आशा साहनी यांचा दुर्दैवी अंत

Submitted by महेश on 12 August, 2017 - 05:50

बातमीचा सारांश आणि नंतर लिंक देत आहे,

ऋतुराज साहनी हा भारतीय संगणक अभियंता १९९७ मधे अमेरिकेत जाऊन राहिला आहे.
मुंबईत लो़खंडवाला येथील बेलस्कॉट टॉवर नामक सोसायटीत दहाव्या मजल्यावर त्यांच्या दोन सदनिका आहेत.
वृद्ध आई वडिल दोघेच मुंबईत रहात होते, वडिलांचे २०१३ मधे निधन झाले आहे. नंतर आई (आशा) एकटीच रहात होती.
या मुलाचा आईशी शेवटचा संपर्क झाला होता एप्रिल २०१६ मधे, त्यानंतर काही संपर्क नाही.
काही दिवसांपुर्वी तो मुंबईत आला आणि सदनिकेचे दार आतुन कोणी उघडत नाही, म्हणुन चावीवाल्याच्या मदतीने दार उघडले,
तर आत शयनगृहात आशा साहनी यांचा मृतदेह आढळून आला तो सुद्धा अगदी सांगाडा अवस्थेत,
कारण त्यांचे निधन होऊन काही आठवडे / महिने झाले होते.
http://www.hindustantimes.com/mumbai-news/mumbai-woman-s-skeleton-found-...

लोक करिअरमुळे एवढे भावनाशून्य कसे होत चालले आहेत ? वृद्ध आई एकटी कशी रहात असेल ? काय करत असेल ? कशाचीच काळजी कशी वाटली नसेल या माणसाला ? काय झाले आहे माणुसकीला ? Sad

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही न्यूज पाहिलेली आठवतय टीव्ही वर..खूप वाईट वाटलेल ... Sad
ठिक आहे विदेशात रहात होता ,पण आईकडेही लक्ष द्यायला हव ना...किंवा तिलाही बरोबर न्यावं...
पण आजकालच्या मुला-मुलींना आई-वडील /सासू सासरे जवळ नको असतात.... Angry

माझे वडील दिनानाथला ॲडमीट होते तेव्हा त्याच आयसीयुमध्ये एक ज्येष्ठ महीला ॲडमीट होत्या.मुलं कॅनडात ,आले नाहीत .त्याबाईच्या मैत्रीणींनी त्यांना स्वखर्चाने ॲडमीट केले होते.पैकी एका काकूंशी बोलताना त्याम्हणाल्या" ही गेली तर त्यांना (मुलांना)बरच आहे".टचकन त्यांच्या डोळ्यात पाणी आले.
एक मराठी मध्यमवर्गीय ब्राह्मण असलेल्या त्या कुटुंबात ही तर्हा असेल तर पुढे काय बोलावे.पैशासाठी नाती खाऊन किंवा विकून टाकणारे लोक आहेत हे.
मी विचार करतो की मी शेती करतो,आईवडीलांजवळ राहतो ,त्यांची काळजी घेतो हेच बरे.बागबान चित्रपटातला अमिताभचा शेवटचा लांबलचक डायलॉग आठवत राहतो.

अहो प्राण साहेब ,जात लिहीली कारण ब्राह्मण समाज संस्काराचे महत्व विषद करत असतो नेहमी.तिथे अशी परीस्थीती असेल तर बाकीच्यांचे काय या अर्थी जातीचा उल्लेख केला आहे.बाकी काही नाही.

प्राण यांच्याशी सहमत, यात जातीचा काहीच संबंध नाही, कोणत्याही जातीधर्मात होऊ शकते.
जास्त करून परदेशात स्थायिक झालेल्या लोकांमधे हे असे प्रमाण जास्त आहे.
मुले बाहेर आणि पालक देशात एकटे. Sad

मी पण वाचून खूप हादरले होते. तिचे शेवटचे क्षण कसे गेले असतील नाही का? तब्येत चांगली असतानाच समज असतानाच वृद्ध्हाश्रमात अ‍ॅडमिट व्हयचा निर्णय घेतला आहे. आज मुंबई मिर र मध्ये शोभा डे ह्यांचा लेख पण आला आहे ह्या घटनेवर. चांगले लिहीले आहे.

