्या सगळ्यांच्या विपु ठेवणं किती जड जात असेल माबोला याचा काही विचार? Happy

LOL उदय, हे बाकी पटले! Lol
अ‍ॅडमिन, धन्यवाद Happy
[हुश्श्य, मला विपु येत नाहीत म्हणता म्हणता देखिल १३ पाने सेव्ह केली पीडीएफ मधे]

२९ मे या दिवशी >>> किती वाजेपर्यत जुनी विपू असेल? तेही सांगाल का?

आधीच्या विपू मेलमध्ये सुरक्षित असतील ना??

Pages