मुंबईत २३ जूनपासून प्लास्टिकच्या पिशव्या बाळगणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असून बंदीनंतर पहिल्यांदा पिशवी आढळल्यास पाच हजार, दुसऱ्यांदा पिशवी आढळल्यास दहा हजार, तिसऱ्यांदा पिशवी आढळल्यास २५ हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय राज्य सरकारने ठरवला आहे. पण प्लास्टिक बण्द म्हणाजे नक्की काय ? फक्त प्लास्टिकच्या पिश्व्या की घरचे रोजच्या वापरातील प्लास्टिकच्या वस्तुपण उदा. पाण्याच्या बाटल्या, डबे ई.
याबद्द्ल जर कुणी निट समजावु शकेल तर बरे होईल.
मंदिर, परमेश्वर आणि भक्ती याचं अनन्यसाधारण महत्व आपल्या संस्कृतीत खूप संत महात्म्यांनी समजावून सांगितलं आहे. मी श्रद्धाळू वगैरे नाही पण मंदिर किंवा मूर्ती पहिली किंवा अन्य पूजनीय व्यक्ती पहिली कि हात आपोआप जोडले जातात, म्हणजे आस्तिक नक्कीच आहे. पण अलीकडे लोकांची भक्ती पहिली कि उबग येतो. २५-३० वर्षाचे तरुण जेव्हा साई बाबांच्या दर्शनासाठी चालत मुंबई हुन शिर्डी ला जाताना दिसतात तेव्हा खरंच वाईट वाटत. लोकांचं देव देव करणं, सार्वजनिक उत्सवांच्या नावाखाली धुडगूस घालणं, आणि देवाच्या नावाचा बाजार मांडणं पाहिलं कि सहज एक विचार डोकावून जातो :

तुका म्हणे जाय नरकलोका!

तीव्रते बरोबर शिक्षेची 'हमी'ही वाढवायला हवी!

महा भय योग

फरार आर्थिक गुन्हेगार विधेयक ठगांना वेसण घालणार का?
अस्वस्थ न्यायव्यवस्था?
आपल्या भारतात फार पूर्वी रामराज्य का काय होते म्हणतात. तशीच स्थिती सांप्रतकाली पुन्हा भारतास प्राप्त झालेली आहे. ह्या घडीस भारतात कोणी गुन्हेगारच राहिलेला नसल्याचे शुभवर्तमान वेळोवेळी जनतेला मिळेल, ह्याची पुरेपूर खात्री नियंत्याने सध्या घेतलेली दिसते. 'आम्हाला काम मिळू द्या, काम न होता पगार मिळण्याचे दुर्भाग्य आमुच्या भाळी नको' अशी आर्त विनवणी पोलिस, वाहतूक नियंत्रक इ. इ. यंत्रणा रस्तोरस्ती उभी राहून मायबाप सरकारकडे करत असतात.