आपल्या शेजारी एक म्हातारी चक्क मरुन जाते आणि आपल्याला वर्षभर त्याची भनक लागत नाही, हे दुर्दैवी....

----------------सिंजी, यात संस्कार, जातीधर्माचा काही विषय नाही, ही मनुष्यप्रवृत्ती आहे............. संस्कार काढायचे तर कुणाचे काढणार, जी अशी एकलकोंडी मरुन गेली त्या आईने मुलावर केलेले, की कसे..?

ज्या केसबद्दल आपल्याला व्यवस्थित माहित नाही तिथे लगेच जात-धर्म-संस्कार वगैरे वैयक्तिक होण्याअची गरज नाही...

माझ्या ओळखीत नुकताच एक पुनर्विवाह झालेला आहे. नवरा-बायको दोघांचा पुनर्विवाह आहे. नवऱ्याला दोन मुली आहेत आणि बायकोला दोन मुलगे आहेत. दोघांचे better-half is no more. दोघांची पहिली अपत्य आता नोकरीला लागलेले आहेत. आणि दुसरी अपत्य बारावीत गेलेत. बायकोने लग्न झाल्यावर आपल्या बारावीतल्या मुलाला तिच्या भावाकडे पाठवून दिलेलं आहे. बायकोने नवऱ्याच्या गावात नोकरी शोधली आणि आता नवऱ्याबरोबर राहते. ह्या समीकरणात दोन मुलींना आता नवी आई (!) मिळाली आहे. नवरा-बायकोला एकमेक मिळालेत आणि दुसरा मुलगा जो मामा कडे राहतोय तो पोरका झालाय. मोठा मुलगा त्याच्या नोकरीच्या गावात राहतोय. तो आईच्या लग्नाच्याआधीपासूनच घराबाहेर पडला होता त्यामुळे त्याला मी पोरका म्हणत नाहीये. अश्या परिस्थितीत दुसऱ्या मुलाकडून आईने / समाजाने अपेक्षा काय आणि का करावी? जसे पेरावे तसे उगवते- त्या साहनी बाईंच्या दुसऱ्या लग्नाची पूर्ण गोष्ट पेपरमध्ये आलेली नाही.
कोणाला जर आई-वडिलांनी परिस्थिती किंवा इतर कोणत्याही कारणाने नातेवाईकांकडे वाढवायला पाठवले असेल तर मी काय म्हणतेय ते थोडेफार पटेल. बाकी आपल्या संस्कृतीने आपल्याला माणसांचा देव करायला लावून अगदी पंगू करून टाकलंय. माणस माणसासारखी वागली तर त्यांच्याशी पण माणसांसारखे वागायला हरकत नाही. काही अपवाद असू शकतात, दुसरे चूक वागले तरी त्यांच्याशी चांगले वागणारे.

