मायबोलीचे नवीन मुख्य प्रशासक
कुठल्याही संस्थेचा विकास होण्यासाठी आवश्यक असणारी एक गोष्ट म्हणजे अनेक व्यक्तिंचा त्यात असलेला सहभाग. नुसत्या अनेक व्यक्ती असणे पुरेसे नसते तर वेगवेगळ्या भूमिका आणि त्या पार पाडण्यासाठी लागणारी कौशल्ये, वेळ यांचेही गणित जमावे लागते. आणि जसे पाणी वाहते असले की जास्त चांगले तसे एकाच भूमि़केत संस्थेतली माणसे फार वेळ राहिली तर संस्थेला शैथिल्य येते, व्यक्तिही तेच तेच काम करून कंटाळतात. नवीन नेतृत्वाला संधी मिळणे आवश्यक असते. त्यामुळे व्यवस्थित नियोजन करून अंमलात आणलेला बदल आवश्यक ठरतो. आणि मी स्वतःही अशा आवश्यक बदलाला अपवाद नाही.