घोषणा

माझ्यासाठी नवीन (अजून वाचायचंय) दुरुस्ती

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

गेले काही दिवस (किंवा महिने) नवीन लेखन-> माझ्यासाठी नवीन (किंवा अजून वाचायचंय) ही लिंक काम करत नव्हती. मायबोलीवरचं तुम्ही सभासद असलेल्या ग्रूपमधलं, पण अजून तुम्ही न वाचलेलं लेखन, फक्त तिथे दिसावं असा त्याचा उद्देश आहे.
आता ही अडचण दूर केली आहे आणि ती लिंक कार्यरत झाली आहे.

विषय: 
प्रकार: 

मायबोलीवरचे नाव (ID) देवनागरीत

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

मायबोलीवरचे नाव (ID) देवनागरीत करण्याबद्दल नेहमीच सूचना असतात. मायबोली १३ वर्षांपूर्वी सूरू झाली तेव्हा युनिकोड अस्तित्वात नसल्याने सभासदांना रोमन लिपीत ID घेण्याशिवाय पर्याय नव्हता. मायबोली जुन्या प्रणालीतून नवीन युनिकोड प्रणालीत आल्यावर देखिल काही तांत्रिक अडचणींमुळे ही सुविधा देणं शक्य होत नव्हतं.

गेले बरेच महिने यावर चाचणी समितीत चर्चा चालू होती. तिथे आलेल्या सूचना आणि तांत्रिक अडचणींवर काम चालू होतं. ते आता पूर्ण झालं आहे. आता तुम्हाला आपलं सभासद नांव देवनागरीत बदलता येईल.

विषय: 
प्रकार: 

माझी आवडती १० पानं

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

मायबोलीवर खूपच लिहिलं जातंय, पण नक्की चांगलं काय हे शोधायला खूप अवघड होत चाललंय" या समस्येवर उपाय शोधायचा बरेच दिवसांचा प्रयत्न चालू आहे. सध्या "महिन्याची उत्कृष्ट कविता" ठरवणं हे याच प्रश्नाचं आणखी एक रुप म्हणता येईल.

१) नुसतं प्रत्येक पानावर मतदान घेऊन प्रश्न सुटणार नाही कारण ती एका प्रकारे लोकप्रियता स्पर्धा ठरेल. आणि सगळ्या मायबोलीकराना जे आवडेल ते मला आवडेलच असे नाही. माझी आवड वेगळी असू शकते.

विषय: 
प्रकार: 

मायबोलीचा १३ वा वर्धापन दिन

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

मायबोलीने या गणेशचतुर्थीला १३ वर्षे पूर्ण केली. गेल्या एका वर्षात (गेल्या गणेशचतुर्थीपासून या गणेशचतुर्थीपर्यंत) आपण काय केले याचा हा एक मागोवा.

मायबोली ही एकच वेबसाईट न राहता आता तो एक वेबसमुह झाला आहे. त्यामुळे त्या समुहातल्या सगळ्या भागांबद्दल लिहितो. तुमच्यापैकी अनेक जणानी गेल्या एका वर्षात मायबोलीच्या वेगवेगळ्या भागाना, छोटासा हातभार लावला आहे. पण त्या छोट्याश्या हातभाराचे आपल्या मायबोली कुटुंबावर झालेले मोठे परीणाम सांगणंही तितकच महत्वाचं आहे.

मायबोली.कॉम

विषय: 
प्रकार: 

मायबोलीचं नूतनीकरण पूर्ण

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

मायबोलीच्या गाभ्याचं नूतनीकरण पूर्ण झालं आहे. हे फक्त अंतर्गत प्रणालीचं नूतनीकरण असल्याने सभासदांच्या नेहेमीच्या वापरावर (User experience) काही फरक होऊ नये.
नूतनीकरणाचा एक अगोदर लक्षात न आलेला परिणाम (side effect) म्हणजे तुमची विचारपूस आता सदस्यखात्यात गेली आहे. ती पूर्वीसारखी कशी दाखवता येईल यावर प्रयत्न चालू आहेत.

जर तुम्हाला काही बदल/अडचणी जाणवल्या तर त्या आम्हाला कळवा.

विषय: 
प्रकार: 

मायबोलीला शनिवार रविवारी सुट्टी

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

नवीन प्रणालीवर स्थलांतर करण्यासाठी मायबोली शनिवार-ऑगस्ट १, २००९ संध्याकाळ ६:०० (पॅसिफीक वेळेनुसार) पासून ते रविवार २ ऑगस्ट संध्याकाळ ६:०० बंद राहील.

विषय: 
प्रकार: 

मायबोली: खरेदी सुविधा आता भारतातही.

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

http://kharedi.maayboli.com
ऑनलाईन पुस्तक खरेदी
गेली काही वर्षे परदेशस्थ मराठी वाचकांसाठी उपलब्ध असलेली ही सुविधा आता भारतातही चालू करत आहोत.

म्हणजे नेमकं कायः
१. तुमच्या भारतातल्या नातेवाईकांना पुस्तके भेट पाठवू शकता.

विषय: 
प्रकार: 

बागराज्यात नाट्यसम्मेलनाची घोषणा

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

All the Natya rasiks of the world,

Namaskar.

PLEASE SAVE THE DATES

29Th & 30Th May, 2010 in Raritan Center, NJ, USA.

for the historic event of 1st Vishwa Marathi Natya Sammelan

( this will be the 90Th Natyasammelan )

*Marathi Manoos has an insatiable thirst for Good Marathi nataks.

*To quench this inherent urge, we promise to bring you

the Best Marathi Plays from the world,

which will fully satisfy the taste of the US audience.

Sincerely yours,

प्रकार: 

मायबोलीचे नवीन मुख्य प्रशासक

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

कुठल्याही संस्थेचा विकास होण्यासाठी आवश्यक असणारी एक गोष्ट म्हणजे अनेक व्यक्तिंचा त्यात असलेला सहभाग. नुसत्या अनेक व्यक्ती असणे पुरेसे नसते तर वेगवेगळ्या भूमिका आणि त्या पार पाडण्यासाठी लागणारी कौशल्ये, वेळ यांचेही गणित जमावे लागते. आणि जसे पाणी वाहते असले की जास्त चांगले तसे एकाच भूमि़केत संस्थेतली माणसे फार वेळ राहिली तर संस्थेला शैथिल्य येते, व्यक्तिही तेच तेच काम करून कंटाळतात. नवीन नेतृत्वाला संधी मिळणे आवश्यक असते. त्यामुळे व्यवस्थित नियोजन करून अंमलात आणलेला बदल आवश्यक ठरतो. आणि मी स्वतःही अशा आवश्यक बदलाला अपवाद नाही.

विषय: 
प्रकार: 

मायबोलीवरचे आधार गट

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

मायबोलीकडे सगळेच गरज पडली तर हक्काने मदत मागतात. आणि मायबोलीकरही तितक्याच तत्परतेने मदत करतात.

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - घोषणा