ही घटना निश्चितच दुर्दैवी आणि करुण आहे पण ह्याचा संबंध परदेशस्थ मुलं, मुलांनी आईवडिलांबरोबर न राहणं ह्याच्याशी न जोडणंच योग्य आहे.
कुठल्याही 'नॉर्मल' घरात सव्वा वर्षाहून जास्त काळ पालकांशी कुठल्याच प्रकारे संपर्क साधला नाही हे घडणे अशक्य आहे. अगदी आईवडील आणि मुलांतले संबंध ताणले गेलेले असले तरी.
बरं समजा मुलाशी संबंध तुटले असले तरी नातेवाईकांचे, मित्रपरीवाराचे काय ? सोसायटीत आजूबाजूला राहणार्‍या लोकांचे काय ? त्या बाईंनी एप्रिल २०१६ पासूनचे सोसायटी बिल भरलेलं नव्हतं. त्यानंतर १० महिने सोसायटीतले लोक काय करत होते ? एकटी म्हातारी बाई राहतेय हे सगळ्यांना माहीत होते. सोसायटीतील एकही व्यक्ती त्यांच्याशी जुजबी संपर्कही ठेवून नव्हती का ?
पेपर, दूध अशा गोष्टी त्यांच्याकडे येत नसाव्यात असे मानायला वाव आहे नाहीतर बाहेर गोष्टी साठायल्या लागल्या की लगेच लक्षात येते.
अपत्य सोडा पण एकाही व्यक्तीशी संपर्क नसणे( ज्यामुळे लगेच नाही तरी निदान आठ-दहा दिवसांत ही घटना उघडकीला आली असती ) हे फार दुर्मिळ आहे. हळहळ वाटेल पण त्यापलीकडे संपूर्ण चित्र माहीत नसताना निष्कर्ष काढायला जाऊ नये हेच खरे.

कोणत्याही शेतकर्‍याचा बाप वृद्धाश्रमात दाखवा ---जमीन मिळेल का मुलाला वडिलांच्या पश्चात, वृद्धाश्रमात टाकून.

ही बातमी वाचून खूप वाईट वाटले.पण त्याहीपेक्षा शॉक बसला ते एप्रिल १६ पासून मुलाचे आणि आईचे संभाषण नाही हे वाचून.तिच्या अंतकाळी काय झाले असेल ते ठाऊक पडणार नाहीच आणि त्याचा उपयोगही नाही.पण शेजार्पाजार्‍यांना दोष फारसा देता येणार नाही.कारण आजकाल कोणाला घरात डोकावलेले आवडतं /चालत नाही.तरीही बॉडी कुजून त्याचा दुर्गंध आजुबाजूला पसरला नसेल का?

कोणत्याही शेतकर्‍याचा बाप वृद्धाश्रमात दाखवा >>>>> कदाचित आसपास असे आश्रम नसतील किंवा लाजेकाजेस्तव घरी ठेवत असतील.चारच दिवसांपूर्वी एकजण त्यांच्या गावच्या चुलतसासूबद्दल सांगत होती.शेतावर्च्या खोपटात एकटीला ठेवले होते. ११५ वय होते,पण दात शाबूत्,केस काळे.सुना ४-४ दिवस भाकरी देत नसत.शिळ्या भाकर्‍या म्हातारी खायची म्हणे. तिच्या सुना बरेचदा मारझोड करायच्याही.

यात जातीचा काहीच संबंध नाही, कोणत्याही जातीधर्मात होऊ शकते. >>>>> अगदी खरंय.

उर्जा यांचे मुद्दे बरोबर आहेत, मलाही अगदी हेच वाटत आहे की कोणीच कसे या बाईंकडे लक्ष दिले नसेल ?
आजकाल लोक कितीही फटकून रहात असले तरी देखील शेजारी, दूधवाला, पेपरवाला, वॉचमन, इ. लोकांचे लक्ष असते.
कोणाला दुर्गंध फार आला नाही याचे एक कारण म्हणजे दहाव्या मजल्यावर दोन्ही फ्लॅट यांचेच आहेत, तिकडे अजुन कोणी रहात नसावे,
तसेच सर्व फ्लॅट्स मधे एसी असणार त्यामुळे देखील कळाले नसेल.
पण हे खरच फार फार हॉरिबल आहे. त्या बाई एकट्या कशा राहिल्या असतील ? काय वाटले असेल त्यांना अखेरच्या क्षणांमधे ? Uhoh

झोपेत गेल्या असतील त्या बाई कदाचित! कदाचित, काही वाटलं नसेल त्यांना. काही लोकांना एकटं राहायला आवडतं (आधी पर्याय नाही म्हणून मग सवय होते एकटेपणाची) मनाचे खमके असतात असे लोकं.

