मृत्यु

Submitted by मकु on 13 November, 2017 - 23:50

जीवनाने मृत्युला विचारले की तू प्रश्न आहेस का उत्तर
तर तो म्हणाला -
जोडीदारापैकी जो मागे उरतो त्याच्यासाठी प्रश्न,
पण ज्याच्या मरणदायी वेदना संपवतो त्याच्यासाठी उत्तर
आलो मी अकाली तर प्रश्न,
पण संपवले नकोसे वार्धक्य तर उत्तर
रोजचे जगणे ज्याचे मरते त्याच्यासाठी प्रश्न,
पण रोजचे मरण जगणार्यांसाठी उत्तर
तुझ्या सहवासाची सवय झालेल्याला प्रश्न,
आणि तू नकोसा झालेल्याला उत्तर

माझं असणं हा प्रश्न, माझं असणं हे उत्तर,
मी उत्तराचा प्रश्न, मीच प्रश्नाचे उत्तर

तू अशाश्वत तर मीच फक्त शाश्वत आहे,
भळभळत्या वेदनेने दारोदार हिंडणाऱ्या अश्वत्थाम्यासाठी न सापडलेलं उत्तर आहे

- मकु (बोस्टन - १३-नोव्हेम्बर-२०१७)

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अरे व्वा! मृत्यूवर आणखी एक कविता! आता तर मृत्यू सुंदर वाटायला लागलाय!

रोजचेच झाले जगणे,
आता मरणाची आस.
नको क्षणभंगूर जिवण,
हवा अनंताचा प्रवास....

......... असंच सुचलं काहीतरी!