हिन्दी बद्दल क्षमस्व पण फारच रिलेव्हन्ट असल्या ने टाकण्याचा मोह टाळता येत नाहीये....

व्हाट्स अप वरून साभार ...
दो खबरों पर जरा नजर डालिए।
1- 12 हजार करोड़ रुपये की मालियत वाले रेमंड ग्रुप के मालिक विजयपत सिंघानिया पैदल हो गए। बेटे ने पैसे-पैसे के लिए मोहताज कर दिया।
2- करोड़ों रुपये के फ्लैट्स की मालकिन आशा साहनी का मुंबई के उनके फ्लैट में कंकाल मिला।
विजयपत सिंघानिया और आशा साहनी, दोनों ही अपने बेटों को अपनी दुनिया समझते थे। पढ़ा-लिखाकर योग्य बनाकर उन्हें अपने से ज्यादा कामयाबी की बुलंदी पर देखना चाहते थे। हर मां, हर पिता की यही इच्छा होती है। विजयपत सिंघानिया ने यही सपना देखा होगा कि उनका बेटा उनकी विरासत संभाले, उनके कारोबार को और भी ऊंचाइयों पर ले जाए। आशा साहनी और विजयपत सिंघानिया दोनों की इच्छा पूरी हो गई। आशा का बेटा विदेश में आलीशान जिंदगी जीने लगा, सिंघानिया के बेटे गौतम ने उनका कारोबार संभाल लिया, तो फिर कहां चूक गए थे दोनों। क्यों आशा साहनी कंकाल बन गईं, क्यों विजयपत सिंघानिया 78 साल की उम्र में सड़क पर आ गए। मुकेश अंबानी के राजमहल से ऊंचा जेके हाउस बनवाया था, लेकिन अब किराए के फ्लैट में रहने पर मजबूर हैं। तो क्या दोषी सिर्फ उनके बच्चे हैं..?
अब जरा जिंदगी के क्रम पर नजर डालें। बचपन में ढेर सारे नाते रिश्तेदार, ढेर सारे दोस्त, ढेर सारे खेल, खिलौने..। थोड़े बड़े हुए तो पाबंदियां शुरू। जैसे जैसे पढ़ाई आगे बढ़ी, कामयाबी का फितूर, आंखों में ढेर सारे सपने। कामयाबी मिली, सपने पूरे हुए, आलीशान जिंदगी मिली, फिर अपना घर, अपना निजी परिवार। हम दो, हमारा एक, किसी और की एंट्री बैन। दोस्त-नाते रिश्तेदार छूटे। यही तो है शहरी जिंदगी। दो पड़ोसी बरसों से साथ रहते हैं, लेकिन नाम नहीं जानते हैं एक-दूसरे का। क्यों जानें, क्या मतलब है। हम क्यों पूछें..। फिर एक तरह के डायलॉग-हम लोग तो बच्चों के लिए जी रहे हैं।
मेरी नजर में ये दुनिया का सबसे घातक डायलॉग है-'हम तो अपने बच्चों के लिए जी रहे हैं, बस सब सही रास्ते पर लग जाएं।' अगर ये सही है तो फिर बच्चों के कामयाब होने के बाद आपके जीने की जरूरत क्यों है। यही तो चाहते थे कि बच्चे कामयाब हो जाएं। कहीं ये हिडेन एजेंडा तो नहीं था कि बच्चे कामयाब होंगे तो उनके साथ बुढ़ापे में हम लोग मौज मारेंगे..? अगर नहीं तो फिर आशा साहनी और विजयपत सिंघानिया को शिकायत कैसी। दोनों के बच्चे कामयाब हैं, दोनों अपने बच्चों के लिए जिए, तो फिर अब उनका काम खत्म हो गया, जीने की जरूरत क्या है।
आपको मेरी बात बुरी लग सकती है, लेकिन ये जिंदगी अनमोल है, सबसे पहले अपने लिए जीना सीखिए। जंगल में हिरन से लेकर भेड़िए तक झुंड बना लेते हैं, लेकिन इंसान क्यों अकेला रहना चाहता है। गरीबी से ज्यादा अकेलापन तो अमीरी देती है। क्यों जवानी के दोस्त बढ़ती उम्र के साथ छूटते जाते हैं। नाते रिश्तेदार सिमटते जाते हैं..। करोड़ों के फ्लैट की मालकिन आशा साहनी के साथ उनकी ननद, भौजाई, जेठ, जेठानी के बच्चे पढ़ सकते थे..? क्यों खुद को अपने बेटे तक सीमित कर लिया। सही उम्र में क्यों नहीं सोचा कि बेटा अगर नालायक निकल गया तो कैसे जिएंगी। जब दम रहेगा, दौलत रहेगी, तब सामाजिक सरोकार टूटे रहेंगे, ऐसे में उम्र थकने पर तो अकेलापन ही हासिल होगा।
इस दुनिया का सबसे बड़ा भय है अकेलापन। व्हाट्सएप, फेसबुक के सहारे जिंदगी नहीं कटने वाली। जीना है तो घर से निकलना होगा, रिश्ते बनाने होंगे। दोस्ती गांठनी होगी। पड़ोसियों से बातचीत करनी होगी। आज के फ्लैट कल्चर वाले महानगरीय जीवन में सबसे बड़ी चुनौती तो ये है कि खुदा न खासता आपकी मौत हो गई तो क्या कंधा देने वाले चार लोगों का इंतजाम आपने कर रखा है..? जिन पड़ोसियों के लिए नो एंट्री का बोर्ड लगा रखा था, जिन्हें कभी आपने घर नहीं बुलाया, वो भला आपको घाट तक पहुंचाने क्यों जाएंगे..?
याद कीजिए दो फिल्मों को। एक अवतार, दूसरी बागबां। अवतार फिल्म में नायक अवतार (राजेश खन्ना) बेटों से बेदखल होकर अगर जिंदगी में दोबारा उठ खड़ा हुआ तो उसके पीछे दो वजहें थीं। एक तो अवतार के दोस्त थे, दूसरे एक वफादार नौकर, जिसे अवतार ने अपने बेटों की तरह पाला था। वक्त पड़ने पर यही लोग काम आए। बागबां के राज मल्होत्रा (अमिताभ बच्चन) बेटों से बेइज्जत हुए, लेकिन दूसरी पारी में बेटों से बड़ी कामयाबी कैसे हासिल की, क्योंकि उन्होंने एक अनाथ बच्चे (सलमान खान) को अपने बेटे की तरह पाला था, उन्हें मोटा भाई कहने वाला दोस्त (परेश रावल) था, नए दौर में नई पीढ़ी से जुड़े रहने की कूव्वत थी।
विजयपत सिंघानिया के मरने के बाद सब कुछ तो वैसे भी गौतम सिंघानिया का ही होने वाला था, तो फिर क्यों जीते जी सब कुछ बेटे को सौंप दिया..? क्यों संतान की मुहब्बत में ये भूल गए कि इंसान की फितरत किसी भी वक्त बदल सकती है। जो गलती विजयपत सिंघानिया ने की, आशा साहनी ने की, वो आप मत कीजिए। रिश्तों और दोस्ती की बागबानी को सींचते रहिए, ये जिंदगी आपकी है, बच्चों की बजाय पहले खुद के लिए जिंदा रहिए। आप जिंदा रहेंगे, बच्चे जिंदा रहेंगे। अपेक्षा किसी से भी मत कीजिए, क्योंकि अपेक्षाएं ही दुख का कारण हैं।

वाईट वाटलं ..
मुलगा नालायक निघतोही.. किंवा आणखी जे काही कारण असेल ते..
पण शेजारी कोणालाही आपली अनुपस्थिती जाणवू नये ईतके एकटेपण.. स्वत: निवडले असावे का? आणि निवडले तरी पोराने तसे होऊ द्यावे का?
अंत दुर्दैवी आहे खरा.. मला त्यांचे हे असे जगणेही दुर्दैवी वाटते

घडलेली घटना वाईट आहे...

नक्की काय घडले आहे हे आपल्याला माहित आहे अशा अविर्भावात आपण त्या मुलाला कसे दोष देतो? त्याला त्याची काही बाजू असेलही/ वा नसेलही. किव्वा त्याच्या काही मर्यादा असतील, आणि यावर त्याचे काहीच नियन्त्रण नसेल.

भोचकपणा करणारा समाज अवतीभवती असतानाही कोणी मरून गेलेले कळत नाही हे दुर्दैवी आहेच.

पण त्या निमित्ताने मुले कित्ती वाईट आणि परदेशात स्थायिक असतील तर अजूनच वाईट हा जो सूर लागलाय तोही तितकाच दुर्दैवी असला तरी त्याचे अजिबात आश्चर्य वाटले नाही.

मुलांच्या आत्महत्या म्हणजे पालकच नालायक, समाज नालायक; एकाकी वृद्ध म्हणजे मूलेच नालायक, समाज नालायक हे जे समज आपण दृढ करून घेतलेत त्यात एक घटक दोन्ही बाजूने नालायक ठरतो तो म्हणजे आपला समाज.

हा समाज म्हणजे त्यातले आपण कधी लायक होणार? व्यक्तिस्वातंत्र्य हवेच यावर आपण वेगाने ठाम होतोय पण व्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे काय ह्याच्याशी आपला अजिबात संबंध नाही. तोंडाने व्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणारे पालक मुलांचे घराबाहेर पडून आयुष्य शोधण्याचे निर्णय मान्य करत नाहीत, जोडीदार अर्ध्यावरच सोडून गेला तर नव्याने संसार मांडण्याचे पालकांचे निर्णय मुले मान्य करत नाहीत. माणसांनी स्वसुखासाठी घेतलेल्या व्यक्तिगत निर्णयांवर संबंधित समाज सतत इतके बरे वाईट शेरे मारत राहतो की निर्णय घेणाऱ्याचा आपण केले ते चूक की बरोबर याचा गोंधळ उडतो.

आपण सध्या जी जीवन शैली स्वीकारलीय त्यातली फक्त मजा आपल्याला हवीय, त्याचे परिणाम स्वीकारायची आपली कुवत नाहीय.

जे झाले त्यात मला तरी कुणाची चूक आहे हे अजिबात ठरवता येणार नाही कारण ते ठरवायचं मला हक्कच नाहीय. मुलगा व आई स्वतंत्र राहत होते, एकमेकांचया संपर्कात नव्हते हे त्यांनी स्वेच्छेने केलेले की कोणा एकावर ही परिस्थिती दुसऱ्याच्या निर्णयामुळे लादली गेली याबद्दल काहीही माहीत नसताना मुलगाच चूक हे ठरवायचा हक्क निदान मला तरी मी स्वतःच बहाल करू इच्छित नाही.

आई आणि मुलाचे वेगळे राहणे हे त्यांच्या मर्जीने आणि त्यांचे स्वातण्त्र्य मान्य केले तरी आई मेली तरी वर्षभर काही संपर्क नसणे हे पटत नाही.
कमॉन, जर मी माझ्या आईवडिलांपासून आपापली लाईफ जगायला वेगळे होतो याचा अर्थ मी सणवारालाही त्यांना भेटणार नाही किंवा साधा फोन करणार नाही का...

त्यामुळे व्यक्तीस्वातण्त्र्य वगैरे मुद्दा या केसमध्ये तरी मला फोल वाटतो. त्यांचे आपसात पटत नसणार आणि आई जगतेय की मरतेय याचे मुलाला काही पडले नसणार हे यात क्लीअर आहे..
अर्थात खरे काय ते माहीत नसताना यात मुलाला किंवा एकट्या मुलालाच दोष देण्यात अर्थ नाहीयेच.
पण अखेर अशी केस घडली की त्या अनुषंगाने घटलेल्या जीवनमूल्यांवर चर्चा होणे स्वाभाविकच आहे.

पूर्ण माहिती शिवाय यावर काही लिहिणे कठीण आहे . मुलगा जाऊ दे त्याच्याशी नव्हतं पटत पण इतर एक ही व्यक्ती नाही जिने ह्यांची चौकशी केली . हे खूप अबनॉर्मल वाटतंय मला . एखादं वेळेस त्या बाईंचा मानसिक तोल ढासळला असेल .

एक शिकले ह्यातून .. दूधवाला, पेपर वाला, कामवाली बाई ह्यापैकी कोणीतरी घरात आलंच पाहिजे एकट राहतात त्यांच्या . तीच माणसं विश्वासघात करतात म्हणून कोणी न ठेवण्या कडे कल वाढतोय पण ती येत असतील तर कळेल तरी .

अरे हो, कामवाली बाई.. मदतणीस.. पैसेवाल्या म्हातारया बाईसोबत कोणीही नाही कसे शक्य आहे.. जेवण बनवणे, कपडे धुणे ठिक.. पण एवढ्या मोठ्या घराची साफसफाई रोजचा कचरा वगैरे..
काही प्लानिंग करून मर्डर तर नव्हता ना....

बातमी फार वाईट पण सहज एक विचार आला मनात....
मुलांनी आई वडीलांसाठी काही करायला हवं /नको हा मुद्दा थोडा वेळ बाजूला ठेवुयात किंवा जुन्या पिढीचं राहू देत पण आपल्या पिढीपासून पुढे म्हातारपणात आई वडील मुलांवर अवलंबून का रहातात? मुलं मार्गी लागली (मी म्हणेन 18 वर्षाचं मूल झाल्याबरोबर) त्यांना सोडून स्वतः:ची म्हातारपणाची तजवीज का करत नसतील लोकं?
मुलांनी आपलं आयुष्य सोडून आई वडीलांमध्ये गुंतून राहावं ही आपेक्षा का?

माझी आजी सातारला एकटी राहाते, तिला अनेक वेळा सांगितलंय आमच्या सोबत येऊन राहिला, तिचं नेहमी एकच वाक्य असतं 'मला माझ्या घरातच मरायचंय' ....आम्ही रोज फोन करतो , अनेकदा ती कुठे तरी असते म्हणून उचलत नाही, मोबाईल वापरत नाही... आणि हे रोजचं आहे.. रोज दिवसातून 100 वेळा फोन ट्राय करणं खरंच शक्य आहे का? प्रत्येक माणूस रोज वेगळ्या वेगळ्या हजार गोष्टींशी डील करत असतो, किती वेळा फक्त स्वतःचा हेका धरून ठेवलेल्या म्हाताऱ्या माणसाचा विचार करत राहायचं?
आम्ही भारतात आहोत 2-3 दिवस कॉन्टॅक्ट नाही झाला तर साताराला जाऊन बघून येऊ शकतो... भारता बाहेर असणार्याने हेच करावं हे कसं शक्य आहे?

बरं फुलं टाईम मदतनीस ठरवायची तर विश्वास किती ठेवायचा त्यांच्यावर?

आत्ताच्या केस मध्ये पण कशावरून म्हणताय की त्या मुलाने आईला बोलावलं नसेल त्याच्यासोबत? का हे judgement की त्याने करियर पायी आईकडे दुर्लक्ष केलं?

म्हातारपणात का प्रत्येक जण स्वतःची सोय स्वतः लावत नाही? अशा मरणापेक्षा वृद्धाश्रमात जाऊन राहिला काय हरकत आहे? सेम एजचे सोबती मिळतात...

जुन्या पिढीचं राहू द्या किमान आजची पिढी तरी याचा विचार करेल काय?
मुलांकडे म्हातारपणाची तजविज म्हणून बघणं कधी थांबणार देशात?

Pages